नमस्कार

नमस्कार

Pages

Saturday, 29 January 2011

ललित

आज मला हलकंफुलकं लिहायचंय.
एकदम ललितबिलीत.
इथून तिथून उपमा. म्हणजे निळेशार पाणी, हिरवीगार वनराई, पिवळेधमक गुलाब, जांभळे जांभळे डोंगर, तरंगती फुलपाखरं! अगदी अगदी.

जळले ते सोनावणे, जळला ते ट्युनिशिया आणि मढ झालं त्या इजिप्तचं. अगदी पिरॅमिड!

माझं डोकं हा एक कोळसा आहे. त्यावर मी रोज पाणी ओतते. त्याचा सोनावणे नको व्हायला!
या या...चला भेटूया...
वाद घालूया...चला चला चर्चा करूया!
येताना एक मडकं घेऊन या!
फोडा ते!
ओता पाणी!
कोळश्यावर माझ्या!
डोकं माझं एक कोळसा आहे!
होतं ललित मनात....त्याचं झालंय मात्र जळीत!

16 comments:

Raindrop said...

u write what u feel and that is the beauty of ur blog...lalit ya zalit...we love it all. fakta mala pani chya navanech thar thar hotaay....itki thandi aahe ithe....yetana ice-cream aanen ok :)

rajiv said...

ठिणगी झेलून रान पेटवायची ताकद कोळश्यात असते !!
नवनिर्माणाच्या आधी शेत पण भाजून घेतात !
पौष गेल्यावर काही काळाने वैशाख येतोच ... व त्यानंतर येतो श्रावण .
फक्त धीर धरावा लागतो व वैशIखाच्या चटक्यानंतर सामुहीक एकीने व सहाय्याने पेरलेल्या बीजातून नवनिर्माण होते हा निसर्गनियम व इतिहास आहे
त्यासाठी प्रयत्न फक्त करायला हवेत व पेटलेल्या कोळशाच्या धगीनेच ते साध्य होईल

Anagha said...

वंदू, असहाय वाटतं हे जे काही घडतंय आजूबाजूला त्यामुळे! आशादायी काही नाही.

Anagha said...

आशावाद का राजीव? ठीक. त्याची देखील गरज असतेच अधूनमधून.

सौरभ said...

कोळसा नाही... कोळश्याची खाण आहे तुमचं डोकं. आणि त्यात असंख्य हिरे आहेत. :)

विनायक पंडित said...

अग्रीड!

THEPROPHET said...

ताई कालपासून माझ्यापण डोक्याचं जळून पार भरित झालंय! :(

Anagha said...

विद्याधर, आजच्या पेपरात श्रीयुत सोनावण्यांबद्द्ल काही चांगले नाही लिहून आलेले. अर्थात तो पोपट शिंद्यांचा जबाब आहे...काट्याने काटा काढला गेला का? असा प्रश्न मनात आला.

Anonymous said...

>>>>कोळसा नाही... कोळश्याची खाण आहे तुमचं डोकं. आणि त्यात असंख्य हिरे आहेत. :) +१००

(तूझी नवी पोस्ट आल्याचे मला सगळ्यात शेवटी कळते आणि मला जे म्हणायचेय ते कोणितरी आधिच म्हटलेले असते :( )

सोनावणे- शिंदे प्रकार म्हणशील तर अंगावर काटा येतो त्या बातमीने, पण सत्य खरचं समजणार आहे का आपल्याला.... नुसती दिशाभूल आहे सतत....

हेरंब said...

नजर जाईल तिकडे जळीत दिसत असताना एका संवेदनशील ब्लॉगवर ललित लिहिता लिहिता जळीत जन्माला आलं तर त्याचं आश्चर्य वाटायला नको !!

खरंच, या जळीत प्रकरणांनी जीव जळतो !

Anagha said...

तन्वी, सत्य जे काही बाहेर येतंय, ते भयंकर आहे. निराश करणारं.
हे सगळं आपल्याला ( विशेष करून आपल्या मुलाबाळांना) कुठे घेऊन चाललंय ह्याचा विचार केला, तर चित्र भीतीदायक आहे.

Anagha said...

हेरंब, ह्या सगळ्यावर काही उपाय आहे काय? काही कळत नाही. मतदान करणे हा जर उपाय धरला, तर जी लोक आपल्यासमोर उभी केली जातात त्यात एकही मत देण्याच्या लायकीचा नसतो.
काय करायचं तरी काय आपण ह्यावर?!

Shriraj said...

Saurabh's comment number 1 :)

Yogesh said...

जळीत प्रकारणांनी डोक्याच जळीत झालय...

सौरभ ची कमेंट भारीच.

Anagha said...

आभार श्रीराज....

Anagha said...

रोज पेपर उघडणं पण नकोसं झालेलं आहे....
प्रतिक्रियेबद्दल आभार योगेश.