तसाही विचार करायला फारसा वेळबीळ मिळत नाही. आणि त्यातून कामाचा प्रकार असा
आहे की २४ x ७ डोकं लढवत बसणे भाग असते. जाहिरात क्षेत्रामध्ये कुठल्याही
कामाचा 'रिझल्ट' हा ताबडतोब दिसून यावा लागतो. म्हणजे जाहिरातीत जे काही
बोलले जाईल त्याच्याशी वाचक (प्रिंट मिडीया), श्रोता (रेडियो ) वा प्रेक्षक
(टीव्ही वा चित्रपट) हा त्वरित कनेक्ट व्हावयास हवा. समोरच्या माणसाच्या
भावनांना हात वगैरे. त्यामुळे प्रत्यक्ष एखाद्याशी बोलण्याचा प्रश्न
उद्भवला तर आपण जे काही बोलतो आहोत, ते समोरच्याला समजेल असे असावे.
त्याच्याकडून आपल्याला जी अभिप्रेत आहे ती कृती मिळवण्यासाठी काय प्रकारची
भाषा व काय बोलले पाहिजे हे जाणून घेण्यासाठी हा मेंदू तयार झाला आहे....वा
तयार होत आहे.
हल्ली माझ्यावर सार्वजनिक वाहनांचा लाभ घेण्याचे प्रसंग कमी येतात. त्यामुळे जिथे 'नियम पाळणे' ह्या आपल्या कर्तव्याची सर्वप्रथम परीक्षा होते ते बहुतांशी तरी माझ्याच हातात असते. आणि मी नियम तोडायला जात नाही.
हल्ली माझ्यावर सार्वजनिक वाहनांचा लाभ घेण्याचे प्रसंग कमी येतात. त्यामुळे जिथे 'नियम पाळणे' ह्या आपल्या कर्तव्याची सर्वप्रथम परीक्षा होते ते बहुतांशी तरी माझ्याच हातात असते. आणि मी नियम तोडायला जात नाही.
मात्र गेल्या काही दिवसांत ३ वेळा मला टॅक्सी करावी लागली. मग तीनही वेळा दार उघडून आत शांतपणे बसल्याबसल्या मी चालकाला चार गोष्टी सांगितल्या. सर्वात प्रथम मला नक्की कुठे जायचे आहे ते. दुसरी, तिसरी आणि चौथी गोष्ट...पहिल्यावेळी मी आधी मराठीत बोलून पाहिलं. मग लक्षात आलं की शेवटी मी जे काही बोलणार आहे ते फार महत्त्वाचं आहे...आणि ते समोरच्याला कळणे जरुरीचे आहे. समोरच्याला संवादाची भाषा हिंदी हवी होती...मग मी हिंदीत बोलले. माझ्या मुंबईच्या धेडगुजरी हिंदीत. पण ठामपणे.
"अब हम चार चीजें करेंगे...एक...हम खालीफोकट हॉर्न नही बजायेंगे...दो...हम एक भी सिग्नल नही तोडेंगे...तीन...हम झीब्रापे सवार नहीं होंगे...और लास्ट में...हम खिडकी के बाहर थुकेंगे नहीं."
"ठीक हैं...ऐसा ही होगा...!"
"धन्यवाद...!"
प्रत्येक वेळी होकारार्थी उत्तर मिळालं.
आणि त्या तीनही चालकांनी मला दिलेला शब्द पाळला...मी त्यांच्या गाडीत बसले होते तोपर्यंत.
निदान इतकं तरी पुरेसं आहे...नाही का ?
मी काही 'रिक्षा प्रदेशात' रहात नाही...पण हा एक प्रयोग त्यांच्यावरही करून बघायला हरकत नाही.
मला वाटतं...मी ज्या काही भाषेत बोलले...आणि जे काही बोलले...त्यातून समोरच्याला ठराविक कालावधी पुरती का होईना मला हवी ती कृती करावयास मी भाग पाडले.
