कॉलेजच्या दिवसांत शरदने ( नवरा माझा !) बऱ्याच सिनेमांची पोस्टर्स चित्रित केली होती. रस्त्यारस्त्यांवर दिसणाऱ्या त्या त्या सिनेमांची लहान साईझची मुद्रित पोस्टर्स तो मिळवत असे व त्यावरून तंतोतंत पोस्टर्स हातोहात बनवत असे. दादरला श्री. गावडे हे प्रख्यात चित्रकार त्या वेळी मोठमोठ्या आकाराची फिल्म पोस्टर्स बनवत असत. अप्रतिम. कसले एकेक रंगांचे फटकारे. काय तो आत्मविश्वास ! नजर खिळून जात असे. त्या काळोख्या स्टुडीयोत तासंतास उभे राहून गावडे रातोरात एकेक पोस्टर्स उडवत असत. भला मोठा विनोद खन्ना आणि आकाशात नजर लावावी तर तिथे कुठेतरी शत्रुघ सिन्हा ! अगदी दुसऱ्या दिवशी कधी मिनर्व्हा, कधी नाझ तर कधी मराठा मंदिरवर ही भव्य दिव्य पोस्टर्स झळकत असत. आपल्याकडून दाद मिळवत असत.
ह्या 'बाप' गावड्यांकडे शरद जात असे. कधी त्यांना हातभार लावत असे. त्याच्या आयुष्यात मी शिरकाव केल्यानंतर तो जिथे जिथे जाईल तिथे तिथे मीही त्याच्या मागे मागे फिरत असे. :) त्यामुळे मीही मग गावड्यांच्या स्टुडिओत शरदबरोबर जाऊन बसू लागले. अर्थात ज्याच्या हाती जन्मजातच देवाची देणगी आहे त्याने तिथे जाऊन बसणे वेगळे व मी त्याच्या बाजूला उभे रहाणे वेगळे. मात्र त्या पोस्टर्समधील काय बघावे व ते कसे बघावे हे तो न कंटाळता मला शिकवत असे. व मी ते मन लावून ऐकत असे. कधी कधी तो मलाही लहान साईझची पोस्टर्स आणून देत असे. मी प्रयत्न करत असे, ती हुबेहूब कागदावर उतरवण्याचा. त्याला दाखवली तर कधी एखादा कौतुकाचा शब्द कानी पडत असे व बऱ्याचदा अख्खा दिवस ओरडा खावा लागत असे. प्रेमकथा म्हणजे नेहेमीच काही गुलाबांच्या पाकळ्यांवर हातात हात घेऊन अलगद फिरणे नसते. हो ना ? ह्या त्याच्या ओरड्याने मी केवळ त्याच्या एखाद्या कौतुकाच्या शब्दासाठी मान मोडून काम करत असे. परंतु, चित्रकला काही शिकवून येत नाही...ती देवाची देणगी असते. देवाने ती माझ्या शरदला दिली होती. (सक्काळी सक्काळी रडण्याचा माझा बेत आहे बहुतेक ! तुम्हीं माझ्याकडे दुर्लक्ष करा...इथे शरदने काढलेले चित्र टाकतेय ते फक्त बघा...आणि कौतुक करा बघू माझ्या नवऱ्याचं ! :)
दरवाजाला हे जसे लावलेय त्यातही आयडीयेची कल्पना आहे बरं का....त्याच्या डाव्या हाताखाली जे 'पीप होल' आहे ते म्हणजे जणू काही अमिताभच्या हातावरील बिल्ल्यामुळे...त्या सुप्रसिद्ध ढालीमुळे...चुकलेल्या गोळीने पडलेले एक छिद्र आहे ! (मी पोस्टर चिकटवल्यावर माझ्या लेकीने चालवलेलं डोकं आहे हे ! :) )
और मेरे पास क्या हैं ?
...हा हा...हैं...मेरे पास माँ भी हैं !
(आवरा !) :)
कॉलेजच्या दिवसात निसर्गचित्र काढत असताना...
इजिप्तमध्ये निसर्गचित्र काढत असताना....
अमेरिकेत व्हाइट हाऊस समोर बसून स्केचिंग करताना..
34 comments:
khary Anagha, Sharad grate hota. mala aathavtay, me tyache "Aplye Election" che kaam pahily aahe.
Madhav Kulkarni
लई भारी...!!
सिंपली क्रियेटीव्ह.... आणि ते पीप होल, आय मिन बंदूक की गोली तर सहीच :) :)
लै भारी ताये ;)
पोस्टर लयच भारी .
पीप होलची idea पण भारी .
आयडीयची कल्पना आवडली...भारी है :) :)
अनघा, भारी आहे ग चित्र.
तुझं शरदवरचं प्रेम खूप प्रेरणादायी वाटतं, कारण ते कधीही आंधळं नाही वाटत. तुझ्यासाठी वाईट ते वाईटच असतं आणि चांगलं तेच चांगलं असतं. आणि ते अगदी बिनधास्त सांगतेस तू ...कशाचीही तमा न बाळगता.
