नमस्कार

नमस्कार

Pages

Wednesday, 6 June 2012

अलिबाबा आणि चाळीस चोर

महिन्याभरापूर्वी घरचा मॅ अकस्मात क्रॅश झाला. त्यावरील वर्ष दीड वर्ष साठवलेली सर्व कामे आणि सगळे फोटो उडाले. ते सगळे परत मिळण्याची शक्यता क्षीणच.
मॅकचे जसे काही ब्रेन हॅम्रेज झाले. मैं कौन हूँ...मैंहाँ हूँ वगैरे. आणि कोणत्याही उपायाने त्याची स्मरणशक्ती काही मी त्याला परत मिळवून देऊ शकले नाही. आणि ह्या त्याच्या आजारपणात माझ्या आयुष्यातील २ वर्षे देखील अकस्मात पुसली गेली. छायाचित्रांच्या रूपात जमवलेली.

"बॅकअप नाही का घेतलेला ?" एका अनुभवी मित्राने विचारले.
"नाही."
दोन माणसांच्या नात्यात, बहुतेकवेळा तरी एका माणसावर; ते नाते जपण्याची जबाबदारी अधिक असते. तसेच माझ्या व मॅकच्या आधुनिक नात्यात ही जबाबदारी 'मॅक' ने स्वीकारली होती. आणि मी त्या नात्याची तिळमात्र देखील काळजी न घेतल्याने मॅक संतापला. व त्या संतापाच्या भरात अतीव रक्तदाबामुळे त्याचे ब्रेन हॅम्रेज झाले. ह्यात नुकसान कोणाचे झाले ? तर माझे. वेळीच जबाबदारीने वागले असते, त्याची आब राखली असती, तर हे असे नसते झाले. तो रात्रंदिवस माझ्यासाठी राबतो आहे हे लक्षात घेतले असते, त्याला त्या कामात थोडा हातभार लावला असता तर हे नाते नक्कीच अधिक काळ जपले गेले असते.
मॅकला कधीही काहीही होत नाही. हे त्या अनुभवी मित्राचे म्हणणे होते. त्यामुळे तू warranty extend करण्याच्या भानगडीत पडू नकोस. पैसे वर आलेत का ? असेही तो म्हणाला होता.
माझे नशीब बलवत्तर म्हणून मी त्याचे हे म्हणणे दुर्लक्षिले होते. एका महिन्यापूर्वीच मॅकचा विमा उतरवला होता. त्यामुळे त्याच्या शरीरात निदान दुसरा मेंदू बसवता आला. विना खर्च. आणि त्याचे शरीर पुन्हा काम करू लागले. दिवसरात्र.
आता निदान मला शहाणपण येईल व मॅकच्या नव्या मेंदूवर फार भार न टाकता, त्याला बाहेरून दुसरा एक आधार नक्की देईन.
हे अनुभवानंतर आलेले शहाणपण.

संकटं म्हणजे जसे 'अलिबाबा आणि चाळीस चोर' मधील रांजणात लपून बसलेले चोर.
अदृश्य रांजण...अदृश्य संकटं.
उकळतं तेल ओतून त्यांना मारून देखील टाकता येत नाहीत.
गुपचूप एक चोर वर येतो, त्याला नेस्तनाबूत करून पुढल्या रस्त्याला लागावं तर तोपर्यंत दुसरा मान वर काढतो.
कधीकधी एकाच वेळी दोनतीन चोर रांजणाबाहेर झेप घेत रहातात.

ज्यावेळी 'मल्टी टास्किंग'च्या जोशात आपण असतो, त्यावेळी संकटे देखील 'मल्टी डिरेक्शन्स'मधून झेपावत रहातात.
आईच्या भूमिकेत असताना एक प्रश्र्न, मुलीच्या भूमिकेत शिरावे तर दुसरा प्रश्र्न, आणि नोकरदाराच्या भूमिकेत अजून दहा प्रश्र्न.
दहा दिशा...आणि अंगावर झेपावणारा...दशमुखी सर्प.
आणि त्याच्या विरोधात दोन हात...दोन पाय...
आणि एकमात्र डोकं !

21 comments:

हेरंब said...

मला वाटलं तू मॅकवर उकळतं तेल ओतलंस की काय ;)

सौरभ said...

:D :D उकळतं तेल lol :P

सौरभ said...

btw Alibaba always wins :D

Pankaj - भटकंती Unlimited said...

SSD बसव ना मॅकाच्या पोटात. आणि एक बॅकअप डिस्क घे.

Suhas Diwakar Zele said...

हा हा हा हा... हेओ :) :)

Deepak Parulekar said...

पासवर्ड काय आहे तुझ्या मॅक चा ?
मक्या मक्या दार उघड की राव...
:D:D:D:D

rajiv said...

ते सगळे चोर....एक-एक करून पळत सुटत असतील ना..."आली-बाई' म्हणून .. घाबरून :)

अपर्णा said...

तरी ती ठामपणे एकमात्र डोकं असं तरी म्हणतेस......
मला तर माझ्या बाबतीत मल्टिटास्किंग करताना बरेचदा डोकं पण गमवल्यासारखं होतं ....:P

हेओ :D :D

Raindrop said...

backup ka backup bhi rakhna chahiye. vichar kashala?? Once I erased things from my comp thinking backup is there and then that backup disk only crashed :)chor bahut chalu hai...

Panchtarankit said...

तहान लागल्यावर विहीर खोदणे हा मानवी स्वभाव आहे.
ही म्हण लहानपणी आपण सर्वांनी वाचली आहे.
पण त्याच सोबत कळते पण वळत नाही ही सुद्धा ...

Shriraj said...

@ Saurabh :)

@ Heramb :D

अनघा, ट्रान्सप्लान्ट करून की होईना मॅक-काका वाचले ना... ते जास्त महत्त्वाचे! :)

Anagha said...

'मॅक'वर उकळतं तेल ?! हेरंबा ! :D

Anagha said...

सौरभ. :D

Anagha said...

पंकज, बॅकअप डिस्क हेच उत्तर काढले आहे. :)

Anagha said...

दीपक, आता सगळं काम त्या त्या वेळी हार्ड डिस्कवर सेव्ह करत जाणार आहे ! हार्ड डिस्क मॅकच्या डोक्याबाहेर मात्र ! :) :)

Anagha said...

सुहास, बघ ना, तेलच ओतलं ह्याने मॅकच्या डोक्यावर !
:) :)

Anagha said...

राजीव ! :D

Anagha said...

अपर्णा, हे मात्र खरं ग बाई !

Anagha said...

वंदू ! हे मात्र फारच गं ! कशाचा म्हणजे कशाचाच भरवसा नाही ! :(

Anagha said...

हम्म्म्म....खरंय निनाद. :( :)

Anagha said...

श्रीराज, आता मॅकच्या रिकाम्या डोक्यात पुन्हा सगळं भरतेय मी ! :) :)