सध्या मला सुचलेली, मी लिहिलेली जाहिरात टीव्हीवर दाखवली जात आहे. तुम्ही कदाचित बघितली
देखील असेल. इथे टाकतेय म्हणजे तुम्हाला कळेल ना की हे माझं पिल्लू आहे !
आणि काय माहित तुम्ही टीव्ही बघता की नाही ?! कदाचित टीव्ही बघत असालही
पण जाहिराती सुरु झाल्या की नेमके टीव्ही समोरून उठून जात असाल ! काही
भरवसा नाही तुमचा ! :)
त्याही पुढे जाऊन…तुम्ही सगळे कुठे कुठे जगभर आहात ! म्हणजे आम्ही भारतात आमच्या टीव्हीवर जे बघत असतो ते काही तुम्ही बघत नाही !
त्याही पुढे जाऊन…तुम्ही सगळे कुठे कुठे जगभर आहात ! म्हणजे आम्ही भारतात आमच्या टीव्हीवर जे बघत असतो ते काही तुम्ही बघत नाही !
गेल्या वर्षी तयार होऊन देखील ऑन एअर येईस्तोवर बरेच महिने गेले. शेवटी
शेवटी तर ऑफिसमधल्या मित्रमैत्रिणींनी मला चिडवायला सुरवात केली होती…" ते तू
'नही नही' गाणं कशाला टाकलंस ? म्हणून तुझी फिल्म पण त्या 'नही नही
झोन'मध्ये गेलीय !"
:) :)
20 comments:
अभिनंदन !! एकदम सुंदर झाली आहे !!
Really interesting and creative ad... Congratulations!
मस्तंय ... बरं झालं इथे टाकलीस ते ... मी अजून टीव्हीवर नाही बघितली!
मस्तच ग! आवडते मला ही जाहीरात! :)
मला मुळात जाहिराती आवडतच नाहीत :(
तरी तुम्ही 'लिहिली' आहे म्हणजे नक्की काय? म्हणजे कथा की पटकथा? (की अजून काय काय असत माहित नाही, त्यामुळे प्रश्न पुष्कळसा बाळबोध असू शकेल)
दिलेल्या विडीओ लिंक वर 'जाहिरात' पहिल्याचा अनुभव आला मात्र!
भारी :) :)
बास बास... आपण ह्या जाहिरातीचीपण जाहिरात केली आहे. आमच्या म्यॅडमची जाहिरात आहे म्हणून मी ते प्रोडक्ट डिस्काऊंट रेटमधे मागतो. त्याबदल्यात त्या जाहिरातीतल्या ऍक्टर लोकांची सही किंवा त्यांच्यासोबत फोटो काढून मिळेल असं मी सांगून ठेवलं आहे. :) :) :)
मस्त झालीये गं! अभिनंदन! आणि इथे टाकल्यामुळे मला पाहायला मिळाली. :)
Hey thats urs? Cool :) I liked the ad, I just recently saw it. :) Really great. :D
Vidya.
राजीव, धन्यवाद. :)
चौगुलेसाहेब, मनापासून आभार. :)
गौरे, टीव्ही कमीच बघितला जात असेल ना तुझा ?
अभिषेक, प्रश्नांचं थोडक्यात उत्तर देणं तसं कठीण आहे पण तरीही प्रयत्न करते…
मी लिहिली म्हणजे 'थिंकिंग - स्क्रिप्ट रायटिंग - क्लायंट प्रेझेन्टेशन आणि टेकिंग अप्रुवल्स - डिरेक्टरची निवड - गिविंग अप्रुवल्स ऑन एव्हरी स्टेप (मुझिक, एडिटिंग) आणि शेवटी क्लायंटला तयार झालेली जाहिरात दाखवून त्यांच्याकडून शाबासकी मिळवणे… हा सर्व प्रवास. :)
सुहास, धन्यवाद. :)
सौरभ ! :D देतं का तुला मग कोणी स्वस्तात ?!
भाग्यश्री, आभार. :)
केतकी, घेतलेलं काम करताना मजा यायला हवी इतकंच काय ते ! तुला ती माझी आहे हे माहित नसताना पण आवडली हे छानच ! :) :)
विद्या, भाव खाते आता मी जरा ! :) :) :)
धन्यु! कळले!
भारी भारी एकदम :) :) …. तूला माहितीये इशानू आणि गौराचे मित्रमंडळही ही जाहिरात लागली की सांगतात की तुमच्या अनघा मावशीने केलेली जाहिरात लागली टीव्हीवर म्हणून :) :) … पोरं एकदम प्राऊड ऑफ मावशी वगैरे :) :)
Post a Comment