मला भेजा फ्राय आवडतो.
चमचमीत, मसालेदार.
सुकी कलेजी व्वा व्वा!
एकेक तुकडा खुमासदार.
फक्त आता असं झालंय,
इथे सगळीच लोकं हे खाताना दिसतायत,
दाद देतायत,
मिटक्या मारतायत !
प्रॉब्लेम काही नाही...
पण माझाच भेजा आणि माझंच हृदय....
ह्यांनी कापायला घेतलंय..
एकेक तुकडा खायला घेतलाय...
मस्त मस्त..दाद देतायत...
म्हणजे एक दिवस..
पोकळीच उरणार..
मी म्हणजे...
इजिप्तची ममीच होणार.
हे सगळे
नरभक्षक...
चटावलेले...
खातात ते खातात...
आणि खायला दिल्याचे हे मला पैसे देतात!
आता म्हटलं निदान एका प्लेटचे भाव तरी वाढवा..
तर मिटक्या मारतात...
आणि स्वत:च्याच तुंबड्या भरतात!
चिंता वाटते...
एकदा सिटी स्कॅन करायला हवं..
काय शिल्लक राहिलंय
बघायला हवं!
21 comments:
खरेच एकदा `सिटी' स्कॅन करायलाच हवी हो!
प्लेटचे भाव कुठे वाढवून मिळतायत ते बघायला ..!!
नाहीतर खाणारा करत राहील .... फ्राय :)
व खाल्ला जाणारा करत राहील .... क्राय :'(
looks like office is giving u trouble....hope ur increment happens soon...plate che bhaav tasech vaadteel :)
हेहे!! कस्सं गं ओळखलं माझ्या मैत्रिणीने! :)
:(
:( राजीव!
एक कलाकार आपल्या कलेजा/भेजातले लिखाण/कला सर्वांसमोर मांडतच असतो,
त्याचा मोबदला चांगला मिळायलाच हवा .
अनघा इजिप्तची ममी नाही होणार तू ?
नाहीतर आम्ही काय वाचायचे ?
आमचा पण appraisal time जवळ आलाच आहे :(
होटल होटल की बात होती है. दुसरे पॉश होटल में यईच डिश भौत मेहेंगा बेचते ये लोगा... होटल बदलो.
हेरंबा... बघ ना! वैताग आहे नुस्ता! :(
बंड्या, हे appraisal, happiness quotient....सगळ्या बोलायच्या गोष्टी...बोलाची कढी आणि बोलाचाच भात!
आणि हा ब्लॉग आणि तुम्हीं सर्वजण..ह्याच्या जोरावर बाकी सगळ्या लढाया चालू असतात माझ्या! :)
सौरभ, चांगल्या हॉटेलच्याच शोधात आहे! :)
अनघा, दूरून हॉटेल साजरे ;)
हेहे! ते तर खरंच गं गौरी! :)
ताई काय आहे गं हे!!! :(
विद्याधर, माझं डोकंबिकं फिरलंय कि काय अशी शंका आली ना तुला?! :)
नाही..अजून तरी आहे ताळ्यावर!
:)
दुसर्याकडून घेताना जास्तीत जास्त घ्यावे
जमलं तर सारेच घ्यावे...
देतांना मात्र कमीत कमी द्यावे
जमले तर काहीच देऊ नये...
च्या जगात तू कसल्या अपेक्षा करते आहेस अनघे?
ह्म्म्म खरं आहे तुझं भाग्यश्री...
'घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे'...हे वेगळ्या अर्थाने घेतात ही लोकं!
शेवटी पोटापाण्याचा प्रश्न आहे ना पण!?
:)
hahaha Egypt cha Mummyla jagat kimmat jast bhejala nahi asech he jag aste , jivant astna konala kimmat naste mummy zali ka gavbhar dhindora petvnar lok , bheja fry to seven up try
सौमित्र, :D
बिरबल(@ सौरभ)-ने अगदी योग्य उपाय सुचवलाय
ह्म्म्म..आणि त्यावर गौरीने एक धोक्याची घंटा पण वाजवालीय! :)
अगं हो गं, गौरीची प्रतिक्रिया मी बघितलीच नाही... खरय बाबा... च्यायला... दुरून चांगली दिसणारी आणि किचन मध्ये मरणाचा गचाळपणा असलेले हॉटेल्स पाहिलेत... त्यामुळे सांभाळून निर्णय घेतलेला बरा
पहिले कडवे : भूक लागली... :D
दुसरे कडवे : मग काय झाले त्यात?
तिसरे कडवे : आयला.. असे आहे काय... :)
चौथे, पाचवे कडवे : काळजी वाढली..
शेवटचे कडवे : उपाय शोधायलाच हवा..
अगदी वेळेवर पोस्ट वाचली बघ मी... मला पण वीट आलाय.. किती स्कॅन केलाय मी.. बाकीचा मजा भेजा अधिक किमतीला विकणार आहे मी.. :) विचार पक्का केलाय मी... :D
Post a Comment