नमस्कार

नमस्कार

Pages

Thursday, 10 November 2011

नोंद

एक भला मोठा मग
त्यात दोन चमचे साखर
साखर टाकताना नाही पण साखर टाकता क्षणी लक्षात आलं
आत एक मुंगी होती
इथेतिथे फिरत असावी
रोजची लगबग चालू असावी

आता येईल मग येईल
साखरेच्या ओझ्याखालून मुंगी बाहेर येईल
तब्बल एक मिनिट डोळे लावून
मी तिची वाट बघितली
पण नाही
मुंगी वर नाही आली

मी त्यावर कॉफी टाकली
गरम पाणी टाकून कॉफी घोटाळली
स्मशानभूमीची कॉफी मी पिऊन टाकली

एक ध्यानी आले
'त्याचे'ही तसेच असावे
वरती बसून खाली बघावे
एक मरतो
एक जन्म घेतो
रोज उठून त्याचे काय सोयर सुतक पाळावे
फक्त एक नोंद करावी....
'तिचे चांगलेच झाले....
सुखाचा अतिरेक झाला...
आणि सुखाच्या ओझ्याखाली वेडी मुंगी मरून गेली'

21 comments:

श्रीधर जहागिरदार said...

आवडली .. नोंदणी पुरतच आयुष्य ही संकल्पना मनाला भिडली

nileshnaik said...

Excellent :)

हेरंब said...

अप्रतिम... शब्दातीत !!!

प्रचंड प्रचंड आवडली ही कविता.. ही कल्पनाच एकूण !! ग्रेटेस्ट वर्क !!!!

सौरभ said...
This comment has been removed by the author.
सौरभ said...

:D

Anagha said...

जहागिरदार साहेब...मनापासून आभार. :)

Anagha said...

निलेश भाऊ...आभार. :)

Anagha said...

हेरंबा, :) :)

Suhas Diwakar Zele said...

बाप रे... !!

काय गं सगळं ठीक नं? ;-)

मस्करी करतोय.. सुंदर झालीय कविता... एकदम साखरेच्या डब्यात पडल्याचा भास झाला.. सुंदर गं!!

Anagha said...

सौरभा... :D

Anagha said...

सुहास, ठीक आहे रे सगळं.
सकाळी सकाळी माझ्यामुळे एक मुंगी मेली....आणि माझ्या डोक्यात हे चालू झालं... :)

Gouri said...

अनघा, सुंदर पोस्ट, आणि थॅक्यू बरं का ...
काही दिवसांपूर्वी नेहेमीसारखीच अचानक वीज गेली आणि एकटीच मेणबत्ती लावून घरात बसले होते. एक पतंग मेणबत्तीकडे झेपावत होता. त्याला बरंच समजावायचा प्रयत्न केला, बाबा रे, हा सूर्य नाही - साधी मेणबत्ती आहे. मेणबत्तीला आयुष्याच्या केंद्रस्थानी धरशील, तर तुझा ऍंगल चुकेल. उगाचच जळून जाशील, आणि मेणबत्तीही विझेल. त्याला काही पटलं नाही. शेवटी जे व्हायचं ते झालंच. ऑफिसच्या वाटेवर त्या पतंगाच्या वेडेपणाने जिवाचा आटापिटा करून एकमेकांना ओलांडत चाललेली वाहनं बघितली, म्हणजे मला असं वाटतं की वरून तो पण असाच म्हणत असेल ... बाबांनो, इतक्या जोरात चाललाय, पण तुमचा ऍंगल चुकतोय. उगाच जीव गमावाल आणि माझा प्लॅनही खराब कराल :D:D
तर अगदी हेच, नेमक्या शब्दात इथे मांडलंय म्हणून थॅंक्यू ... आता मला हे न पोस्टायला निमित्त मिळालंय ;)

Anagha said...

गौरे ! कारण शोधू नकोस ! :D
झकास पोस्ट आहे ही पतंगाची ! चल ! लिहून टाक पाहू ! असं समजू की आपल्या मराठीच्या बाईंनी आपल्याला हा एक विषय दिलाय ! आणि म्हणून आपण दोघींनी त्याच विषयावर वेगवेगळे दोन निबंध लिहिलेत ! आहे काय आणि नाही काय ! :D

Raindrop said...

beautiful!!! chhoti si notification and the world keeps going round n round n round....sundarach!!

Anagha said...

:) वंदू....

aativas said...

आपल्याला आपण केंद्रस्थानी वाटतो ...पण तस काही नसत याची (पुन्हा एकदां) आठवण करून देणारा प्रसंग मांडलात तुम्ही इथ!

Shriraj said...

हा एक आगळाच अर्थ तू उलगडून दाखवला आहेस .

मला नवल वाटतंय हे पोस्ट माझ्या नजरेतून कसे सुटले होते

Anagha said...

सविता, ब्लॉगवर स्वागत.
आणि एकमेकींना अहोजाही करणे टाळता येण्यासारखे आहे काय ? टाळलं तर बरं होईल असं मला तरी वाटतंय. :)

धन्यवाद प्रतिक्रियेबद्दल. :)

Anagha said...

असं मला नेहेमी वाटतं रे श्रीराज, आपण कसली धडपड करत असतो जगण्याची...आणि तसं बघितलं तर पृथ्वीवरील माणसाच्या इतक्या अवाढव्य प्रजेत आपण कोण ? आणि कसली आपली कथा ?
मग अगदी काही भव्य दिव्य करता नाही आलं तरीही समाजाला उपद्रव निदान नाही दिला तरी खूप झालं असं म्हणेन मी....
:)

आनंद पत्रे said...

परवाच हीट मारून दहा कॉक्रोचेस मारले.. अजिबात साखरेत पडू दिलं नाही :P :P :P :D

Anagha said...

हेहे ! आनंद !!!! :D
तुला माहितेय ना....पृथ्वीवरची इतर सर्व जीवसृष्टी नाहिशी झाली तरीही झुरळं मात्र जिवंत रहाणार आहेत !! :D