गेलं ३६५ पानांचं पुस्तक फार झपाट्यात संपलं.
वाचनास सुरुवात केली आणि खाली ठेवण्यास अवधी न मिळावा.
त्या वेगाची धाप लागली...श्वास कोंडला.
ते पुस्तक होतं संमिश्र. भावनांचा कल्लोळ.
दु:ख, वेदनेची परिसीमा आणि त्यात काही आनंदाच्या क्षणांची थोडीशी सरमिसळ.
भर उन्हांत, खचलेल्या भुईवर एखाददुसरा थेंब पडावा आणि आतून खोलवर दडलेले बीज अंकुरावं. प्राणवायू सापडावा...आणि त्याने तग धरावा.
आता वाटतं...हे नवीन पुस्तक मात्र थोडं संथ वेगाने पुढे सरकावं...
अर्थात ह्या सगळ्या वाटण्याच्या गोष्टी...
वाटताना काहीही वाटू शकतं.
नासलेल्या दुधाची बासुंदी व्हावी असे देखील वाटू शकतं..
शेवटी, हातात जे पुस्तक सरकवण्यात आलं आहे...
कोण जाणे त्यात काय दडलं आहे?
21 comments:
पुस्तक कोणत्याही वेगाने संपु देत. आपल्याकडे अख्खी लायब्ररी आहे. भरपुर पुस्तकं आहेत.
:)
काय माहित किती आहेत लायब्ररीत पुस्तकं?!
सिंधुताई म्हणतात ना...देवा, आम्हांला आमच्या दु:खाचा विसर पडू देऊ नकोस...
मला आपलं वाटतं...परंतु आता नवी दु:खं नको देऊस....तेव्हढी मानसिक ताकद नाही राहिली...
:)
भरपुर आहेत. कमी पडली तर आमच्या लायब्ररीतुन धाडुन देऊ. चिंता नसावी.
नवीन पुस्तकं तुला उसंत,सवड, शांतता व आनंदाने तुला हव्या त्या वेगाने पाने उलटत जाऊ दे.शेवटी फक्त वाटणं हेच आपल्या हातात असते आणि तेच आपण पॊझिटिव्हली करत राहायचे.
नववर्ष शु्भेच्छा!
आभार गं भाग्यश्री प्रतिक्रियेबद्दल. आणि नववर्षाच्या शुभेच्छा. :)
शेवटी, हातात जे पुस्तक सरकवण्यात आलं आहे...
कोण जाणे त्यात काय दडलं आहे?
२ दिवस झाले पण अजून जुन्या पुस्तकातून बाहेरच आलो नाहीये ...
बंड्या, मला आशा आहे कि तुझं जुनं पुस्तक आनंददायीच होतं!
जुनं पुस्तक आनंददायीच होतं :)
हुश्श! बंड्या, मला खूप बरं वाटलं हा हे ऐकून! :)
अनघा, मला अगोदर लक्षातच नाही आलं "३५६ पानाचं पुस्तक" म्हणजे काय ते...:P
३५६? हम्म्म्म श्रीराज, लग्न झाल्यापासून तुझं काही खरं नाहीये हा! :p
पुढची ३६५ पाने लिहायला घ्या... :) नवीन प्रोजेक्ट दिलाय तुम्हाला.. :D
तुझं ३६५ (+/-) पानांचं प्रत्येक पुस्तक आम्ही तेवढ्याच आवडीने वाचू :)
रोहन आणि हेरंब, माझ्या पुस्तकामध्ये काहीही येऊ शकतं हा! हसरं, रडकं, भांडणारं..! :)
आन्ने द्दो !
हसरं, रडकं, भांडणारं... शेवटी सर्व जीवनाचेच रंग... :) मी नाही करत असा दुजाभाव ;) सर्वांना समान न्याय.. हेहे.. :) हसायचे तितकेच रडायचे.. भांडायचे तितकेच गट्टीफू करायचे.. :) अरे हो अचानक लक्ष्यात आले की मी बरेच दिवस कोणाशी भांड्लेलो नाही आहे... :) कधी भेटतेस??? ;)
हेहे! रोहन, मी कसली बोडक्याची भांडतेय!
:) :D
"मी कसली बोडक्याची भांडतेय"
इतक्या लवकर विसरुन गेलात??? :O
hehe!!!
सौरभाssss! तो विषयच तसा होता! तुझी सो.कु.!?
ह्या विषयावर मी कधीही आणि कितीही वेळ भांडायला तयार आहे!
:p
हे पुस्तक म्हणजे पीएफ अकाऊंट असतं...
थोडं कॉन्ट्रिब्युशन कंपनीचं अन थोडं आपलं :)
नव्या वर्षाच्या शुभेच्छा!!
:) 'पीएफ अकाऊंट'! छान आहे कल्पना!! आभार विद्याधर आणि तुलाही शुभेच्छा! आणि अजून एकदा आभार रे बाबा! एव्हढ सगळं वाचल्याबद्दल! आणि प्रत्येक पोस्टवर प्रतिक्रिया दिल्याबद्दल! :)
Post a Comment