नमस्कार

नमस्कार

Pages

Friday, 4 November 2011

चारशेवी पोस्ट...

ही चारशेवी पोस्ट.

आम्ही ज्यावेळी क्लायंटसाठी मोठमोठी प्रेझेन्टेशन्स बनवतो त्यावेळी बरेचदा मोठा पोर्टफ़ोलिओ भरभरून कामं घेऊन जातो. कारण ते शक्ती प्रदर्शन असते. शक्ती आकड्यांमधील. तीच ताकद त्या भल्या मोठ्या पोर्टफ़ोलिओमधील कामात देखील असली तर आम्हांला तो क्लायंट मिळतो. आमच्या लांबलचक यादीत अजून एक भर पडते.
माझा भर किंवा विश्वास म्हणा,  नेहेमी आकड्यापेक्षा त्यातील मालमसाल्यावर असतो. उदाहरणार्थ, आत १२० कामे आहेत परंतु, त्यातील मुख्य आत्माच गायब आहे तर मग काय उपयोग ? आम्ही मात्र बहुतेकवेळा ढीगभर कामे नेतो व त्यासाठी दिवसरात्र मेहेनत करतो. शेवटी हे सर्व पैश्यासाठी. आत्मा साथीला असो वा नसो.

...तर ही चारशेवी पोस्ट.
जवळजवळ दीड वर्षातील.
४५,६०० वेळा वाचकांनी भेटी दिल्या.
आणि १२८ मित्रमैत्रिणी जमा झाले. 
हे सर्वात महत्त्वाचं. माझ्यासाठी.
:) म्हणजे हे माझे शक्ती प्रदर्शन का ?
...परंतु, हे माझ्या आत्म्याची साथ न सोडता आपोआप घडत गेलेले आहे.
उलट आत्म्याची साथ कधीच न सोडल्यानेच हे घडले असावे.
...आणि म्हणूनच इथे येऊन ब्लॉगवर लिहिणे मला मनापासून आवडते.
एकही थाप न मारता....एकही खोटे स्वप्न न विकता.
:)

...तर हे सर्व असे आहे...आणि आज म्हणून फक्त सुंदरसं गाणं ऐकुया.
मला खात्री आहे ह्या गाण्याच्या आवडीबद्दल देखील आपले एकमतच असेल.
:)

36 comments:

rajiv said...

अभिनंदन !!

...हे खरे तर शक्ती प्रदर्शनच आहे...पण आत्म्याचे !!

Unique Poet ! said...

अभिनंदन ! :)

दीड वर्षात ४०० पोस्टस ........

शक्तीप्रदर्शनाचे सातत्य म्हणायचे काय !!

गाणं सहीच !

लिना said...

अभिनंदन ..............!!!
लिहिते रहो.............

Gouri said...

अभिनंदन अनघा ... मला वाटतं हे शक्तीप्रदर्शन नाही. खरं म्हणजे प्रदर्शनही नाही. प्रदर्शनात सेल्समनशिप असते. इथे फक्त अभिव्यक्ती आहे. काहे विकायचंच नसलं म्हणजे खोटं विकण्याचा प्रश्नच नाही. नाही का?
गाण्याचा मात्र अजून सस्पेन्स आहे कारण संध्याकाळी घरी गेल्यावरच ऐकायला मिळणार.

Gouri said...

बाकी एक गंमत लक्षात आली ... तुझ्या दीड वर्षात चारशे पोस्ट झाल्यात ... आमच्याकडे चार वर्षात दिडशेचीही शक्यता नाही :D:D:D

Anonymous said...

अभिनंदन गं राणी.... लिहिती रहा, व्यक्त होत रहा... आम्ही आहोत तुझ्या सोबत आणि त्याचवेळी तुझ्या पोस्ट्सच्या सोबतीने स्वत: सावरत !!!

>>>>बाकी एक गंमत लक्षात आली ... तुझ्या दीड वर्षात चारशे पोस्ट झाल्यात ... आमच्याकडे चार वर्षात दिडशेचीही शक्यता नाही :D:D:D
हे भारीये आणि खरही आहे :)

विनायक पंडित said...

