नमस्कार

नमस्कार

Pages

Sunday, 6 November 2011

चांदण्यात फिरताना...


सहज आशा भोसल्यांची सीडी टाकली...मॅकच्या पोटात...आणि हे गाणं सुरु झालं...
कस्सलं रोमँटिक गाणं आहे हे ! आणि तितकंच फसवं !
हे असलं वेडं गाणं वयाच्या सोळाव्या सतराव्या वर्षी ऐकायचं आणि मग त्या वेड्याखुळया वयात वाटायला लागतं, खरंच सगळं जग असं सुंदर असतं आणि हे असंच चांदण्यात फिरतफिरत आपण आपला संसार करणार असतो ! आणि मग डोकं फिरतं ! म्हणजे अगदी स्वप्नबिप्न ! चांदणी रात्र....हातात हात.....हळूवार क्षण आणि हळूवार स्पर्श !
बोडकं माझं ! धादांत थापा आहेत ह्या !
असलं काहीच नसतं ! रात्र चांदणी नक्की असते...आपल्या कडेवर आपलं चिमुकलं  बाळ असतं...आणि आपल्या आयुष्याच्या साथीदाराचा मित्र त्या रुपेरी समुद्रावर आपला फायदा घेऊ पहातो...आपला जोडीदार तर पिऊन टाईट आहे यार ! सांभाळा स्वत:ला ! कारण नीतिमत्तेची जबाबदारी फक्त तुमच्या खांद्यावर टाकलेली आहे ! जोडीदाराच्या नाही !

कसले थरथरतायत हात...हे टाईप करताना !

सांगितलं ना...प्रेमकथा कधीच रुपेरी नसतात....नाजूक नसतात....आणि त्या कधीच चंदेरी नसतात !

त्या दारू पिऊन एकजात टाईट असतात भाऊ !

काही खरं नाही...
वाटतं...मी कायम एका उंचचउंच कड्यावर उभी असते....
काही क्षुल्लक कारण घडतं...आणि मी त्या खोल गर्तेत कोसळते...!

हे असं एखादं नाजूक सुंदर गाणं देखील कारणीभूत ठरतं...
माझ्या नकळत मला गर्तेत ढकलून द्यायला !
 

8 comments:

rajiv said...

ह्म्म्म !! प्रेमकथा या पण कथितच असतात तर .......!!
निसर्गाने काठीण्य येण्यासाठी सोन्यातही तांबे मिसळले ... मग तिथे आयुष्याची काय कथा ... : (

Anagha said...

:)

हेरंब said...

बापरे !

Shriraj said...

"...
सखया रे, आवर ही सावर ही चांदरात" :)

बऱ्याचवेळा या खऱ्या जगापेक्षा माणसाचे कपोलकल्पित जग जास्त रम्य वाटतं न, अनघा

सौरभ said...

https://www.facebook.com/photo.php?v=237907072931713

Anagha said...

:)

Snehal deshmukh said...

प्रेमकथा कधीच रुपेरी नसतात....नाजूक नसतात....आणि त्या कधीच चंदेरी नसतात !

त्या दारू पिऊन एकजात टाईट असतात भाऊ !

Loved it.........Tya daru piun darveli tight astat ka mahit nahi pan tya chanderi nastat evdha khar........

Anagha said...

स्नेहल... :)