नमस्कार

नमस्कार

Pages

Wednesday, 16 February 2011

वासंती

कधी कधी दु:खी वाटत असतं...
जसं काही मनाला एखादा जड पाषाण गुंडाळावा आणि समुद्रात सोडावं...
मग ते बिचारं मऊ लुसलुशीत मन हळूहळू खोलखोल रसातळाला पोचावं...
जेव्हा असं काही वाटतं त्यावेळी ते दु:ख बाहेर काढावे म्हणून कलाकार आपल्याला अवगत असलेल्या कलेचा आधार घेतो. कोणी चित्र काढतो, कोणी कविता करतो...कोणी एकटाच बसून अश्रू ढाळतो...
माणसं हे इतकंच करतात...

पण कधीकधी देव दु:खी असतो...
आणि त्याने तरी गप्प बसावं नाही का....
की दु:खी आहोत म्हणून दु:खी गोष्टी लिहित बसायचे...
आणि कोणाच्या ना कोणाच्या डोक्यावर आपली गोष्ट थापायची,
आणि....द्यावे पाठवून खाली त्या जीवाला...
ह्याने लिहिलेल्या गोष्टी जगायला....
नाहक.
अन्यायकारक...
नाही का?

आज माझी बालमैत्रीण गेली....
वासंती....

12 comments:

Yogesh said...

:( :(

सौरभ said...

:-S :-( may her soul R.I.P.

Anonymous said...

:( :(

हेरंब said...

'दिल तो पागल है' मधल्या करिष्मासारखं "बुरा वो है, बुरा वो है" असं ओरडत आकाशाकडे दगड भिरकवावेसे वाटतायत मला. :(

तिच्या आत्म्याला शांती लाभो..

sanket said...

काही काही माणसं असंच नशीब घेऊन जन्माला येतात, देवाचे दुःख जगायला येणारी माणसं>> अगदीच नविन कल्पना...तू ज्या शब्दांत व्यक्त केलंय ते अप्रतिम, पण तितंकच वाईटही वाटतंय... कोणाच्या नशिबात सुखाची थंड झुळूक नसावी?
प्रारब्ध, पूर्वसंचिताचे भोग वगैरे नावं आहेत, पण प्रश्न हा उभा राहतोच..
आपली अगदी जवळची व्यक्ती तिळ-तिळ मरतेय हे पाहतांना खूप वेदना होतात गं ...आपली हतबलता आपल्याला अजून व्याकूळ करते मग..

भानस said...

... :(:(

Anagha said...

मला माहितेय कि मी पुन्हा पुन्हा तेच बोलते...पण माझ्या मित्रमैत्रिणींनो गेल्या वर्षापासून माझ्या प्रत्येक दु:खाच्या क्षणी...जसे माझ्या प्रत्येक आनंदाच्या क्षणी...तुम्ही माझ्याबरोबर असता....आणि त्यामुळे ही माझ्या वाटची माझी लढाई मला सुकर झालेली आहे.....
आज तुमचे आभार मानणे म्हणजे ह्या आपल्या मैत्रीचा अपमान करणे असे काहीसे मला वाटत आहे....

Raindrop said...

I always knew her as 'vaasha'....she was almost like your third sister...the way you took care of her and she of you. I will always remember this spring as the one we lost our Vasanti in :(

THEPROPHET said...

देवाच्या भावना हा विचारच वेगळा आहे!
:(
तिच्या आत्म्याला सद्गती लाभो!

Shriraj said...

मला खरंच वाईट वाटतंय तुझ्या या बहिणीबद्दल. मला माहितेय ती तुझ्या खूप जवळ होती. माझ्या प्रार्थना तुझ्या सोबत आहेत.

Suhas Diwakar Zele said...

:( :(

रोहन... said...

एक सांगू.. जी माणसे लवकर जातात ना.. ती फेऱ्यातून मोकळी होतात... राहतात तेच खरे हाल अपेष्टा सोसतात. देवाचा नियम आपल्याला वाटतो विचित्र.. पण तोच आहे खरा...