हा प्रयत्न करून बघता येईल का तुम्हाला ?
15 comments:
Too good! I don't live in India right now. But whenever I go back I am going to do this. I liked this. -Vidya.
Mi nakkich asech vagen yapudhe... nantar chidchid honyapeksha ha nakkich changla upay ahe
उत्तम!
व्यापाऱ्यांनी व्यापारासाठी चालवलेला मोठा व्यापार अशी लोकशाहीची नवी व्याख्या
माझ्या अंगवळणी पडली आहे.माझे स्वतःचे अस्तित्व लोप पावले असून मी आता फक्त बाजारपेठेतील ग्राहक म्हणून उरलो आहे,
प्रयत्न चांगला आहे , मात्र नियम तोडणे आपल्याकडे भूषण समजले जाते , ट्रॅफिक सिग्नल आला की आपण कशी मामा उभा आहे का नाही ह्याचा अंदाज घेऊन कसा सिग्नल तोडतो व पकडल्यावर कशी तोडपाणी करतो ह्याचे रस भरीत वर्णन अनेकांकडून ऐकून ह्या निष्कर्षावर पोहोचलो आहे.
स्तुत्य प्रयत्न आहे.
मी नेहमी चालक मंडळींशी गप्पा मारते. त्यातून मग आपोआप ते असे सगळे नियम पाळतात. बरेचदा त्यांची तक्रार हीच असते की त्यांच्या गाडीत बसणारे लोक त्यांच्याशी अरेरावीने बोलतात. माणसाने माणसाशी बोलावे तसे बोलले तर गोष्टी सुरळीत होतात.
विद्या, आभार. जिथे शक्य असेल तिथे आपण करायला हवा ना प्रयत्न ? :)
श्रीराज, नक्की करून बघ. चांगल्या स्पष्ट शब्दांत सांगितलं तर ऐकतात माणसं आपलं...असा माझा तरी अनुभव आहे. :)
अभिषेक, आभार. :)
निनाद, मला पूर्ण कल्पना आहे तुम्ही जे लिहिलं आहे त्याची. पण जिथे आपल्याला शक्य आहे तिथे आपण प्रयत्न करायला हवा...नाही का ? त्यामुळे निदान आपण फक्त परिस्थितीबद्दल तक्रार करत राहिलो...शक्य आहे तेही केले नाही..असे विचार येऊन आपल्याला आपल्याच डोक्याचा त्रास नको व्ह्यायला ! नाही का ?
सविता, अगदी खरं ! 'माणसाने माणसाशी बोलावे तसे बोलले तर गोष्टी सुरळीत होतात'
:)
चांगला प्रयत्न आहे हा. सामंज्यस्याने बोलले तर तात्पुरते का होईना समोरचा ऐकतो हेही नसे थोडकेच. :)
खरयं. अगदी स्तुत्य.. सिक्किमला हे सर्व न सांगता पाळले जाते. तेच जरा खाली दार्जिलिंगला मात्र नाही. सर्व आपल्याइथल्याप्रमाणेच.
शेवटच्या दिवशी आलेला ड्रायव्हर पान / तंबाखु खाणारा होता.
पान खाया तो थुंकना नही| अगर थुकना है तो गाडी मे थुको बाहर नही| - राजीव काका.
लेकिन यहा कैसे थुकेंगे? मेरी गाडी खराब हो जायेगी ना| - ड्रायव्हर.
और बाहेर थुकोगे तो मेरि जमीन खराब हो जायेगी| इसलिये थुकना ही नही है|
बिचार्याने दिवसभर पानच नाही खाल्ले. हात शिवशिवत होते पण हॉर्न वाजवू शकत नव्हता तो...
ताई....सहमत...असा प्रयत्न सर्वांनीच केला पाहिजे तरच समाज सुधारेल.
atishay avadli tuzhi yukti ani prayatna
ha layi bhari prayog aahe :D :D :D hum bhi karega
Post a Comment