चोवीस वर्षांपूर्वी तिला गुंडाळून माझ्या डाव्या हाताला आणून ठेवलं गेलं त्यावेळी माझं धाबं दणाणलं होतं.
हलक्या गुलाबी मऊ कापडात गुंडाळून, त्याच रंगाचं टोपरं गुंडाळलेलं माझं बाळ. हातपाय आत गुडूप. वरती डोकं. ते देखील तळहाताएव्हढंच. टोपऱ्यात झाकलेलं. दोन डोळे, एक नाक, ओठ...झालं...एव्हढंच काय ते दृष्टीस. डोळ्यांची उघडझाप. कापडाच्या आत हालचाल चालू आहे हे वर कापडाला मधूनच येणाऱ्या उंचवट्यांवरून कळत होतं. आता काय करायचं ? हा असा सुरवंट बाजूला घेऊन झोपायचं कसं ? आपला हात त्यावर चुकून पडला तर ? बाळ घुसमटलं तर ?
एक जीव आपण वाढवू शकतो असे स्वप्नात देखील वाटत नव्हते. आणि ह्याची खात्री नसताना आपण ह्या जीवाला जगात आणायचे धाडस केलेच कसे हा प्रश्र्न तो जीव बाजूला आल्यावर पडला.
"आई, आज माझी शेवटची परीक्षा."
M.A.
लेकीचा शेवटचा पेपर. त्या तिच्या शेवटच्या प्रश्र्नपत्रिकेमागे माझ्या असंख्य प्रश्र्नपत्रिका. अनेक परीक्षा.

तिचा हातात आलेला इवलासा हात...त्यात तिने धरलेली पेन्सिल...गादीवर पसरलेली चारपाच पुस्तके...एखादी वही....इतिहास, भूगोल...गणित...इंग्लिश...रात्रभर बसून तिच्या परीक्षेआधी तिला सरावासाठी तयार करून दिलेल्या प्रश्र्नपत्रिका. एकेका वर्षाबरोबर वाढता पसारा. खोलीतला तावांचा उडता खेळ...वेगवेगळे रंगीत मार्कर्स...भराभर उंचावणारा पुस्तकांचा डोंगर. नकळत कधीतरी इतिहास, भूगोल खिडकीतून बाहेर पडले...आणि दरवाजातून फ्रॉइड आत शिरला...आणि मग मला त्या पुस्तकांतील काही कळेनासे झाले.
अस्ताव्यस्त पसरलेले खेळ उचलणे वेगळे आणि ही अशी ज्ञानाने फुगलेली पुस्तके आवरणे वेगळे.
"आई, हे तुझं पसारा आवरणं थांबव पाहू ! मग मला काहीही मिळेनासं होतं ! मी आवरेन एकदाच काय ते ! परीक्षा झाली की !"
कधीकधी असेही वाटतेच...खेळण्यांचा पसारा होता ते घर गोजिरवाणं दिसत असे...आणि आज ग्रंथांच्या पसाऱ्यात घर बुद्धिवान दिसू लागलं आहे.
घर आपलं आनंदीच.
पहाटे पाच वाजता, दुचाकीवर बसून दोघी अंधेरीच्या दिशेने निघायचो. पावसापाण्यात. उन्हातान्हात. दिवसातून दोनदा. वयाच्या पाचव्या वर्षापासून बॅडमिंटन खेळणाऱ्या लेकीसाठी, गुरूच्या शोधात आम्हीं मायलेकी शेवटी अंधेरीला पोहोचलो होतो. अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स. पहाटे लेकीचं शारीरिक शिक्षण व 'स्ट्रोक प्रॅक्टिस' असे. दुपारी 'गेम प्रॅक्टिस'. आठवतं...एकदा साडेपाचच्या सुमारास काळोखातून सखोल रस्ता कापत असता एक खड्डा नजरेतून निसटला. आणि दोघी अंधारात भुईसपाट झालो.

जीवनात हारजीत अटळ असते. आपण सर्व ताकदीनिशी सतत लढावयाचे असते...एका खेळाने हे एक जीवनोपयोगी तत्व आम्हां दोघींना शिकवले.
'सिंगल पेरेन्ट' म्हणून मिरवावे लागेल असे कधी वाटले नव्हते...आणि असे काही करायची हौस देखील नव्हती. देवाने ते करायला मला भाग पाडले.
लेकीची ज्युनियर शाळेतील अॅडमिशन घ्यायला देखील एकटीनेच जायचं होतं...आणि तिला तिच्या M.A. शेवटच्या पेपरसाठी सोडायला देखील एकटंच जायचं होतं. मग आयुष्यात नवरा नक्की आणला कशाला होता...हा असला प्रश्र्न, चोवीस वर्ष सतत बरोबर राहिला. आपल्याला मुलं होऊ शकतात ह्याचा त्याला फक्त पुरावा हवा होता काय असेही वाटू लागते...
असो...गेलेल्या माणसाबद्दल वाईट बोलू नये असे म्हणतात.
आज सगळ्या अडीअडचणींना दूर लोटून, लेकीचं शिक्षण पुरं करू शकले...तिला स्वत:च्या पायावर खंबीरपणे उभं रहाण्यास मदत करू शकले...हे मला स्वत:ला दिलासा देणारं.
'उंच माझा झोका'तली ती चिमुरडी रमा...तिचे ते काळी पाटी हातात धरून अबकडई गिरवणे...
माझी ही रमा...जे मागेल ते शिक्षण, ज्या कुठल्या देशात म्हणेल तेथे...मी तिला देऊ शकले...हे धडे माझे...
मला 'जगणे' शिकवणारे.

