काल 'नो वन किलड जेसिका' पाहिला. बातम्या सनसनाटी करता करता मिडीया 'इच्छा असेल तर' समाजाचे भले देखील करू शकते ह्या बद्दल एक विश्वास वाटला. स्वत: जाहिरातक्षेत्रात असल्याकारणाने हे सर्व प्रकार काही विघातक कामे न करता, उलट किती घातक कामे करू शकतात हे रोजच्या अनुभवातून कळतेच. 'पिपली लाइव्ह' मध्ये तेच दाखवले होते. परंतु सध्याच्या काळात एकूणच कोण कशी वाईट कामे करतोय, किंवा कोण वाईट कामे करून देखील कसा उजळ माथ्याने फिरतोय...हे सर्व वारंवार ऐकून, बघून आणि वाचून निराशा दाटून येण्यापलीकडे काहीही होत नाही. त्या उलट जर कोणी लढा दिला असेल आणि प्रचंड ताण सहन करून देखील तो विजयी झाला असेल तर ते वाचणे वा बघणे हे जिगीषा जागृत करणारे ठरू शकते. किंबहुना त्याचीच सद्य परिस्थितीत गरज आहे असे माझे प्रामाणिक मत आहे.
'नो वन किलड जेसिका' बघून तसेच वाटले. आपला जगण्यासाठीचा लढा लढण्यास मग अधिक बळ मिळून जाते. 'पिपली लाइव्ह' बघून ही भावना नव्हती जिवंत झाली. त्याच उलट कापूस शेतकऱ्यांच्या आयुष्यावरच बेतलेला मराठी सिनेमा 'झिंग चिक झिंग' अधिक गरजेचा वाटला होता. जबाबदारीचा वाटला होता.
आता वाचन!
आंद्रे अगासी हातात पडलाय. पण त्याचे वादग्रस्त आयुष्य वाचताना घरातच एक वाद उभा राहिलाय! ते पुस्तक कोणी आधी वाचायचं ह्यावरून! आम्हां दोघीत! लेक आणि मी! म्हणजे ते कधी ठेवलेलं दिसलं की पटकन त्यावर ताबा मिळवणे, ते लपवून ठेवणे, ते पुस्तक अंगाला चिकटल्यासारखे घरात वावरणे...वगैरे वगैरे! त्यात दोनदोन बुकमार्क्स म्हणूनच पडलेत. परंतु, ही नवी पिढी जुन्या पिढीची डाळ काही शिजू देत नाही! म्हणजे माझा चिमुकला बुकमार्क मला कधी परत पुस्तकात दिसतच नाही! उलट घरात इथे तिथे पडलेलाच सापडतो! इतकंच नव्हे तर माझे पण नाव त्या पुस्तकावर टाकण्याची माझी विनंती बिलकुल फेटाळून लावण्यात आलेली आहे! :(
तर मंडळी, 'आंद्रे अगासी- OPEN' मिळवा आणि नक्की वाचा! मला वाटतं मराठीत भाषांतर होण्याची वाट बघू नये. कारण मूळ भाषेतील सौंदर्य भाषांतर करताना टिकून राहिलंच की नाही, कोण जाणे. साहित्यिक मूल्य असलेलं पुस्तक! माझं जेव्हढं काही वाचून झालेलं आहे ते अप्रतिम आहे....त्यात नुसता खेळ नाही...तर खेळ खेळता खेळता सांगितलेलं साधं सरळ सोपं तत्वज्ञान आहे. आपण देखील त्याच्याबरोबर लहान होतो, हरतो, जिंकतो. आपल्या आयुष्याचे तत्वज्ञान आपण 'त्याच्या' अनुभवातून शिकतो. सरळ भाषेत...आणि म्हणूनच मनाला भिडणाऱ्या. कधी कधी अवाक करणारे विचार, अचंबित करणारे दाखले!
Like his beautiful different strokes!
Must 'Watch'!
ह्या पुस्तकाचे लोकसत्तात आलेले परिक्षण-
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=117492:2010-11-26-14-58-59&catid=34:2009-07-09-02-04-26&Itemid=11
17 comments:
:) dar ke aage jeet hai....u gave a different meaning to that baseline :) nice!
ह्या तीनही गोष्टी- जेसिका, झिंग चिक झिंग आणि अगासी...ह्यातील समान धागा हाच नाही का वंदू? :)
सुरेख!!! खरोखर media किती powerful आहे, ते "No one..." मुव्ही बघून कळते... बऱ्याच दिवसापासून एखादे पुस्तक शोधात होतो, वाचनासाठी. OPEN बद्दल ऐकले होते मित्राकडून...आता तर नक्कीच वाचणार. धन्यवाद!!!
