आपल्याबद्दल, लिखाणाबद्दल काही लिहून आलंय
असं कोणी सांगितलं तर मनातील पहिली प्रतिक्रिया काय असते ? भीती. 'कोण जाणे
काय लिहिलं असेल ?! बरं लिहिलंय की वाईट ?' इत्यादी ! म्हणजे आधी
भीती नंतर चिंता ! मग जे काही लिहून आलंय ते नजरेसमोर आलं की धीर एकवटून
वाचणे ! आणि मग एकंदर बरंच लिहून आलेलं दिसलं तर हुश्श !
खरं तर असं होता कामा नये ! आपण कोणाला खुष करायला तर लिहित नाही ! सर्वसामान्य आयुष्य जगत असताना जे जे प्रसंग समोर येतात त्यातून जाताना आपण नक्की कसे सामोरे जातो, हे मागे वळून बघितले तर आपलीच ओळख आपल्याला होऊ लागते. आणि स्वत:शी खरं बोलता आलं नाही, सोंगं आणावी लागली तर जगणे अवजड होईल ! समोरच्याला सोडा, इथे स्वत:ला आपण ओळखू शकलो तरी खूप झाले ! त्यामुळे घडले तसे, त्यात्या वेळी वा नंतर मनात झालेल्या उलाढाली ह्या स्वच्छ, सुलभ मराठीत लिहिण्याचा प्रयत्न असतो. जेणे करून वाचणाऱ्याला त्या प्रसंगामध्ये स्वत:ला उभं करता यावं. मग हातून मूर्खपणा झाला असला तरी तो तसाच उभा करणे हेही आलेच ! नसते सोंग आणा कशाला ?!
नाही का ?खरं तर असं होता कामा नये ! आपण कोणाला खुष करायला तर लिहित नाही ! सर्वसामान्य आयुष्य जगत असताना जे जे प्रसंग समोर येतात त्यातून जाताना आपण नक्की कसे सामोरे जातो, हे मागे वळून बघितले तर आपलीच ओळख आपल्याला होऊ लागते. आणि स्वत:शी खरं बोलता आलं नाही, सोंगं आणावी लागली तर जगणे अवजड होईल ! समोरच्याला सोडा, इथे स्वत:ला आपण ओळखू शकलो तरी खूप झाले ! त्यामुळे घडले तसे, त्यात्या वेळी वा नंतर मनात झालेल्या उलाढाली ह्या स्वच्छ, सुलभ मराठीत लिहिण्याचा प्रयत्न असतो. जेणे करून वाचणाऱ्याला त्या प्रसंगामध्ये स्वत:ला उभं करता यावं. मग हातून मूर्खपणा झाला असला तरी तो तसाच उभा करणे हेही आलेच ! नसते सोंग आणा कशाला ?!
…तर झालं असं की तुम्हा सर्वांसारखीच पुण्याची माझी एक मैत्रीण. तिने मध्यंतरी सांगितलं की 'सकाळ'च्या तनिष्का सदरामध्ये तुझ्या ब्लॉगवर लिहून आलंय… ब्लॉगचं नाव नाही दिलेलं पण लिखाणातून ओळख पटतेय.
धाबं दणाणलं. काय आलं असेल ? तिला विचारलं. ती म्हणाली चांगलंच आलंय ! मग ऑनलाईन तनिश्काचा शोध वगैरे. नाही लागला. मग पुन्हा तिच्याकडे वळले ! तिला थोडा त्रास देणे आता भाग होतं ! नाही मिळत म्हटलं… स्कॅन करून पाठव बाई तूच आता !
काल खरं तर दिवे मालवून गादीवर पडले होते. पण का कोण जाणे झोप लागेना. झोप न लागणे म्हणजे नाहक आयुष्याची चिंता वगैरे माझ्या डोक्यात शिरू लागते. म्हणून म्हटलं बघू… फेसबुकवर कोणी चकाट्या पिटत असेल तर आपण देखील थोड्या पिटू ! म्हणून विश्वाचे द्वार उघडले !
तेव्हा द्वाराबाहेर मैत्रिणीचे मेल विसावले होते ! मेल थोडी फुगीर होती. त्यात दोन जेपेग्स ज्या बसल्या होत्या !
धाबं !
डाउनलोड होत होत्या तेव्हा मनात आलं… बारा महिने तेरा काळ जाहिरातक्षेत्रात असते खरी…ग्लॅमर अवतीभवती फिरत असतं…ते खरं तर आपल्या स्वभावाविरुद्ध…लेक तर म्हणतच असते…'तुला तत्व धरून जगायचं तर असतं…पण जे फिल्ड तू निवडलंयस ते तर खोटं…किंवा मुलामा चढवलेलं…तरी तू कशी काय रमू शकतेस कोण जाणे ?!'
वाचा आता तुम्हीच !
ब्लॉगच्या नावाचा स्पष्ट उल्लेख नसल्याकारणाने 'रेस्टइजक्राईम' बद्दलचं लिखाण मी सोयीसाठी वेगळ्या रंगात केलं आहे.
ब्लॉगच्या नावाचा स्पष्ट उल्लेख नसल्याकारणाने 'रेस्टइजक्राईम' बद्दलचं लिखाण मी सोयीसाठी वेगळ्या रंगात केलं आहे.
केतकी, धन्यवाद गं ! :)
7 comments:
अभिनंदन !!! :-)
>>>काल खरं तर दिवे मालवून गाडीवर पडले होते … का बरं ??? ;-)
केलं गं दुरुस्त ! :D :D
neela chi comment vachun mla hasu avarla nahi... :D
baki... navacha ullekh na karta hi tine tuzya blog chi chhan olakh arun diley :)
Always a pleasure tai! :-)
जिने लेख लिहिलाय ती स्वतः सुद्धा एक ब्लॉगर आहे. हा तिचा ब्लॉग- http://maaza-indradhanushya.blogspot.com/. तिथे हा लेख पूर्ण वाचता येइल.
अभिनंदन अनघा … :) मला तर तुझे लिखाण प्रचंड आवडते! तुझी एक 'पंखा' मैत्रीण …. :)
:D
Post a Comment