नमस्कार

नमस्कार

Pages

Thursday, 10 February 2011

नमस्कार!

इतिहासात वाचलेलं बरेचदा...
ह्याने त्याने नोकरीला लाथ मारली आणि मग हे हे केलं.
कोणी देशकार्य केलं तर कोणी उद्योगधंदे केले आणि मग ते कोणी मोठेमोठे झाले!

पण आम्हांला शिकवलंय ना...
लाथ राहिली बाजूला...
कशाला पाय देखील लावू नये!
लागलाच कधी पाय...चुकून...
तर नमस्कार करावा!

तेच तर चाललंय!
लाथ नाही मारत...
नमस्कार करते...
अगदी...
स. न. वि. वि.
सां. न.
आणि अगदी...
को. न.

हो...
कोपऱ्यापासून नमस्कार!

17 comments:

Gouri said...

अनघा, आज अखेरीस तुझ्या ब्लॉगवर पुन्हा पोहोचले ... आणि ही पोस्ट बघितली. प्रतिक्रिया लिहायला घेतली तर ती तुझ्या पोस्टपेक्षा मोठी झाली ... आता ती वेगळी पोस्ट म्हणूनच टाकते. इथे फक्त एवढंच - तू एकटी नाहीस असं वाटण्यात.

Anagha said...

I know...
:)

Raindrop said...

kopryapasun namaskar....looks like u got the corner office ;)

for one person to maaro laath to nokri there are three people in that household who are sticking to their nokris so that kitchen fires are burning.

panda said...

ही अणि मागची post वाचून जाणीव होते...तिकडे office मध्ये कसे काय चाललेय. माझ्या बाबतीत तर "को. न." सुद्धा काही उपयोगाचा नाहीये.
अरे हो...."आगासी" गवसले....पण "OPEN" ला open करण्याचा योग अजून आला नाहीये... कदाचित, अजून एक आठवड्याने योग आहेत.

सौरभ said...

हे असं ऊठसुट लोटांगणं/दंडवत घातली की पाठीला बाक येणारच. काय हे??!!! मोडेन पण वाकणार नाही म्हणणाऱ्या मराठी माणसाने असं करावं!!! छे छे...

Anagha said...

:D :D हसवतोस काय सौरभ?! संतापलेय ना मी! :p

Anagha said...

पंकज, अरे भरभराट तर होताना दिसतेय! आणि त्याचे कारण पण आपण असतो...पण आपली मात्र कधी भरभराट होताना दिसत नाही! :(

Shriraj said...

बड़े बड़े देशो में एस छोटी छोटी बातें होती रहती है, ताई... हमारे साथ भी कभी कभी ऐसाईच होता है :P

Anagha said...

hmmm.. :( समदु:खी का रे बाबा आपण?
:)

Anagha said...

:) Vandu, you are right!
:(

THEPROPHET said...

सौरभ +१!
असं कसं नमस्कार करून चालेल...
चमत्कार करून दाखव काहीतरी! :D

Anagha said...

मला आता कळलंय! मी वैतागून काहीतरी लिहिते आणि तुमच्या प्रतिक्रिया वाचून मग हसत बसते!!! :D :D

हेरंब said...

तुमचा कोपरापासून नमस्कार आणि आमचं घालीन लोटांगण वंदिन चरण ! :(

भानस said...

समदु:खींची एक मस्त मैफल भरवूयात आणि यथेच्छ भडास काढूयात... निदान तेवढावेळ तरी यातून मुक्ती. :)

मैफल शिवाजीपार्कात भरवावी लागेल मात्र... :D

Anagha said...

घरोघरी मातीच्या चुली का हेरंब? सातासमुद्रापलीकडे पण हीच परिस्थिती? :(

Anagha said...

येस्स! ही कल्पना मस्तच आहे! चला भाग्यश्रीबाई, या परतुनी!! :)

Soumitra said...

aho anaghabai ase namaskar ugach fukat nahi ghalvayche aple ani kopryapasun tar mulich nahit , apan manasvi jagat rahaiche