आसमंतात सतत दोन प्रकारच्या उर्जा वहात असतात.
वाईट व चांगली.
प्रत्येक क्षणी.
हे माझ्यावर आहे, मी त्यातील कुठल्या उर्जेला तेल पाणी घालणार आहे.
जिची मी निगराणी करेन, तीच मला फळे देईल.
दुष्ट वा सुष्ट.
निगराणी...कळत वा नकळत.
जपेन तीच उर्जा, कधी मला ग्रासून टाकेल वा कधी मला तेजाळून टाकेल.
ह्याचा अर्थ, त्या उर्जांचे अस्तित्व प्रथम मला मान्य करावयास हवे.
तरच माझ्या मेंदूवर वाईट उर्जेचा हल्ला मी परतवून लावू शकेन.
मी, गढूळ लाटेला अटकाव केला तर माझा किनारा सुंदर मऊगार राहील काय?
मी, गडद मळभ माझ्या आकाशात नाकारले तर माझे आकाश उजळलेलेच राहील काय?
माझ्यावर स्वामित्व माझेच हवे.
मीच ठरवावे, माझ्या घरात कोणी यावे.
माझी ताकद मला, सर्वस्वी पणास लावावयास हवी...
नाही तर त्या लाटेचे बळ, त्या मळभाचे साम्राज्य,
चंचूप्रवेश करेल आणि...
मग कोण मी आणि कसला किनारा....
मी...
एखादा रिकामा शिंपला.
LOC
21 comments:
सूऽऽपर्ब! आजकालच्या जगात हा/हे प्रश्न वारंवार पडायला लागलेत.सतत आपला मार्ग स्वच्छ करून घ्यावा लागतोय.
खरोखर विनायक, सारखे हल्ले होत असतात. :)
सुंदर.. दुसरा शब्दच नाही..
खरंच हे वाईटाला असं अटकाव करणं जमायला हवं !
अगदी अगदी!
:) कठीण आहे पण हे आपल्याला जमवायलाच हवं हेरंब...कदाचित एकमेकांच्या मदतीने... :)
नीरजा, बऱ्याच दिवसांनी आलीस... आभार गं प्रतिक्रियेबद्दल. :)
अगदी खरंय ! सुंदर व्यक्त केलंय अनघाताई !
माझ्या मते उर्जा एक आणि फक्त एकाच प्रकारची असते. फक्त हेतू वाईट किंवा चांगला असतो. ती कशासाठी वापरली जाते त्यावर सगळं अवलंबून आहे. उदाहरण द्यायचं झालं तर वीजेचं देता येईल. वीजेने जसं पाणी गरम होतं तसचं हवा थंडपण करता येते.
so just let it be whatever is around and make use of it for good reason... there won't be much questions then. ;)
स्पायडरमॅनमध्ये वाईट स्पायडरमॅनचा जो कन्सेप्ट आहे तो तसाच आहे...
त्याच्या मनात, बदल्याची असूयेची भावना मूळ धरू लागल्याबरोबर वाईट म्युटेशन कंट्रोल घेऊ लागतं.. अन जेव्हा तो चर्चमध्ये वाईट पेशींना उतरवून फेकतो असा सीन आहे, तेव्हा त्या स्पायडरमॅनचा बदला घेण्यासाठी आसुसलेल्या दुसर्याच्या अंगावर पडतात..थोडक्यात मनावर वाईट ऊर्जेचा कंट्रोल स्थापित होतो..
असला सिम्बॉलिझम पाहून कधी कधी स्पायडरमॅन लहान मुलांचा काम म्हणावा असा प्रश्न पडतो..
असो थोडं विषयांतरच झालं! :P
:) सौरभ बुवा, नेहेमीच असं नाही होतं...होत असेल तर उत्तमच आहे.
परंतु, There is (-) energy and there is (+) energy. आणि बऱ्याचदा आपले मन इतके हळवे झालेले असते कि ही (-) energy कार्यवत होते...आणि मग ते आपलेच मन आपल्याला खोल घेऊन जाते. कदाचित नकळत. :)
धन्यवाद समीर. :)
विद्याधर, तो आपला स्वत:शीच चांगले आणि वाईट ह्यातील झगडा. परंतु, बाहेर देखील चांगल्या आणि वाईट उर्जा (energy) काम करत असतात आणि आपण नकळत त्याला बळी पडतो. (Low feel करतो.) चांगल्या गोष्टी मग दुर्लक्षिल्या जातात. नाही? :)
ह्म्म ताई...गल्ली चुकलीच थोडी माझी! :)
बरोबर आहे...बहुतेकदा असं होतं खरं.. आसमंताचा परिणाम...कधीकधी त्यातनं आपल्या आतली द्वंद्वं जन्म घेतात!
कधी आपल्यातलं चांगलं जिंकतं, तर कधी हरतं! :)
बाय द वे... आत्ता ही कमेंट लिहितानाच महानता लागलाय..अन टपका रे टपका च चालू आहे!! :D:D
:) नाही गल्ली नाही चुकली...कारण ह्या सगळ्या गल्ल्या मला वाटतं आत्मसन्मान, प्रगती...आर्थिक नव्हे...मानसिक...ह्यांचकडे नेतात.
आता हा कितव्यांदा बघतोयस महानता?? आणि त्यावर काहीतरी डोक्यात शिजत होतं ना? त्याचं काय झालं भाऊ?! :)
कदाचित म्हणूनच म्हणत असतील," असंगाशी संगत म्हणजे प्राणांशी गाठ ". काही वेळा तर कळत असूनही बळी पडतो आपण. हे सगळ्यात जास्त लागते जीवाला... :(
माझ्यावर स्वामित्व माझेच हवे... हेच खरं. तेही घट्ट व कणखर.
अनघाताई,
अगं झी सिनेमा यूके मला पोस्टच्या तयारीसाठी पूर्ण संधी देतोय :)
आता तयारी पूर्ण झालीय असं वाटायला वाव आहे..लिहितो लवकरच! :D
हो ना भाग्यश्री? आणि बऱ्याचदा कळतही नाही कि हा असंग आहे!
आभार गं प्रतिक्रियेबद्दल.
:)
छान..!
ह्या बाळाने विचार करायला लावला गं बाई...
बापरे! किती ही बाळंतपणं !! :p
अनघा, गेले २ दिवस माझं चित्त अजिबात थार्यावर नव्हतं... जरा उशीरच झाला; पण बरं झालं तुझा लेख वाचला...
श्रीराज बुवा...
:)
Post a Comment