आदर्श ह्या शिक्क्याचा हव्यास मी कधीही धरला नाही. त्यामुळे आदर्श आई होण्याच्या चढाओढीत कधी शिरले नाही. 'माणूस आई' होण्याचा प्रयत्न केला. चुकत माकत.
परवा एका घरी गेले होते. त्यातील वडीलधारी बाई दिवाणखान्यात बसलेल्या होत्या. ओळख तर खूप जुनी. अगदी पंधरा वीस वर्षांची. काळोख पडत चालला होता. घरी परत निघायचे होते. त्यांच्या सुनेशी, म्हणजेच माझ्या बालपणीच्या मैत्रिणीशी गप्पाटप्पा आवरणे भाग होते.
"आई, मी निघते." खाली वाकून पाया पडत मी म्हटले.
"निघालीस ?...पण आता मला काय माहित तुझ्या मनात काय आहे...? कसली स्वप्न आहेत... ? मग मी काय आशीर्वाद देऊ तुला ?" त्या उद्गारल्या.
वयोमानाप्रमाणे त्यांची स्मरणशक्ती तशी थोडी अधू झाल्यासारखे आधीच्या संभाषणात जाणवले होते.
मी उभी राहिले. त्यांच्याकडे बघितलं तर त्या कुठे बाहेर बघत होत्या.
मागील भिंतीला टेकत म्हटले..."आई, मला एक लेक आहे...आठवते का तुम्हांला ती ?"
"हो हो...म्हणजे काय...? आठवते ना मला ती."
"मग झालं तर...आयुष्यात ती सुखी होईल...तिचं सगळं छानच होईल...असा आशीर्वाद द्या मला...त्यातच सगळं येईल...नाही का...?"
"हो हो...ते बरोबर बोललीस बाई...तसाच देते हो आशीर्वाद..." आई म्हणाल्या.
आज जुनं 'मोलकरीण' सिनेमातील गाणं आठवलं...१९६३ सालचा कृष्ण धवल चित्रपट. त्यातील आई ही तर देव आई...
त्या देव आईच्या पायाच्या नखाशी देखील माझी तुलना होऊ शकत नाही.
...आई बनता बनता हजार चुका केल्या...कधी कळत. कधी नकळत.
माझं एकविसाव्या शतकातील आईचं मन...

...पण आईचंच ते मन...
आशीर्वाद...मागणे...साकडं...मी आणि काय दुसरं मागणार त्या देवापुढे...?
:)
आशीर्वाद...मागणे...साकडं...मी आणि काय दुसरं मागणार त्या देवापुढे...?
:)
28 comments:
Jabri... !!!
Aamen!!!
माणूस आई
grttt u r :)
पिढी दर पिढी कितीही उत्क्रांती झाली तरी `पुढील पिढीचे भले चिंतण्यात कधीच क्रांती होत नाही, नाही का अनघा ..?
!!!
Rajiv +1 :)
आईचंच ते मन...
आणि काय दुसरं मागणार त्या देवापुढे..:)
+++++++++
अनघा, प्रेम स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई -----! All the best to your daughter and you. मनापासून शुभेछ्या.
श्रद्धा, मनापासून आभार. :)
आईला देवपणाचे ओझं न देता तिला साधं माणूसपण दिलं तर अधिक न्याय्य होईल असं आपलं मला वाटतं गं सुप्रिया. आई होऊन माझ्या वाटच्या खस्ता काढल्यावर !! :) Better late than never !! :)
धन्यवाद गं..
:) खरंय राजीव.
हेरंबा, नक्की काय उद्द्गारलायस ?? :) :)
तृप्ती, :)
अपर्णा, मला एकदम ती आईच्या हृदयाची गोष्ट आठवली !! :) :)
All in the day's work, आभार आभार !! :):)
पोस्ट आवडली! विडिओसुद्धा!
:) धन्यवाद विनायक.
:) :)
माणूस आई :)
"परफेक्ट" आशिर्वाद मिळवलास की गं ताई!
@ अनघा,
...आणि तुझ्या या सव्वाशे (+२) अनुयायांचा आशीर्वाद आहेच की तुझ्यासोबत! त्यामुळे चिंता नसावी ताईसाहेब! :)
@ राजीव +१ :)
"त्या देव आईच्या पायाच्या नखाशी देखील माझी तुलना होऊ शकत नाही." हे काही पटलं नाही... कोणत्याही एका आईची, दुसऱ्या आईशी तुलना होऊ शकत नाही. आणि चुका झाल्या म्हणुन देवपण धोक्यात येत नाही. मुळात देवपण हे काही लादलेलंपण नाही. असो.. ये तो जी आपने इमोसन को छेड दिया!!!