आता तुमच्या दरवाजे पे दिवार आल्यापासून, तुमच्या दरवाज्याचा पण सीना चौडा झाला आहे! :D
खरंच, तो average दर्वाज्यांपेक्षा जास्ती रुंद आहे! :P
धन्यवाद माधव.
सुहास, बंदूक कि गोली... !:D मस्त नं ? :)
विशाल, आभार आभार :)
बंड्या, :) धन्यवाद !
योगेश, सांगते मी लेकीला....:) आभार रे.
अरे श्रीराज, आपलं माणूस आपल्यावरील प्रेमानेच तर ओरडतं ना ? परक्यांना काय पडलीय आपली ?! त्यामुळे माझ्यावरील प्रेमामुळेच तर माझी चित्रकलेवरून केस घ्यायचा तो ! त्याच्याचमुळे तर मी माझ्या पायावर उभी आहे खंबीरपणे ! हो ना ? :)
हे हे आकाश ! अगदी अगदी !
अरे, ते जुने 'डबल डोअर्स' असायचे ना तसा होता तो आमचा दरवाजा....म्हणून तो जास्ती रुंद आहे ! :D
रंगीत रंगीत...
रंगांचा खजिना उघडल्यासारखा वाटतो ... तुझ्या आठवणींचे रंग विखुरतात लेख भर ...
मस्त !!!
दरवाजेकी चौडाई और अमिताभकी लंबाई... लेकी का दिमाग और मड्डजीका डायब्लॉग... आपलं ब्लॉग... i mean डायलॉग.. एकदम भारी..
पोस्टर एकदम लौलीच!!! मला दुसऱ्या फोटोत त्यांनी घातलेली टोपी भारीच आवडलीये!!!
सुस्साट.. लई भारी.. लगेच दिवार मधला 'बिल्ला नं सातसो छियासी' आठवला :)))
अजून कुठली अमिताभची चित्रं काढली आहेत त्यांनी? ती पण लाव म्हणजे मग "दरवाजे पे दिवार !" के साथ साथ
किचन मे 'शोले'
हॉल मे 'शहंशाह'
दिवार पे 'मजबूर'
आंगन मे 'आनंद'
अशा अजून नवीन पोस्ट्स टाकता येतील :P ;)
अनघा :)
:D कस्सली सही नावं झालीयत हेरंबा !!!! पण ह्यातील सगळी चित्र नाही ना काढलेली त्याने ! हमारे हाथ 'जंजीर' से बंधे हुए है ! आईईईईई ग्ग ! :p :) :D
भक्ती, ही चित्र म्हणजे खरंच रंगांचा खजिना आहे !
धन्यवाद गं. :)
ह्म्म्म. आहे वाटतं अजून ती टोपी सौरभा ! वर कपाटात ! :)
तृप्ती, तू अशी येऊन जातेस ना...ह्याने मला खूप बरं वाटतं...धीर येतो....मी नाही सांगू शकत मला काय वाटतं ते....पण मी वाट मात्र बघत असते तुझी...खरोखर....
प्रेमकथा म्हणजे नेहेमीच काही गुलाबांच्या पाकळ्यांवर हातात हात घेऊन अलगद फिरणे नसते. हो ना ?
+1
बाकी चित्रकला चांगलीच त्याला अपवादच नाही
अनघा अमिताभचं चित्र असलं तरी तू विनोद खन्ना आणलासच हं पोस्टमधे ;)...
बाकि मात्र नो शब्द ... दरवाज्यावरच्या दिवारसाठी नाही,पोस्टसाठी नाही... लिहीलेल्या ओळींमधल्या लपलेल्या,अव्यक्त भावनांसाठी तर नाहीच नाही... ’समजतय’ म्हणू का गं....
तुझ्या स्माईलसाठी माझंही एक :)
भोवरा, धन्यवाद.
angha kiti chaan lihites he likhan asach chalu thev.sharad chi khup aatavan ali tyacha kam tar kupach chagal hot mi veda hoto tachaya kamacha pan mi atapasun tuzaya likanachahi fan zalo.lihit raha atavani tevadach dattat.god bless you.
तन्वे, :D विनोद खन्ना !! सापडलाच ना तुला तो पोस्टमध्ये !! :D :D
राघव, इथे आलास...बरं वाटलं...
तन्वी + १ ... पोस्ट भारी, चित्रं भारी, आणि अमिताभच्या पोस्टरविषयी लिहितांना पण विनोद खन्ना!! :)
हीहीही ! अजाणता गं गौरे अजाणता ! :p :D
अनघा,
मी काय बोलू ? :-)
सर, तुम्ही तर सर्वच घटनांचे साक्षीदार आहात...हो ना ? :)
sharat great hota mala aathavtay college madhe asatana mazaa kakancha potret tane kela hota!
उदय, कधी स्कॅन करून मला मेल करू शकलास तर आनंद होईल...
धन्यवाद.
Post a Comment