नमस्कार

नमस्कार

Pages

Thursday, 6 October 2011

"You made my day !"

त्यांचं व्यसन सुटून वीस वर्षे उलटून गेली. पण त्यांच्या तंत्राचा आज मला उपयोग झाला.

आमच्या कचेरीत एका कोपऱ्यात ट्रेड मिल आहे. जर सव्वा नऊच्या आसपास पोचलं तर अजून मासळीबाजार सुरु झालेला नसतो. मग बऱ्यापैकी एकांत मिळतो. मी रात्रीच सुयोग्य शूज बॅगेत टाकले होते. सकाळी धावतपळत एकदाचे त्या चलपट्टीवर चालणे सुरु केले. जवळपास दीड वर्षानंतर. वीस मिनिटे थोडा घाम गाळून झाला...थोडी चरबी वितळवून झाली. त्या खोलीतून बाहेर आले तर आमचे जोशी स्थानापन्न झालेले दिसले.
"अहो, अजून आता किती बारीक व्हायचंय ?" गुटख्याने फुगलेल्या तोंडाने जड प्रश्र्न त्यांनी मला विचारला.
"जोशीबुवा ! सक्काळी सक्काळी काय ते तोंडात भरून ठेवलंयत ! जा आधी ! फेकून या पाहू !"
तोंडाचा चंबू सांभाळत जोशी उठले. तोंड रिकामं करून आले.
"बुवा, लेकीसाठी सोडणार होतात ना ? काय झालं त्याचं?"
"हम्म्म्म"
"हम्म्म्म काय बोडक्याचं ? तुम्हांला मी सांगितलं ना त्या दिवशी ? आपल्या जे जेच्या सरांचं काय झालं ते ? गुटखा खाऊन खाऊन शेवटी कर्करोग झाला...गेले तेव्हा तोंडाला एक मोठ्ठं भोक पडलं होतं !"
"हो...माहितेय मला....."
"माहित असून उपयोग काय त्याचा ? असं तोंडाला भोक घेऊन मरायचंय का ?"
हसले जोशी...हलकेच.
"तुम्हांला मी एक सांगू का ?"
प्रश्र्नचिन्ह.
"माझ्या ओळखीचे एक गृहस्थ आहेत. बरं का ? त्यांना प्रचंड व्यसन होतं...सिगरेटीचं. दिवसाला चाळीस सिगारेटी ओढायचे ते...चाळीस !"
भुवया आणि चष्मा थोडा वर.
"त्यांनी काय केलं माहितेय का ?  सिगारेट सोडायची हे मनाशी ठरवल्यानंतर जेव्हा त्यांना पहिली तल्लफ आली ना सिगरेटीची...तेव्हा ते मनाशी फक्त इतकेच म्हणाले...थोड्या वेळाने...मग थोडा वेळ गेला...पुन्हा तल्लफ आली...विचार केला...थोड्या वेळाने...असं करता करता तो दिवस उलटला...सिगारेट न ओढता...मग दुसरा दिवस उजाडला. त्यावेळी त्यांनी विचार केला...अरे...काल तर मी सिगारेट ओढली नाही आणि तरी माझा दिवस नीट पार पडला की...मग चला...आजही बघू...आणि असं करत करत तो उलटून टाकलेला क्षण परत कधीही आला नाही...गेल्या वीस वर्षांत !"
"काय सांगता काय ? बस एव्हढंच ?"
"होssssय !" 
जोरदार होकार दिला मी. आणि जागेवर गेले. दिवस सुरु झाला.
संध्याकाळ झाली. साडे सहा झाले. आमचे ह्या क्षेत्राचे कामकाजाचे घड्याळ जगावेगळेच असते...नेहेमीच.  सगळ्यांचीच कामे भरास आलेली होती. मासळी बाजार घुमत होता.
जोशी हलकेच आले.  माझ्या टेबलापाशी उभे राहिले.
"साडे सहा होत आले." गोबऱ्या गोबऱ्या चेहेऱ्यावर थोडेसे हसू.
"हो ना !"
"मला तीन वाजता खूप तल्लफ आली होती हो...पण मी तेच म्हटलं...थोड्या वेळाने...आणि बघा ना...साडे सहा झाले...पण मी गुटखा अजून तोंडात घेतलेला नाही !"
"अरे व्वा ! काय सांगताय काय ?! मस्त !!! झक्कास की हो जोशीबुवा !"
"होssss" 
खुशीत हसतहसत जोशी आपल्या जागेवर जाऊ लागले.
म्हणजे...
कधी नव्हे ते...
'कल करे सो आज और आज करे सो अभी' ह्या प्रचलित वाक्कप्रचाराच्या अगदी उलट झालं म्हणायचं !
इच्छेवर फक्त एका क्षणाचा विजय मिळवायचा...उगाच सुरवातीलाच गड जिंकायला निघावयाचे नाही...एक क्षण प्रथम...मग आपोआप एक तास...एक दिवस...एक महिना...एक वर्ष...आणि मग वीस वर्ष.