31 comments:
तुझ्या प्रत्येक पोस्टवर प्रतिक्रया काय द्यायची म्हणून प्रत्येक वेळी प्रतिक्रिया द्यायची टाळत होतो.
नेहमी एवढ सगळ जीवनसार सांगत असतेस ... तेव्हा नुसत पोस्टला मस्त म्हणून प्रतिक्रिया पण योग्य वाटत नव्हत .. पण असो ... :)
प्रत्येक पोस्ट साठी :-
तुझे धडे नेहमीच 'जगणे' शिकवणारे आहेत .....
तू ना थोडक्यात जीवनाचे सार सांगून जातेस
लई भारी
सचिनभाऊ +१
काय बोलायचं अजून..
ता.क. - सायकॉलॉजी विषय होता काय? बेस्टच! :)
मस्तच लिहिता तुम्ही....लेख असा असावा कि मन हलकं पण व्हावे आणि त्यातून काही शिकायला पण मिळावे...तुमचे लेखन आवडते...
तुम्हा दोघा मायलेकींना एकत्र बघितलं की वाटतं तुझी रमाच तुझी आई आहे.. :)
दोघींना एकत्र हसताना खिदळताना, बोलताना पाहिलं की खूप बरं वाटतं..
रमाला खूप खूप शुभेच्छा आणि तुझं खूप खूप कौतुक.. :D:D:D
R.E.S.P.E.C.T.
as a Lady
as a Daughter
as a Mother
as a Writer
as a Teacher
as a Friend
as a Person
Respect to Anagha Nigwekar ^:)^
(ahh.. did I miss anything? please add) ;)
ohh.. and heartiest Kongrachyulashansss :D :D nacho \:D/
mothers's day chya don divas adhi tumachi post lekivarchi..... aha ha. dughasharkar yogach mhanayacha.
Happy Mother's day in advance.
अनघा, मोठ्ठी परीक्षा पास झालीस ग!
ओ अनघाबाय काय सेंटी होताय, आणि आम्हालाही करताय हो :)
वरच्या प्रतिक्रीयांमधे बघ सगळ्यांनी बरच लिहीलेय .... आणि वेगळं काय लिहू ??
तू नं एक मस्त खंबीर ’आई’ आहेस बयो ... तूझी रमा अशीच खूप मोठी होइल ... खूप शिकेल तिच्या आईकडून...
Anagha, mothers day chya khup khup shubhechha ...
Sachin +100 baki bolti band.....:)
Good luck to Rama...:)
'my mommy bestest' ....I have an sms from M to prove it but u have a well brought up M to prove it :)
जीवनगाणे!
:(
:)
रमाला आमच्या शुभेच्छा पोचव. आणि मग काय प्लॅन केलाय सुट्टीचा?
छान वाटले... बऱ्याच दिवसांनी तू लिहिलेले वाचायला मिळाले :)
सचिनची प्रतिक्रिया अगोदर वाचली असती तर बरे झाले असते :P
सचिन, खरं तर धडे म्हणून नाही लिहित...पण इतकं काही घडून गेलंय की एकेक प्रसंग हा एकेक धडा होतोय. :)
योगिनी, आभार गं. :)
:)
सायकॉलॉजी ...हो रे विद्याधर. मला त्यामुळे बरेचदा लेक्चर्स ऐकावी लागतात !!! :D
श्रिया, धन्यवाद. :)
:D अगदी अगदी हा दीपक ! माझी रमा ही माझी आईच असल्यासारखी वागत असते !! :) :)
आणि धन्यवाद ! :) :)
सौरभ, :) :)
हेरंबा, :)
:(
श्रद्धा, आभार !!! :) :)
गौरे, मला पण असंच वाटतंय गं बाई ! :)
तन्वे, सेंटी :)
कसली खंबीर आणि कसलं काय ! :) :)
सविता, :)
तुलाही गं अपर्णा...इतक्या उशिराने पण !
रमाकडून, धन्यवाद ! :) :)
वंदू, :) :)
पंकज, आभार. :)
आणि कसले प्लान आणि कसलं काय ! एक सिक्कीमचा प्लान केला होता तो पण नाही तडीस गेला ! राबराब राबणं चाललंय हापिसात ! :(
:) :)
श्रीराज, लिखाण नियमित होत नाहीये ना सध्या ? हम्म्म्म :(
:)
खरे आहे!! पण माझीही परिस्थिती फारशी वेगळी नाही. नवीन घरातली आवरा-आवर अखेर काल पूर्ण झाली. आता वेळ मिळेल तसा मी लिहित सुटणार आहे. बरेच दिवस मी हातात लेखणी घेतलेलीच नाही.
खेळण्यांचा पसारा मग पुस्तकांचा पसारा आणि लवकरच लग्नाच्य खरेदीचा... :) मग तुझी मुख्य चिंता मिटेल.. कसे!!!
Post a Comment