नमस्कार

नमस्कार

Pages

Sunday, 16 January 2011

पुंजी....?

म्हणजे कसं...
दशकं...कित्येक दशकं...पेटीत पुंजी साठवत होते.
एकेक क्षण जमा केला. एकेक दिवस...एकेक रात्र जमा केली.
आज बघितलं...कित्येक दशकांची कुलूपबंद पेटी उघडून आत डोकावलं...तर अंधार...त्या पेटीला काही तळच नाही. मग...माझा खारा घाम, गेला कुठे? माझा टपोरा अश्रू, गेला कुठे? आयुष्यातील इतक्या वर्षांची साठवण, गेली कुठे? ह्यालाच का रसातळाला जाणे म्हणतात?
म्हणजे एकेक क्षण त्यात जमा करताना...आधीच ती 'तुझ्या डोक्याची पेटी' उघडून बघायला हवी होती. तुझ्या डोक्यात काही जमा होतंय की नुसतीच गळती लागलीय...हे तरी नक्कीच तपासायला हवं होतं. साधीच गोष्ट होती खरं तर...पण वसा बावळटपणाचा घेतला होता...
मग आता दुसरं काय होणार?
...रिकामं डुक्कर खातं...हाताशी लागणार!

17 comments:

THEPROPHET said...

गरीबाला फारशी कळली नाही पोष्ट! फक्त टोन डार्क असल्याचं जाणवलं! :(

रोहन... said...

ए.. काय गं... गेले ८ महिने मग काय त्या पेटीच्या भिंतीला चिकटवलेल्या आठवणी पोस्टत होतीस... :)

Anagha said...

माहित नाही...आपण आपलं आयुष्य घालवतो...लक्षात देखील येत नाही पण दिवस वर्ष निघून जातात...जसे काही आपण ती पुंजी जमा करत असतो...पण ज्यांच्यासाठी ही गधामेहेनत करत आहोत त्यांच्या डोक्यातच हे नाही शिरलं तर सगळंच शून्य...नाही का?

सौरभ said...

अरे औ मड्डमजी, कहा खोज रहे हो पुंजी??? नीट बघा, भक्कम व्याजासकट ती पुंजी तुमच्याच जवळ, तुमच्या आसपास आहे. कुठे नाही जात ती. :)

Yogesh said...

ज्यांच्यासाठी ही गधामेहेनत करत आहोत त्यांच्या डोक्यातच हे नाही शिरलं तर सगळंच शून्य...नाही का? +१२३४.....

Raindrop said...

STATUTORY WARNING : Punji will vaporise if not taken out from time to time.

Do you smell pink tube roses in the house? Maybe that is what they vaporised into.

Anagha said...

सौरभ, ते चालतं बोलतं व्याज आहे...पुंजी नाही! :)

Anagha said...

धन्यवाद योगेश. :)

हेरंब said...

माझं सेम बाबासारखंच झालं होतं.. म्हणून म्हटलं थोडं थांबूया.. इतर प्रतिक्रिया आणि उत्तरांमधून आपलं ज्ञानार्जन होईल.. तसंच झालं.. :)

>>पण ज्यांच्यासाठी ही गधामेहेनत करत आहोत त्यांच्या डोक्यातच हे नाही शिरलं तर सगळंच शून्य<<

कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन् ...
नेकी कर कुए मे डाल..

वगैरे वगैरे !!!!

Anagha said...

हेरंब, तुझी कंमेट आली नाही हे बघून ते मला कळलंच होतं. :)

Anagha said...

वंदू, किती सुंदर आहे हा विचार!
'पुंजी जी जमा केली त्याचा सुगंध पसरलाय ना आसमंतात'? घरभर?
:) छान!! हसूच आलं मला!
माझी नस्ती चिडचिड कमी केलीस तू! :)

Raindrop said...

:)

Shriraj said...

अनघा, जर क्षणांचे गुणधर्म पाण्यासारखे असतील, तर तुझे बाष्पीभवन झालेले 'क्षण' पुन्हा नव्या स्वरुपात नक्की बरसतील बघ....

Anonymous said...

>>>>गरीबाला फारशी कळली नाही पोष्ट! फक्त टोन डार्क असल्याचं जाणवलं! :(

+1

आधि बाबा+१ .. मग हेरंब +१....

Anagha said...

आभार श्रीराज. :)

Anagha said...

तन्वी, जाऊ दे त्रास नको करून घेउस.... गुंतागुंतीचं आहे गणित. :) आभार प्रतिक्रियेबद्दल. :)

भानस said...

बयो, अगं प्रत्येक नेकीचं उत्तर जिथे ती केली तिथूनच मिळेल का? आणि पूंजी म्हण व्याज म्हण, ते तुझ्यापाशीच आहे, पुढेही मनाने राहीलच. :)

चला आता पुडकी उचकणं बंद करा आणि खळखळून हसा... :)) असे...