नमस्कार

नमस्कार

Pages

Thursday, 16 June 2011

उपाय

सकाळी मैत्रिणीबरोबर एक वाद झाला...दूरध्वनीवर. मैत्रीण डॉक्टर. किंवा चर्चा म्हणावे. वाद म्हटला की उगाच भांडाभांडी झाल्यासारखे वाटते. नळावर !
विषय परदेशात कामानिमित्त स्थायिक होण्यावरून...माझ्या लेकीने परदेशी स्थायिक व्हावे असे तिला वाटते. मैत्रीण आहे. मला जाणीव आहे, ती माझी हितचिंतक आहे.

...इथे भ्रष्टाचार बोकाळला आहे...काही खरं नाही...सुधारण्याची शक्यता नाही. त्यापेक्षा तुझ्या लेकीने निवडलेल्या विषयावर तिला परदेशीच अधिक वाव आहे....पैसे भरपूर कमावता येतील...कामाचे समाधान मिळेल...

पैसा ही बाब दुय्यम. इथला भ्रष्टाचार प्रथम. तिलाही कन्या आहे. बुद्धिमान.

...अगं, पण ही पळवाट नव्हे काय ? आपण सुशिक्षित लोकं असे टाकून निघून गेलो तर कसे होणार ? मग परिस्थिती सुधारणार तरी कोण ? आणि कोणासाठी ?
...नाही सुधारणार आता परिस्थिती...अधिकाधिक खराबच होणार...
...हो...म्हणजे अश्या एकेक पिढ्या टाकून निघून गेल्या तर नाहीच सुधारणार कधी !

मग इथल्यातिथल्या गप्पा...हवापाण्याच्या...आणि संभाषणाची सांगता.

कन्या माझी असली तरी देखील, मी माझ्या देशाच्या एका दुसऱ्या नागरिकाच्या वतीने मत मांडत होते...भविष्यात पुढे नक्की काय होणार आहे हे जाणणारी मी कोण ?

परंतु मला अजूनही, इथे भ्रष्टाचार बोकाळला आहे...आणि त्यावर देश सोडून जाऊन दुसऱ्या देशात स्थायिक होणे...हा एकमेव उपाय कसा काय असू शकतो हे नाही कळलेले.
'उपाय' हा नेहेमी 'बदल' घडवून आणण्यासाठी असतो. नव्हे काय ? म्हणजे घरात कुठे कीड लागली तर मी ती औषधोपचार करून नष्ट करेन...की घराकडेच पाठ फिरवेन...?

...माझ्या क्षीण बुद्धीला न झेपलेले हे गणित...

19 comments:

Raindrop said...

maybe she said it thinking of the way M is and what she wants to do with her life....maybe she meant that some other country is more conducive to what M wants to do, than India.

Anagha said...

:)
Then the focus would have been on that and not on corruption in India...nahi ?

Raindrop said...

yeah...focal point should have been M.

आनंद पत्रे said...

completely agree with Raindrop...

Anagha said...

राईट ! वंदू, उगाच भ्रष्टाचार बोकाळलाय म्हणून परदेशात जाऊन माझ्या लेकीने रहायला पाहिजे हे असे जे चर्चेने वळण घेतले ते काही पटले नाही !

अपर्णा said...

on a lighter note Anagha,

याला आपण 'कोकाकोका' म्हणायचं का ग...:D

भानस said...

मला तुझे म्हणणे पटलेय अनघा. कीड लागली आहे म्हणून घराकडे पाठ फिरवणे अशक्य आहे. हा मात्र वंदू म्हणते तो मुद्दा नंबर एक वर असेल आणि मैत्रेयीला ते करावेसे वाटत असेल तर विचार करायलाच हवा.

बाकी, बरेचदा जे दिसत नसते ते असेल या भ्रामक कल्पनेत हातचेही निसटते, याचा अनुभव घेतलेली प्रचंड लोकं आहेतच.

Suhas Diwakar Zele said...

