थोड्याच का होईना पण माझ्या रातराणीला कळ्या लगडल्या आहेत. थोड्याच का होईना पण काही कळ्या मदमस्त फुलल्या आहेत. मंद मंद असा गंध हलकेच पसरला आहे. आयुष्यात तशा काही उगाच सुंदर आठवणी काही त्या फुलाला जुडलेल्या नाहीत. पण म्हणून काही तिचा गंध कमी झालेला नाही. ती तिची अशी मध्येच फुलते. आणि मला हसू येते. कारण हा निसर्ग आम्ही बघितला..त्यातील रंग त्या चित्रकाराने कागदावर उतरवले...पण ते रंग, आयुष्यात उतरवणे झाले नाही. म्हणजे ते काळं गडद आभाळ बघितलं...पॅलेटमध्ये काळा रंग घेतला, त्यात थोडा कोबाल्ट ब्ल्यू मिसळला...थोडा अधिक रुंदीचा कुंचला घेतला आणि सरळ सरळ ते आकाशात तरंगणारे काळे ढग त्याने हातातील कागदावर खेचून आणले. उगाच त्या काळ्या ढगांची उपमा कधी कोणाच्या डोळ्यांना दिली नाही...उगाच त्या खोलात कधी बुडाला नाही. निळे आकाश ? हे घ्या. जांभळे डोंगर ? मॅजेन्टा घ्या त्यात पर्शियन ब्ल्यू मिसळा...कागदावर भराभरा खेचा. पाणी ? प्रतिबिंब ? झाडे ? झुडपे ? हिरवे गवत ? चंद्र ? सूर्य ? सगळे सगळे कागदावर उतरले. अमर्त्य झाले. आता कधी हातात ते कागद धरले, तर आहे...नजरसुख आहे....कौतुक आहे....प्रेम आहे...
पण मग...आज का मन रिकामं ? एखादा चंद्र, मनात का नाही ? एखादा तलाव, ओला का नाही ? ते हिरवे गच्च गच्च बहरलेले झाड देखील...निष्पर्ण का ?
मनातले सगळे कागद....कार्ट्रेज, हॅण्डमेड..एकजात सगळे भगभगीत...पांढरे...पांढरे कपाळ जसे.
पण मग...आज का मन रिकामं ? एखादा चंद्र, मनात का नाही ? एखादा तलाव, ओला का नाही ? ते हिरवे गच्च गच्च बहरलेले झाड देखील...निष्पर्ण का ?
मनातले सगळे कागद....कार्ट्रेज, हॅण्डमेड..एकजात सगळे भगभगीत...पांढरे...पांढरे कपाळ जसे.
16 comments:
वाह वाह... एखादा चंद्र, मनात का नाही??? असेल अमावस्या, पंधरवड्यात पौर्णिमा आहे हे सांगणारी. एखादा तलाव, ओला का नाही? असावा उन्हाळ्याचा तडाखा, पावसाचा भाव वाढवणारा. हिरवे गच्च गच्च बहरलेले झाड देखील... निष्पर्ण का? असावा शिशिर वसंताची चाहुल देणारा... एकजात सगळे भगभगीत... पांढरे... पांढरेशुभ्र... सगळे रंग ज्यात सामावलेले... पांढरे पाय आणि पांढरे कपाळ... कसे??? जसे संगमरवरात घडवलेले... कोरीव नाजुक... वाह वाह!!! हे म्हणजे थोरच... प्रलयाच्या गर्जना करत हो ऊ घातलेल्या नवनिर्मितीचा आशावादाचा गुप्त संकेत इतका नेटका सांगणं हे थोर आहे...
(पांडुरंग सांगवीकर)
काय ग हे??? :(((
:(
atta kalale....it didn't rain...there were no raindrops to convert that whitelight into made shades :(
सुन्न !! :(
तुला रागे भरायची वेळ आली आहे बरं बयो. काहीही विचार डोक्यात घेऊन सदोदीत बसलेली असतेस. सौरभ बघ काय म्हणतोय... हासलीस का गालातल्या गालात?
अररररर
ताईसाहेब काय झालं???
आईशप्पत ! सौरभ !!! कुठून कुठे !!! :D :D
हसवल्याशिवाय सोडू नकोस हा तू ! :D
पांडुरंग सांगवीकर ! हेहे!!! :D :D :D
हेरंबा ! माफी !!!!! :(
आनंद ! कशी ना मी अशी ! गेल्या वेळी पण माफी मागितली होती ! वेडंविद्र लिहिण्याबद्द्ल ! आणि पुन्हा तसंच लिहील ! :( परत एकदा माफ करून टाक पाहू ! :)
वंदू... :)
संकेत...गाडी घसरली जरा ! :)
भाग्यश्री, माफी. आणि धन्यवाद ! :)
बंड्या !!! :(
:D ( हे आता हसतेय ते दाखवायला ! :D )
आता ठीकेय सगळं श्रीराज ! :)
Post a Comment