नमस्कार

नमस्कार

Pages

Friday 12 October 2012

मावळते मावळे ?

"काही कळत नाही. लोकं पुन्हां पुन्हां शिवाजी महाराज, संभाजी महाराज...कर्ण ह्यांच्यावरील कथा कादंबऱ्या, बखरी का वाचत असावेत ?"
"म्हणजे काय ? ही पुस्तक पुन्हां पुन्हां वाचण्यासारखी असतात म्हणून !"
"पण त्यापुढे देखील इतिहास आहे. आपल्या देशाचा आहे. जगाचा आहे."
"मग ?"
"तसं नाही रे ! आपण शिवाजी महाराजांवरील लिखाणाची पारायणं करीत रहातो. ह्याचा अर्थ ते आपल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात झिरपत असतात."
"काय म्हणायचंय तुला ?"
"शिवाजी महाराज वा आपले त्यापुढील पुढारी...म्हणजे सुभाषचन्द्र बोस, आगरकर, वल्लभभाई पटेल....मी हीच नाव जाणीवपूर्वक घेतलीयत...कारण मी गांधीजी, टिळक वगैरे म्हटलं तर वेगळेच वाद सुरु होतील !....तर हे आपले नेते, दैवते...त्या त्या वेळी ज्याच्याविरुद्ध लढायची गरज होती त्यासाठी लढले...बरोबर ना ?"
"हो."
"मग आज आपल्यापुढे तसाच वा त्याहून मोठा प्रश्न उभा आहे...मग त्यासाठी आपण प्रत्येकजण ही आपली जबाबदारी समजून का लढत नाही ?"
"म्हणजे काय ?"
"अरे, म्हणजे त्यावेळी निदान आपल्याला परकीयांशी लढायचे होते...आता इथे आपल्याला स्वकियांशीच लढायला लागणार आहे. पण मग आपल्या रक्तात शिवाजी आहे ना मग तो उसळून का येत नाही ? ते फक्त पुस्तकी ज्ञान का रहाते ? म्हणजे इतिहास पाठ..आणि बाकी वास्तवात....वर्तमानकाळात अंधार...असे का ?"
"कळलं...कळलं तुला काय म्हणायचंय ते."
"जर शिवाजीमहाराज हे आपल्या विराट वृक्षाचे मूळ आहेत, तर मग ह्या वृक्षाच्या प्रत्येक पानाने, प्रत्येक फांदीने अगदी लहानशी जरी कीड आली तर ती झटकून टाकण्यासाठी वा तिचा नायनाट करण्यासाठी झटायला हवे आहे ! शिवाजी महाराज मुघलांशी लढले...टिळक, गांधीजी इंग्रजांशी लढले....ना. ग. गोरे, दुर्गा भागवत...आणीबाणीशी लढले...मग आपण काय फक्त मढं आहोत का ? आपल्या आईवडिलांनी प्रेतांना जन्म दिला होता काय ? भ्रष्ट्राचार समोर येऊन ठाकला की आपण त्याला साष्टांग नमस्कार का घालतो ? ते तीर्थ समजून आपल्या डोळ्यांना व माथ्यावर का पसरतो ?"
"मी एकदा आमच्या एका कामासाठी असा लढायला उभा रहात होतो यार...पण माझी बायको मला म्हणाली...उगाच नाय ते करायला जाऊ नकोस ! म्हणून मग मी नाही पडलो त्यात !"
"हम्म्म्म...म्हणजे बायकोच्या मुळांशी झाशीची राणी नाहीये वाटतं...की...आपली मुळंच मरत चाललीयत...?"

16 comments:

Gouri said...


आपल्याकडे कुठल्याही मोठ्या माणसाला दैवी अवतार बनवून टाकतात. म्हणजे ते मोठे होते म्हणून त्यांनी केलं, आपण काही करू शकत नाही असं म्हणायची मोकळीक.
मला वाटतं की प्रत्येक लढाई काही आपण लढू शकत नाही, काही वेळा सोडून द्यावं लागतं. पण काही लढाया तरी आपल्या समजून लढायला हव्यात आपण प्रत्येकाने.

Anagha said...

गौरी, मोठी माणसे छोटे छोटे लढे देतच मोठी झालेली असतात नाही का ? आपण जर चरित्रे, आत्मचरित्रे वाचली तर ते दिसतच की !

अनघा said...

अगदी अगदी...... हाच विचार येतो. शिवाजी, बाजीराव, मग गांधी, टिळक, सुभाषचंद्र असा इतिहास आहे....जेंव्हा उद्या आजचा इतिहास लिहिला जाईल तेंव्हा कोणाचे नाव लिहिले जाईल? अशी माणसेच आपल्या आसपास नाहीत का आहेत पण आपल्याला आज ती दिसत नाहीत वा तशी भासत नाहीत?

Anagha said...

अनघा, मला वाटतं...खरं तर अशी आजही अनेक माणसे आहेत ज्यांच्याकडे आपण तितक्याच आदराने बघू शकतो. मात्र त्यावेळी जशी प्रत्येकाने ते स्वातंत्र्याचं वेड घेण्याची गरज होती...आज तशीच गरज भ्रष्ट्राचारापासुनच्या स्वातंत्र्याची आहे...आणि ही अशी कीड आहे जी आता पावलोपावली आपल्यावर येऊन आदळते...त्यामुळे आता आपण प्रत्येकाने असं 'कोणी' बनण्याची गरज आहे.

aativas said...