यप्प ऍप्स म्हणते तसं, कोकाकोका :)

आपण आपली सोय बघतो, पण जिथे गैरसोय होते त्यापासून पळून न जाता, ती गोष्ट बदलायचा प्रयत्न करावा असे माझं मत आहे. गोष्टी सगळीकडे अश्याच, फक्त त्रीव्रता कमी जास्त असते, अजुनकाही नाही...

Anagha said...

आनंद, चर्चा वळली तीच मुळी भारतातील भ्रष्टाचार व म्हणून आपण मायदेश सोडून निघून जाणे ह्याकडे. त्यात माझ्या लेकीच्या विषयाला इथे फारसा वाव नसून परदेशी आहे ह्याला महत्त्व नव्हते...ते नाही पटले..कारण ती एक पळवाट वाटली. नाही का ? :)

Anagha said...

भाग्यश्री नाही गं ! भ्रष्टाचारामुळे देश सोडून सरळ निघून जायला हवे असे तिचे म्हणणे अजिबात नाही बरोबर वाटले. दहा मिनिटे तेच घोळून झाले. लेकीला काय करायचंय हा मुद्दाच नव्हता ! म्हणून तर अधिकच चुकीचे वाटले ! :)

आणि अगदी बरोबर. हे म्हणजेच हाताचे सोडून पळत्याच्या मागे लागणेच ! नाही का ?!

Anagha said...

अगदी अगदी गं अपर्णा ! :D

Anagha said...

सुहास, एकदम छान वाटलं हे तुझं मत वाचून ! अगदी अभिमानबिभिमान ! :)

Aakash said...

'उपाय' हा नेहेमी 'बदल' घडवून आणण्यासाठी असतो. +१


तुमच्या म्हणणं अगदी बरोबर आहे.
पण आता आम्हाला पण रेडीमेडची सवय लागलीये.

हेरंब said...

खूप आधीपासून रंगलेला वाद आहे हा. 'उपाय' प्रत्येकजण आपापल्या परीने शोधतोच.

मी व्यक्तिशः तुझ्या मताशी सहमत आहे.

Gouri said...

अनघा, संगणकक्षेत्रात असल्याने ‘बाहेर इतक्या संधी आहेत - जायचा विचार नाही का?’ हे भरपूर ऐकायला मिळतं. शिक्षणासाठी, अनुभव मिळवण्यासाठी जाणं वेगळं, पण तिथेच स्थाईक व्हायचं हे मनातून पटत नाही. ही पळवाट आहे असं वाटतं.
सुदैवाने माझ्या क्षेत्रात आज आपल्या देशात भरपूर संधी आहेतही. त्या नसत्याच तर मी काय केलं असतं माहित नाही. त्यामुळे दुसर्‍याच्या वागण्यावर मी मत देऊ नये असं वाटतं.
खेरीज, इथे राहून तरी आपण असं काय भव्य दिव्य करतो आहोत? आपल्या इथे असण्यात आणि बाहेरचे होण्यात कितपत फरक आहे हा प्रश्न मला वारंवार पडतो.

Anagha said...

अगदी आकाश...रेडीमेड देश...नाहीतरी आपल्याला तसाच तर मिळालाय..आपण कुठे काय रक्त सांडलंय ? आणि आताही त्यावर काही मेहेनत करायची आपली तयारी नाही व इच्छा देखील नाही. :)

Anagha said...

आभार हेरंबा... :)

Anagha said...

गौरी, शिक्षणासाठी, अनुभव मिळवण्यासाठी जाणं वेगळं...हे मला खूप पटत. इथे भ्रष्टाचार आहे म्हणून निघून जायचं हे भयंकर वाटतं.

आणि भव्य दिव्य प्रत्येकानेच करायला हवंय का ? जितकं निदान आपल्या आयुष्यात येतं तितकं व तिथे तरी आपण काही फरक घडवून आणला तर नाही का होणार...? पाठ फिरवून निघून जाण्यापेक्षा ?

Shriraj said...

अनघा, तू जे 'घराचं' उदाहरण दिलंयस ते इतकं अचूक आहे... खरंच आपण जर सगळ्यांनीच असा विचार केला तर कित्ती छान होईल.