मज...
सोनेरी चाफ्यास रातराणीसम गंध हवा...
त्या क्षितिजावरल्या इंद्रधनूसी कोकिळेचा गळा हवा
मज...
वेड्याखुळ्या पाऊसथेंबांत मोरपिशी छटा हव्या...
उसळत्या समुद्राला धीरगंभीर तळ हवा
सोनेरी चाफ्यास रातराणीसम गंध हवा...
त्या क्षितिजावरल्या इंद्रधनूसी कोकिळेचा गळा हवा
मज...
वेड्याखुळ्या पाऊसथेंबांत मोरपिशी छटा हव्या...
उसळत्या समुद्राला धीरगंभीर तळ हवा
मज...
गर्द निळ्या आकाशाला कधीतरी अंत हवा...
दुधाळ वाटोळा चंद्र नितळ हवा
मज...
आयुष्याच्या जोडीदारात उबदार सखा हवा !
10 comments:
अनघा, कल्पना विलास रम्य आहे.
पण आपल्यला हवे ते सगळेच काही त्या निसर्ग निर्मात्याला मंजूर नसते.
तो काही देतो..काही राखून ठेवतो.
" आपण जेव्हा जोडीदार निवडतो ...तेव्हा आपण अननुभवी असतो ..व अनुभवी होतो तेंव्हा वेळ निघून गेलेली असते..."
व.पु. काळे 'काही खर..काही खोटं' मध्ये लिहितात !!
हवे हवे हवे.. :)
भक्ती, शेवटचा हट्ट हा मुळात त्या पहिल्या सगळ्या हट्टांइतकाच वेडा हट्ट आहे...हे हळूहळू आयुष्य जगता जगता कळत जातं.....कळून चुकतं.
राजीव, :)
हवा हवा ए हवा ;)
हट्टी आहेस! :D
हवा हवा हवा... वाह वाह वाह!!!
>>> आयुष्याच्या जोडीदारात उबदार सखा हवा...
खूप आवडले... :-)
मस्त...
शेवटचे मागणे मिळणे काही अगदीच कठीण नाही... फक्त माणूस ओळखता आला पाहिजे (मला माहितेय माणूस ओळखणे अगदी सोपे ही नाही; पण प्रयत्न केल्याने तशी व्यक्ती मिळणे कठीण नाही.)
आणि विघातक भावकवितांना प्रेरणा असलेला चंद्र , मी उकळत्या डांबरात बुडवतो.
डांबर फासून मी निषेधितो हे सूर्याच्या बांधिलकीचे घृणास्पद षड्यंत्र..
Post a Comment