नमस्कार

नमस्कार

Pages

Sunday, 9 December 2012

सैरभैर

आभाळाला सीमा नसते...नियम एक. नदी संथ वहाते...नियम दोन. समुद्र पृथ्वीचा सोबती...नियम क्रमांक तीन.
नियमबाह्य घडते तेव्हा आभाळ फाटते. नदी हंबरडा फोडते. पृथ्वीची साथ सोडून समुद्र आकाशाकडे झेपावतो.
आई प्रेमळ असावी...आयुष्याने धरलेली पहिली अपेक्षा...नियम नव्हे.
मात्र हा एक अपेक्षाभंग...माथ्यावरचे आभाळ फाडतो...डोळ्यांच्या नदीला पूर आणतो...आणि समुद्राची लाट उर फाटून नेते...
...एकूण काय....एक अपेक्षाभंग...आयुष्य सैरभैर वगैरे.

5 comments:

श्रद्धा said...

:( :(

aai ashich asate na...

Shriraj said...

Anagha, Mla mahit nahi tu kutchya vivanchanet ahes, Pan kalji vatte tuziyabaddal. I know you can take care of yourself, but still I would say - take care Di

हेरंब said...

प्रश्नपत्रिका, जाळपोळ, घुबडकथा, सैरभैर !!!! काय चाललंय काय? allz well?

भानस said...

अगं काय गं हे... ?? :( :(

rajiv said...

नियम..एक चौकट !! प्रत्येक व्यक्ती...प्रत्येक नाते ..याला आपण चौकटीत ठोकून ठाकून बसवत असतो..
मात्र माणसाचे मन हे कुठलीच चौकट मानत नाही हे कधी आपण लक्षात घेणार ? ते स्वयंभू ते स्वयम्भूच राहणार !!