नमस्कार

नमस्कार

Pages

Sunday, 17 July 2011

All bookish !

"प्रेम त्याग शिकवतं."
"आई, हे पुस्तकातलं वाक्य झालं."
"नाही. का बरं ? प्रेमाची पहिली भूकच तर त्याग ही असते. त्यागच जर नाही केला तर प्रेम टिकून कसे रहाणार व त्या त्यागातूनच तर आत्मबल मिळते...नाही का ?"
"All bookish !"
"नेहेमी अहं आणि प्रेम हे तराजूत घातलेले असतात. मग अहंचं पारडं जड की प्रेमाचं...ह्यावरून तो माणूस त्याग करतो की नाही हे ठरतं...आता आपण हे बोलतोय तर त्यावरून मला काही आठवलं..."
भुवया उंचावून तिने माझ्याकडे बघितलं.
"म्हटलं तर विषयाला धरून आहे...म्हटलं तर नाही...एकदा जीतूकाका बर्फात कुठे घरापासून दूर अडकून पडला होता. दुपार उलटून गेलेली होती. दिवस मावळत चालला होता. अपूर्वा मावशीला निवड करायची होती....बर्फात गाडी काढावी की नवऱ्याला सांगावं की आहेस तिथेच रहा...व बर्फ वितळला की ये घरी."
"म ?"
"पण बर्फ वितळणार आहे की पुढे परिस्थिती अधिकच बिकट होणार आहे हे समजायला काही मार्ग नव्हता."
"म ?"
"मावशीने मुलींना शेजारी ठेवलं...गाडी काढली...वाढत चाललेल्या अंधारात, बर्फातून गाडी चालवत ती जीतूकाकापर्यंत पोचली. येताना अर्थात गाडी त्याने चालवली. आपण हातपाय गाळून न घेता, संकटांवर मात करू शकतो हे मनोबल तिने त्यातून मिळवलेच नाही का ? ती त्यावेळी हे न करता...उबदार कपडे घालून पलंगावर शांत झोपू शकत होती...मुलींना कुशीत घेऊन. त्यानंतर तिथली परिस्थिती खरोखरच अधिक गंभीर झाली...कधी नव्हे इतका त्या वर्षी बर्फ पडला. मावशी तिथे गेली नसती तर जीतूकाका पुढचे चारपाच दिवस थंडीत अन्नपाण्यावाचून तिथेच अडकून पडला असता..."
"हम्म्म्म"
"इथे मावशीला प्रेम आहे...काळजी आहे...आणि म्हणून ती जीवाची तमा न करता गेली ना नवऱ्याला घ्यायला....?"
माझी लेक हसली...
"आई, आयुष्यात त्याग हा नेहेमी दोघांनी करायचा असतो. हो ना ?"
"अर्थात !"
किती ठसक्यात उद्गारले मी ! कधीकधी खोटी विधाने करताना उगाच फार मोठ्या आवाजात वाक्ये फेकली जातात...त्यातलेच हे एक !

20 comments:

rajiv said...

खरेय !! त्याग असेल तरच प्रेम जिवंत रहाते ....!!

नाहीतर अहं त्या प्रेमाचा गळा घोटायला टपलेलाच असतो ..:(

हेरंब said...

>> "आई, पण हा त्याग दोघांनी करायचा असतो ! नाही का ?"
"अर्थात !"

आता जितूकाका रागावणार तुम्हा मायलेकीवर.. ;)

Trupti said...

कधी कधी खोटी विधाने करायची असतात तेव्हा उगाच फार मोठ्या आवाजात वाक्ये फेकली जातात ......
अगदी खरे आहे हे .....आणि त्याग हा दोघांनी करयाचा असतो... हा हा हा...
too good writing ...heart touching....
:)
तृप्ती

Gouri said...

प्रेमात कुणी त्याग करतं, कुणी दुसर्‍याला त्याग करायची संधी देतं ;)

Raindrop said...

prem asel tar tyag kartanna tyag karat ahot apan, asa watatach nahi.

prem nasla, tar kitti hi tyaag kara...te fukatach zata any chhotu shya goshti pan mahaan tyag karat aahot apan, asa watata.

pre + tyag equation = zabardast mathematics of the heart

Anagha said...

ह्म्म्म.
धन्यवाद राजीव.

Anagha said...

हेहे! हेरंबा, घाबरले हं मी ! अपूर्वाला फोन करून सांगितलं...जितेंद्रला वाचायला नको देऊ म्हणून ! :p

Anagha said...

तृप्ती, विनोदीच वाटतंय ना ते वाक्य ?! :D
आभार गं प्रतिक्रियेबद्दल. :)

Anagha said...

गौरी, मी पुढील शिकवण म्हणून सांगितलं तुझं बोलणं माझ्या लेकीला ! :D

Anagha said...

:) वंदू, एकदम स्वप्नात आहोत असं वाटलं मला ! :) लेक परत म्हणाली असती....all bookish ! :D

भानस said...

त्याग दोन्ही बाजूने होऊ लागला तर मग गंमतच होईल... :D:D:D

बाकी, त्यागाची प्रवृत्ती मुळातच असावी लागते. करायचाच म्हणून कदाचित करता येईलही पण तगणार नाही...

Shriraj said...

:) khota bolaycha nahi... nahitar bappa kaan kapto :P

विनायक पंडित said...

व्वा! प्रेम आणि त्याग हे एवढ्या साध्या शब्दात? छानच! मलाही पटलं! आणि बर्‍याच वेळा तुम्ही अप्रतिम कलाटणी देता शेवटच्या वाक्यात! चपखल! ती पटलीच! :)

Anagha said...

हो ना ! मग भांडायला काही विषयच रहाणार नाही! नाही का ग, भाग्यश्री ? :)

अगदी पटलं आणि तुझं... आभार गं. :)

Anagha said...

श्रीराज, ज्याने त्याने स्वानुभवातून ठरवावं...खोटं की खरं... हो ना ? :)

Anagha said...

:) विनायक आभार ! :)

आनंद पत्रे said...

लिहिलेलं आवडलं, आणि पटलही.. अर्थात नेहमीप्रमाणेच :)

सौरभ said...

2nd editionमधे हा लेख घेऊ... म्हणजे खरोखरच All bookish होईल.

Anagha said...

आनंद, पटलं ना ? अनुभवी लोकांना पटतंय असं दिसतंय ! ;)
आभार रे.. :)

Anagha said...

बरं हं सौरभ... :)