तन्वे, माणूस म्हणून जगणंच कठीण ! :)
श्रीराज, खरंय ! :) :)
आनंद, आईपण आलं ना की ही हुशारी बरोब्बर येते अंगात ! :)
आभार रे. :)
ह्म्म्म...सौरभ, इमोसन छेड दिया...मग भावना भडकल्या का ??
:p :)
अनघा, 'माणूस आई'नाही पटत ! तुम्ही म्हणता माझ्या मुलीसाठी मागितलं आणि तिच्या सुखात तुमच सर्वकाही हिच स्रीची भावना तिला देवव्त देऊन जाते. आईच मूल किती यशस्वी आहे यावरून तिच यश समजते देवपण नाही! शिवाजी महाराजांची आई हि आईच आहे पण तिनी तिची स्वराज्याची स्वप्न मुलाच्या माध्यमातून पूर्णत्वास नेली म्हणून त्या जिजाऊ एक महान माता बनल्या ... आपण तिथपर्यंत पोहचू शकत नाही पण आपल्या मनातील आपल्या पिलाविषयी असलेली प्रेमभावना नक्कीच श्रेष्ठ आहे आणि तीच भावना एका भिकारी बाईची असो व मजूर बाईची असो वा आपल्यासारख्या सुशिक्षित बाईची असो ती नक्कीच तिला देवत्व प्रदान करते अशी माझीतरी विचारसरणी आहे !
गीतांजली बाई, देवत्व घेऊन देव्हाऱ्यात बसण्यापेक्षा मी माझ्या लेकीची मैत्रीण बनून हव्या त्या विषयांवर तिच्याशी मनसोक्त गप्पा मारणे अधिक पसंत करेन. जशी ती तिच्या गुण व अवगुणांसहित माझी लेक आहे तशीच माझ्या गुण अवगुणांसहित मी तिची आई आहे...
परंतु, अर्थात ही माझी आवड आहे...हे माझे विचार आहेत.
इथे येऊन माझे लिखाण वाचल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. :)
नमस्ते अनघा, धन्यवाद ! बाई बद्दल, तुमचा हेतू कसाही असो पण मला बाई असल्याचा अभिमान आहे! राहिला प्रश्न देव्हाऱ्यात बसण्याचा, तुम्हाला देव्हाऱ्यात बसा असं नाही म्हटलं तर आई या शब्दाचा आशय सांगितला. आई हि कुणाची असो ती तिच्या ममतेने मोठी असते.
तुम्ही तुमच्या मुलीची मैत्रीण होऊ शकता पण एक मैत्रीण आपल्या मुलीची आई होऊ शकते का ? या जगात अनेक मानसं आहेत ते प्रत्येकजण आई आहे का ? आई या शब्दाची व्याप्ती खूप मोठी आहे ,आईमधला माणूस अनेक रुपात जाऊ शकतो पण प्रत्येक माणसात आई निर्माण नाही होऊ शकत.
माझ्या मनातील जो आशय आहे तो कदाचित तुम्ही चुकीचा वाचत आहात किंवा मी तो पटून देण्यात अपयशी असावी म्हणून एक उदाहरण देते शेवटी मीही मानते कि प्रत्येकाचे विचार वेगळे असू शकतात आणि माझे विचार सांगण्याचे धाडस केले कारण तुमचे विचार तुम्ही सर्वांना वाचण्यासाठी ठेवले आहेत म्हणून! तर असो मी माझा मुद्दा पटवण्याचा शेवटचा प्रयन्तम्हणून खालील दाखला देते - सूर्य+फुल =सुर्यफुल यामधील सूर्य विश्वाला प्रकाशमान करणारा तारा आहे ! तर फुल हे दृष्टीला सुख किंवा नाकाला सुगंध देते. सूर्यफुल सूर्यासारखे दिसते म्हणून त्याला हे नाव मिळाले पण त्याची क्षमता प्रकाश देण्याची नक्की नाही ! आई माणूस असते पण माणूस(सर्व मानसे ) आई नाहीत ! म्हणून आई यूनिक आहे!
माणसाचे आईपण हे निसर्गदत्त आहे...मात्र माणसाला मिळणारे देवत्व हे मानवदत्त आहे ... .
मानवाचे पाय हे मातीचेच असतात व नेहमी तसेच राहणार हे सत्य लक्षात घ्यायला हवे. मानवाने निर्मिलेली देव हि एक संकल्पना आहे. मात्र मानव हे निसर्गाने निर्मिलेले शाश्वत सत्य आहे . तेंव्हा काय महान व काय लहान हा विचार इथे अस्थायी होतोय !! संवाद हा एकमेकातल्या माणसाशी साधायचा असतो, देवत्वाशी नाही .
अनघा, असेच काहीसे तुझ्या या लेखातून मला जाणवत आहे !! खूपच वेगळा विचार लिहून गेलीयस !!
Post a Comment