आजवर रस्त्याला होती फार वळणं…नको इतके फाटे…नको तितके चढ आणि नको तितके उतार. अनेक.
कधी धाप कधी थकवा. कंटाळलो. थकलो. नको ते जीणं वगैरे.
अचानक आज…रस्त्याला वळणं नाहीत, रस्ता नागमोडी नाही, रस्त्याला एकही फाटा नाही. चढ नाही. उतार देखील नाही. हल्ली तो चंद्र मंदावत नाही. आजकाल हा सूर्य विसावत नाही.
सगळं धुसर, नजरेला दिसेनासं.
डोळे घट्ट मिटून उघडावे म्हटलं…दिसेल एखादं वळण, येईल एखादा फाटा. एखादा.
थकून का होईना पुन्हा धावू लागेल माझा रस्ता.
दुसरं काही दिसलं नाही…पण
…डेड एन्डचा बोर्ड मात्र स्पष्ट दिसला.
( कर्करोग हा असा रोग आहे म्हणतात जो आपल्याला आपला ह्या पृथ्वीवरचा कालावधी ठरवून देतो. काही दिवस. काही महिने. कदाचित एखादं वर्ष. तो कालावधी आपण आपली बाकी राहिलेली कामे उरकण्यासाठी वापरावा अशी शहाण्यासुरत्या माणसाकडून अपेक्षा असते. परंतु, हे असे साक्षात मरण समोर उभे असता, यमाचा फास आकाशात आपल्या डोक्याभोवतीच फिरत असताना त्या माणसाचे नक्की काय होत असेल…? )

2 comments:
मी स्वतःला तिथे उभा करून पाहिले तेव्हा मी घाबरून गेलो... फार भयाण वाटले...
कोण जाणे… श्रीराज, मला नेहेमीच हा प्रश्न पडत असतो… कधीतरी असाच मृत्यू माझ्या समोर उभा रहाणार आहे. कदाचित अकस्मात किंवा थोडाफार वेळ माझ्या हाती देऊन… काहीही झालं तरीही मागे राहिलेल्यांवर आर्थिक संकट कोसळू नये ह्याची काळजी घेणे ही माझी जबाबदारी आहे असे मी समजते. अर्थात माझ्या स्वत:च्या ऐपतीनुसार. :)
Post a Comment