चारशेवी पोस्ट....
ह्या पोस्टनंतर एक वेगळीच गोष्ट घडली...म्हणजे मी लिहिताना १२९ मित्र मैत्रिणी होते...आणि म्हणून मी तसं लिहिलं पण होतं ना पोस्टमध्ये ! पण लिहून पोस्ट केल्यावर एका दिवसात तो आकडा घसरला आणि एकदम १२८ झाले...म्हणजे मग मला त्या पोस्टमध्ये जाऊन एकदम बदलच करावा लागला....१२९ वरून १२८ !
एकाशी/एकीशी मैत्री तुटली !
का बरं ?
आणि कोणाशी बरं ?
लहानपणी काहीतरी कुठेतरी भांडण होत असे आणि एकदम कट्टी घेतली जाई.
म्हणजे एकदम...कट्टी तर कट्टी...बारंबट्टी...बारा महिने बोलू नको...लिंबाचा पाला तोडू नको...आमच्या घरी येऊ नको ! हे असं काही तरी. म्हणजे जिच्याशी कट्टी घ्यायचीय ना तिची करंगळी आणि माझी करंगळी...एकमेकांत गुंतवायच्या आणि गोल फिरवायच्या...म्हणजे जर खूपच राग आला असेल ना तर तुम्हीं एकदम जोरात पिळू शकता...म्हणजे तिला अगदी दुखायलाच पाहिजे...त्या कट्टीची आठवण कशी आयुष्यभर लक्षात रहायला हवी !
कट्टी चालू राहू शकते एखाददुसरा दिवस...तो एखाददुसरा दिवस किती जड...किती दु:ख.
मग जेव्हा ही जीवघेणी कट्टी संपवायची असेल ना त्यावेळी मधलं बोट आणि त्याच्या जवळचं बोट असं पुढे करायचं दोघींनी...आणि एकमेकांना स्पर्श करायचा....म्हणजे मग झाली बट्टी ! आता बोलू शकतो आपण !
एक मात्र आहे...त्या अबोल्यात एक नक्की होतं...मला माहित तरी असायचं ना की कोणी माझ्याशी कट्टी घेतलीय !!
ह्या नेट प्रकरणात ते पण कळत नाही !
म्हणजे आता कोण माझ्याशी बोलत नाही...हेच मला कळत नाहीये !
कोणाशी माझी मैत्री तुटलीय तेच मला माहित नाहीये !
हे असं बरोबर आहे का ??
:(
:)
14 comments:
हो ग... मला वाटायचं 'इधर अपने मर्जीसे आ तो सकते है, लेकिन जा सकते है खाली अनघा भाई के मर्जी से'
माझा भाऊ (अनिकेत; Follower no. 127) तर आहे.
मग कोण गेला?! कोण आहे रे तो?
अनघा, माझ्याशीपण कुणीतरी कट्टी घेतलीय परवापासून. :)
काय माहित कोण गेला, पण म्या फॉलो करत नव्हतो. आज सुरु केलंय फॉलो करायला. सॉरी :)
झाले का परत १२९? :) :)
arrrr!!!
माझ्या ब्लॉगवरही सेम झालं आज. कालपर्यंत २१८ लोक्स होते.. आज २१७ दिसतायत :(
:D :D श्रीराज !
आणि अनिकेत भाऊ ना तुझा ? वाटलेलच मला ! :)
गौरी, कोण बरं ते आपल्या सगळ्यांशी कट्टी घेणारं ??? :) :)
सुहास, तू फोलो नव्हतास करत ?? हे नव्हतं मला माहित ! आणि तू करायला लागलास म्हणतोस तर गाडी अजून १२८ डब्यांचीच कशी काय राहिलीय ?? :D :D कुछ तो झोल है !
:( :( बघ ना सौरभा ! एक डबा राहिलाय कुठेतरी !! :D
अच्छा ?! असं काय ते हेरंबा ?! :(
maybe ur follower has become your secret admorer now ;) and doesn't wish that you should know how ofter he/she visits ur page ;)
आईई गं ! वंदू ! :D
कोण तो/ती ? कळलं का?
and on a side (light) note,the thing is you did not know everyone who followed u....:P (आता मला फटके पडतील...)
लगता है गुगलोबाकी गिनती में कुछ गलतीसे मिस्टेक हो गयी है!!!!
Post a Comment