तसाही विचार करायला फारसा वेळबीळ मिळत नाही. आणि त्यातून कामाचा प्रकार असा
आहे की २४ x ७ डोकं लढवत बसणे भाग असते. जाहिरात क्षेत्रामध्ये कुठल्याही
कामाचा 'रिझल्ट' हा ताबडतोब दिसून यावा लागतो. म्हणजे जाहिरातीत जे काही
बोलले जाईल त्याच्याशी वाचक (प्रिंट मिडीया), श्रोता (रेडियो ) वा प्रेक्षक
(टीव्ही वा चित्रपट) हा त्वरित कनेक्ट व्हावयास हवा. समोरच्या माणसाच्या
भावनांना हात वगैरे. त्यामुळे प्रत्यक्ष एखाद्याशी बोलण्याचा प्रश्न
उद्भवला तर आपण जे काही बोलतो आहोत, ते समोरच्याला समजेल असे असावे.
त्याच्याकडून आपल्याला जी अभिप्रेत आहे ती कृती मिळवण्यासाठी काय प्रकारची
भाषा व काय बोलले पाहिजे हे जाणून घेण्यासाठी हा मेंदू तयार झाला आहे....वा
तयार होत आहे.
हल्ली माझ्यावर सार्वजनिक वाहनांचा लाभ घेण्याचे प्रसंग कमी येतात. त्यामुळे जिथे 'नियम पाळणे' ह्या आपल्या कर्तव्याची सर्वप्रथम परीक्षा होते ते बहुतांशी तरी माझ्याच हातात असते. आणि मी नियम तोडायला जात नाही.
हल्ली माझ्यावर सार्वजनिक वाहनांचा लाभ घेण्याचे प्रसंग कमी येतात. त्यामुळे जिथे 'नियम पाळणे' ह्या आपल्या कर्तव्याची सर्वप्रथम परीक्षा होते ते बहुतांशी तरी माझ्याच हातात असते. आणि मी नियम तोडायला जात नाही.
मात्र गेल्या काही दिवसांत ३ वेळा मला टॅक्सी करावी लागली. मग तीनही वेळा दार उघडून आत शांतपणे बसल्याबसल्या मी चालकाला चार गोष्टी सांगितल्या. सर्वात प्रथम मला नक्की कुठे जायचे आहे ते. दुसरी, तिसरी आणि चौथी गोष्ट...पहिल्यावेळी मी आधी मराठीत बोलून पाहिलं. मग लक्षात आलं की शेवटी मी जे काही बोलणार आहे ते फार महत्त्वाचं आहे...आणि ते समोरच्याला कळणे जरुरीचे आहे. समोरच्याला संवादाची भाषा हिंदी हवी होती...मग मी हिंदीत बोलले. माझ्या मुंबईच्या धेडगुजरी हिंदीत. पण ठामपणे.
"अब हम चार चीजें करेंगे...एक...हम खालीफोकट हॉर्न नही बजायेंगे...दो...हम एक भी सिग्नल नही तोडेंगे...तीन...हम झीब्रापे सवार नहीं होंगे...और लास्ट में...हम खिडकी के बाहर थुकेंगे नहीं."
"ठीक हैं...ऐसा ही होगा...!"
"धन्यवाद...!"
प्रत्येक वेळी होकारार्थी उत्तर मिळालं.
आणि त्या तीनही चालकांनी मला दिलेला शब्द पाळला...मी त्यांच्या गाडीत बसले होते तोपर्यंत.
निदान इतकं तरी पुरेसं आहे...नाही का ?
मी काही 'रिक्षा प्रदेशात' रहात नाही...पण हा एक प्रयोग त्यांच्यावरही करून बघायला हरकत नाही.
मला वाटतं...मी ज्या काही भाषेत बोलले...आणि जे काही बोलले...त्यातून समोरच्याला ठराविक कालावधी पुरती का होईना मला हवी ती कृती करावयास मी भाग पाडले.
हा प्रयत्न करून बघता येईल का तुम्हाला ?