नमस्कार

नमस्कार

Pages

Tuesday, 11 December 2012

तीन...दोन...एक

स्वत:ला ओळखेओळखेस्तोवर अर्ध आयुष्य जातं...आणि जोडीदाराला पूर्ण ओळखतो असं मानून त्याच्यावर आपण आयुष्य सोपवतो !
कसला मूर्खपणा आहे हा !
सोळाव्या वर्षी...तळपत्या उन्हात देखील आकाशात इंद्रधनुष्य असतं...कुजक्या नाल्यात डवरलेले गुलाब दिसतात...!
अक्कलखाती आयुष्य जातं !

पानाला पिवळजर्द होऊन धारातीर्थी पडल्यावर कळत असेल काय....वर हे इतकं अथांग आभाळ पसरलं होतं...त्याच्या देखील नकळत...अचानक एखादी वीज त्याचे हृदय फाडून जाते...आणि तरी सुद्धा ते आभाळ जणू सर्व आलबेलच आहे असा आव आणून, पृथ्वीवर सावली धरून उभं रहातं !
कमाल आहे नाही का?
जाणवतं का कधी हे तुम्हांला ?

मला सध्या हे असंच सुचतंय !
काळजी नका करू...
मी आभाळाकडून बरंच काही शिकतेय !
:)



6 comments:

श्रिया (मोनिका रेगे) said...

होय, प्रत्येक अनुभवाचे शहाणपण गोळा करत हा प्रवास सगळेच आपण करत आहोत..
कडू गोड अनुभव येतच असतात..पण दुखाची तीव्रता जास्त जाणवते कारण ते नको असते. जे नको ते मुळापासून उपटून टाकता येत नाही.त्याला सामोरे जावेच लागते.काही अनुभव अचानक येणारे असतात,आणि अनपेक्षित असल्याने मग जर मनाविरुद्ध असतील तर त्रास होणारच न!
अश्या काही व्यक्ती आजवर भेटल्या ज्यांना खूप मोठी शक्ती दिली बाप्पाने असे वाटले मला. इतके मोठे कठीण प्रसंग त्यांना समोर आले. कित्येकदा डगमगणारे पाय सावरायला देखील कोणाचाच आधार नव्हता पण तरीही इतरांना आनंद देत आणि आपल्या अनुभवांबद्दल ब्र न काढता ताठ मानेने पुढे जात आहेत.
Life is strange but interesting!

Mohana Prabhudesai Joglekar said...

आपण फार गृहीत धरतो गोष्टी, अपेक्षा करतो उगाचच आणि चौकटीत बांधून टाकतो प्रत्येक गोष्टीला. खरं तर कुणी कुणाला ओळखत नसतं तरी दावा असतो एकमेकांचा, मी तुला ओळखतो/ओळखते. स्वत:चीच ओळख पटायला अर्धे काय पूर्ण आयुष्यंच घालवावं लागतं. जीवनातल्या चढ उतारांना तोंड द्यायचं/लढायचं अशावेळेस. दुसरं काय करणार?

Shriraj said...

Anagha, mla kadhitari asa vatta ki, jar apan khup shahanyasarkhe vaglo... ek hi chuk na karta... tar aple ayushya sukhi hoil ka?... mla tari vatte ki vedna ani dukhkha he apli pat nahi sodat... mi mage mhatlelo tasa... hya vishvat andhar prakashapeksha jast ahe

Anagha said...

मोनिका, खरंय तू म्हणतेस ते. :)

Anagha said...

मोहना, दुसरा इलाज असतोच कुठे आपल्यासमोर ? हो ना ? :)

Anagha said...

श्रीराज, अंधार नसेल तर आपल्याला प्रकाशाचे महत्व वाटेल काय ? तेव्हा हे असं सुख आणि दु:ख आयुष्यात येणारच...
आपल्या वाट्याला जे काही जितके दिले आहे तितके...
:)