अभिनंदन! अभिनंदन! अभिनंदन!
दीड वर्षातलं सकस आणि समृद्ध लिखाण! सातत्यही आहेच! इतर लिहिणारय़ांना (मला तर १००%)हुरूप देणारं लिखाण! नवा लुकही फ्यान्टॅस्टी‌ऽऽऽक! अभिनंदन!!! मनापासून हार्दिक शुभेच्छा!

Anagha said...

समीर, धन्यवाद ! :)

Anagha said...

आभार आभार लीना ! :)

Anagha said...

गौरे ! अगं हे गाणं तुझंही नक्की लाडकं आहे !!! :) ऐकच तू ! म्हणजे कळेल मी काय म्हणतेय ते ! :)

Anagha said...

अगं तन्वे, तुम्हीं वाचता आणि मी लिहिते ! तुम्हीं लिहिता आणि मी वाचते ! हो की नाही ?
म्हणजे मग तुम्हीं मला इतकं कमी का बरं देता वाचायला ?! मला आवडेय ना वाचनाची ?! :D

Anagha said...

विनायक खूप खूप धन्यवाद !! :) :)

Gouri said...

अनघा, अग आत्ता ऐकलं गाणं :)

Anagha said...

:D आहे ना गं तुझं लाडकं गाणं ??

हेरंब said...

चारशे?? चार्षे????? चार्शे???????????

मेलो, खपलो.. डूबलो...

अभिनंदन
अभिनंदन
} * ४००
अभिनंदन
अभिनंदन

:D

तृप्ती said...

अभिनंदन :)

Anagha said...

चरंबाहे ! चहो ! चरशेचा !! ;) :D

Anagha said...

तृप्ती ! तुझे आभार ! मनापासून ! :)

आनंद पत्रे said...

अभिनंदन...

Suhas Diwakar Zele said...

चारशे? बाप रे....

अभिनंदन गं... लिहिते रहा :) :)

neela said...

अभिनंदन!!!! आणि आभारसुद्धा लिहित राहिल्याबद्दल!!!!
लिखते रहो !!!!

Alka Vibhas said...

अभिनंदन !!!
व्यक्त होणे अखंड चालू राहो ...

Shriraj said...

अनघा, खरं तर मी तुझे आभार मानायला हवेत. पण काहीजण म्हणतात मित्रांचे आभार मानायचे नसतात...त्यांच्या पाठीशी उभं राहायचं असतं... तुझ्या १२८ मित्रांच्या मनात याच भावना असणार आणि तुझ्या ४६व्या मित्रात तर त्या आहेतच. तेव्हा आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. तू बिनधास्त लिहित जा... १२९ चे १२९००००००००∞ होवोत हीच सदिच्छा... शेवटी चांगले मित्र जेवढे जास्त असतील तेवढे चांगलेच :)

अर्चना said...

अभिनंदन...अनघा ताई, अशीच लिहित राहा :)

Anagha said...

आनंद, आभार. :)

Anagha said...

सुहास... :) आभार रे.

Anagha said...

नीला ! :) :)
आभार ह्या सततच्या पाठिंब्याबद्दल! खरंच.

Anagha said...

अलका, आभार गं. :)

Anagha said...

:) मला अजूनही तुझा आणि तुझ्या भावाचा तो छानसा फोटो आठवतो श्रीराज. :)
खूप खूप आभार...सतत माझ्या बरोबर असण्यासाठी ! :)

Anagha said...

अर्चना, धन्यवाद गं. :)

अपर्णा said...

अभिनंदन :)

you already have a request for a song for next time...:P

सौरभ said...

don't you think it is a PARTY TIME!!! nachooo!!!! :)

Anagha said...

:D नक्की नक्की अपर्णा ! माझं आवडतं गाणं आहे ते पण !

Anagha said...

पार्टी ! कुठे करायची मग सौरभा ? मुंबईत की अहमदाबादला ??? :D

Unknown said...

आता १३२ झाले आहेत होSSSSS

Anagha said...

त्याबद्दल तुमचे आभार ! :) :)