पंकज, पुस्तक आवडलं कि नाही सांग हं नक्की. :)
पाहिला नाही अजून सिनेमा...
पण जेसिका लालच्या मीडिया लढ्यानंतर मला फार वेगळे प्रश्न पडले होते.. असो..
माणसाची आंतरिक अन आत्मिक शक्ती हा खरोखरच संशोधनाचा विषय आहे!
विद्याधर, काल सिनेमा बघितल्यावर आज 'विकी' काकांना प्रश्र्न विचारले होते मी. त्यांची उत्तरे ह्यात आहेत.
http://en.wikipedia.org/wiki/Murder_of_Jessica_Lall
बघ तुला काही सापडतं का.. :)
जेसिका नक्कीच बघायचा आहे... झिंग चिक झिंग बद्दलही बरंच ऐकलं आहे पण विंग्रजीच्या विशलिस्टमधून वेळ काढायला लागेल ;)
मला आगासी आवडायचा नाही त्यामुळे हे पुस्तक वाचलं नव्हतं मुद्दाम.. हेहे.. पण आता नक्की वाचतो.. पुढच्या आठवड्यातच आणतो लायब्ररीतून.
हेरंब, अगासी आवडायचा नाही हे खूपच सबळ कारण आहे हे पुस्तक वाचायला! :)
वाच नक्की!
हा हा हा हा.. जबरी !!!!
:)
हे चांगलं करतेस तू. चांगलं चांगलं बघशील/वाचशील ते असंच सांगत रहा
हा मुव्ही पाहिला नाही मी. राणीताईंचा strong comeback आहे असं समजलय. आंद्रे काकांना वाचू पुन्हा कधी वेळ काढून.
मला एक समजत नाही. विजय नेहमी पराजयानंतर का येतो? नेहमी शेवटी असतो तरी तो विजय कसा काय? अजिब आहे.
मी अजून हे दोन्ही सिनेमे पाहीलेले नाहीत. जेसिका तरी लगेच हाती लागेल पण झिंग चिक साठी वाट पाहावी लागणार. :( पुस्तकाबद्दल ऐकून आहेच, चला आता तू इतकी भलामण केल्यावर वाचायलाच हवे. :)
जयानंतर पराजय आणि पुन्हा जय, ही अव्याहत साखळीच. फक्त बरेच जण पराजयाच्या कड्यांतच रूतून बसतात.
ए मी पण नाही पाहिलेले दोन्ही सिनिमे.... नो वन पहायचाय तो जेसिका लालसाठीही पण तितकाच रानी मुखर्जी आणि विद्या बालनसाठीही....
पुस्तकं मात्र नक्की मिळवून पटकन वाचणार.. पुन्हा दोन कारणं... एक तर आगासी मला आवडतो आणि स्टेफी ग्राफही, दुसरे म्हणजे मॅडम आपने बोला तो बात मे दम हैच ना... :)
बाकि मिडियाबाबत तू मांडलेले मुद्दे पट्ले...
(हेरंबा आगासीबाबतचे आपले मत वेगळे... :( )
जेसिका ह्या केसबद्दल खूप वेगवेगळी मते आहेत. मिडीयाने ही केस उचलली कारण त्यात त्यांना स्वत:ची तुंबडी भरायची होती. ह्या प्रकारच्या अनेक केसेस आमच्या देशात होत असतात परंतु त्याकडे दुर्लक्ष केलं जातं वगैरे वगैरे..परंतु ही केस म्हणजे वाईटातून चांगले निघणे ह्याचे एक उदाहरण.
आणि तन्वी, पुस्तक वाचलंस कि सांग नक्की...आवडलं की नाही ते. :)
तुमची पोस्ट आवडली.मीही नुकताच पाहिला ’जेसिका’ चित्रपट म्हणून खरंच खूप चांगला वाटला.मुळात कसं कसं काय काय झालं असेल याचं औत्सुक्य जागं ठेवलंय!
विनायक, ब्लॉगवर तुमचे स्वागत.
आणि प्रतिक्रियेबद्दल आभार.
आजच्या HT CAFE मध्ये सब्रिनाची मुलाखत आली आहे. तिने म्हटले आहे कि दिग्दर्शकाने सत्य जसेच्या तसे ठेवले आहे. :)
Post a Comment