आजही माणसं आहेत - लढताहेत - कदाचित त्यांची दखल भविष्यचं घेईल - वर्तमानाने नाही घेतली तरी!

Shriraj said...

Agdi barobbar bollis bagh!

Pankaj - भटकंती Unlimited said...

का वाचतो?
: प्रेरणा म्हणून. किंवा त्या व्यक्तिमत्त्वानं आपल्याला झपाटून टाकलंय म्हणून. शेवटी ही काय किंवा कुठलीच चरित्रे कुठल्या महापुरुषाचा "द परफेक्ट पर्सन" असा उल्लेख करीत नाहीत. त्यांच्यातही आपल्यासारख्याच इम्परफेक्शन्स असतात आणि आपल्याला म्हणूनच ही पुस्तकं अधिक जवळची वाटतात. ‘श्रीमानयोगी’च्या नरहर कुरुंदकरांनी लिहिलेल्या प्रस्तावनेतही इम्परफेक्शन्सचे काही अंश आढळतात.

उपयोग काय?
: परत तेच. ‘प्रेरणा’. आता उदाहरणच द्यायचं झालं तर तुझ्याच गेल्या दोन पोस्ट्स बघ. निषेध आणि अकलेचा उकिरडा. आपल्याला हे सुचलं म्हणजेच आपण जे वाचतो त्याचा फायदा होतोय. किमान वैचारिक पातळी काही मायक्रोमीटरने का होईना वर जाते आणि आपण आपल्या पातळीवर ते बदलण्यासाठी काही का होईना प्रयत्न करतोय ना?

Shriraj said...

Pankaj, chan samjavun sangitles bagh tu tuze mhanne. Thembe thembe tale saache. Aplyala eka zatkyat badal have asle tari practically te shakya nahi. Changle badal ghadayla vel ha lagnarach. Fakt apan prayatna karat rahila pahije

हेरंब said...

अगदी पटलं.. यालाच थोडंफार समांतर मागे लिहिलेलं.

http://www.harkatnay.com/2010/12/blog-post_13.html

Bharatiya Yuva said...

Khupach Chhan.....
Awadale.....
Khalil Msg Dyayala aalo hoto...pan...pahilech post Awadale...
मराठी ब्लोगर्स साठी सुवर्ण संधी..
आपला मराठी ब्लॉग ... http://www.marathiblogs.in/ वर जोडा
आणि 4 जीबी चा पेनड्राइव जिंकण्याची संधी मिळवा.
जगातील सर्वात मोठ्या मराठी ब्लॉग्स च्या नेटवर्क मध्ये सहभागी व्हा..

Anagha said...

सविता, खरंच अशी अनेक माणसे आहेत जी लढत आहेत. आपल्या समोर त्यांना आणले जात नाही.
मला वाटतं उगाच नकारार्थी रट लावण्याऐवजी आपल्या समोर जर कोणाचे लढे आणले गेले तर एक हुरूप येईल. त्यात आत्मप्रौढी नसावी तर 'हा माझा अनुभव...मी हा असा लढलो/लढले...तेव्हा कधी तुमच्यासमोर असे काही आले तर तुम्ही देखील लढू शकता...'अशी भावना असावी. वर्तमानकाळाने देखील त्यांची दाखल घ्यायला हवी. कारण लढण्याची भावना रूजत जाणे हे महत्त्वाचे. जसा स्वातंत्र्याचा लढा हा प्रत्येक भारतीयाचा होता तसाच हा लढा प्रत्येकाने आपापल्या परीने लढायला हवा. 'दुसरा कोणीतरी लढेल' असे करून कसे चालेल...असे मला वाटते.

Anagha said...

पंकज,
बरोबर आहे. प्रेरणा मिळून आपण त्यातून काही शिकत असलो...ती धग घेऊ शकत असलो तर तेच आज गरजेचं आहे. नाहीतर हल्ली लोकं तक्रार करताना दिसतात मात्र स्वत:वर जेव्हा वेळ येते तेव्हा लढणाऱ्यांचे प्रमाण हल्ली कमी दिसून येते.
आणि माझे इथेतिथे चालू असलेले साधेसुधे लढे म्हणशील तर ती देण माझ्या बाबांची आहे ! ते सनदशीर मार्गाने सतत लढत असताना मी त्यांना बघितलं आहे. :) :)

Anagha said...

श्रीराज, बदल एका झटक्यात नाही होऊ शकत. मात्र ही प्रत्येकाची जबाबदारी आहे एव्हढे जरी समजून घेतले आणि प्रसंगाला खंबीरपणे उभे राहिलो तरी खूप झाले. :)

Anagha said...

हेरंबा, तेव्हाही मी हेच म्हटलं होतं ना ? :)

Anagha said...

भारतीय युवा, धन्यवाद.

भानस said...

अन्यायाला शरण जाऊन पुढे चालत राहण्याची वृत्ती भिनून गेली आहे मनात. जर स्वत:साठीही लढायची तयारी नाही तर मग सामाज-देश वगैरे लांबवरच राहीले की.

कधीकधी प्रेरणेतून याचा जन्म होऊ शकतो किंवा अतिरेक दु:खातून. तक्रार करणे हा जसा ’ स्थायीभाव ’ आहे तसा लढणे हा किमान ’ अपवाद ’ तरी असावा.