कोणी मला त्यांचा अनुभव सांगितला होता...मी फक्त तो कानोकानी केला.

मगाशी जोशीबुवांना दूरध्वनी केला.
"काय हो ? कसे आहात ?"
"हा हा...बरा आहे...."
"नक्की ?"
"हो हो...आणि उद्या तर दसराच आहे नाही का ? मग आज नाही खाल्ला गुटखा तर दसऱ्याला नाहीच खाणार..." हसत हसत जोशी उद्गारले.
"अगदी अगदी...आज तुम्ही खाल्ला नाहीत आणि दिवस तर उलटला...मग आता उद्याचा पण मस्तपैकी जाईल बघा ! भेटूच परवा !"
बहुधा तरी जोशी म्हणाले असतील...बाई डोक्यावरच बसल्या !
:) 

असो...

मी माझ्या आयुष्यात एकाचं जरी व्यसन सोडवू शकले...'मृत्यूचे कारण - व्यसन' हे जरी टाळू शकले...तरी मी समजेन आयुष्यात काही करू शकले.

"Hey ! Nice dress ya ! Looks new..." 
अपर्णा आज सुंदर कुर्ता घालून आली होती. मोहक दिसत होती.
"Ya...my mom bought it for me..."
"From where ...?" बायकी चौकश्या मी सुरु केल्या.
"I will give you the address." ती तिच्या मोबाईलवर पत्ता व नंबर शोधू लागली. मान त्या मोबाईलमध्ये...अपर्णा मला म्हणाली, "Do you know something...your smile is contagious..."
"Ah ?"
"Ya..whenever I see your smiling face na...I feel like smiling ...even if am not in good mood..."
"Oh ! You made my day ! Now every morning am going to show you my smiling face !"
"Ya...please do that...!"

नशीब....तिला मराठी येत नाही !
अहो...नाही तर वाचली नसती का तिने माझी रडगाणी...
एक दिवसाआड मी इथे गात असते ती ?!
:)

22 comments:

सौरभ said...

वाह!!! वर्षभरापुर्वीच आपल्यालापण एक व्यसन लागलय. सुटत नाहीये. रेस्टईजक्राईम वरचे पोस्ट वाचायचे आणि कमेंटायचं... "थोड्या वेळाने... थोड्या वेळाने" असं कितीही वेळा सांगितलं तरी काही होत नाही... काही व्यसनं नं सुटलेलीच बरी.

अपर्णा said...

अनघा, व्यसन या बाबतीत आपली मतं खूप जुळताहेत...:)

अवांतर, तुझ्या पोस्टवर माझं नाव पाहून उगीच म्हणतेय you made my day...:D......रच्याक तुझ्या अपर्णामध्ये आणि इकडे काही साम्य आहे बरं का...:)

तृप्ती said...

sahee upaay aahe :) tyaancha vyasan soDavalyaabaddal tujha abhinandan :)

sahajach said...

अवांतर होइल कदाचित जे बोलतेय ते... पण ’व्यसन’ या शब्दानेच मला चिडचिडायला होते... आणि तू म्हणतेस तसे एकाची जरी अशी सवय सोडायला आपण मदत करू शकलो तर खूप छान वाटते!!! तू सुचवलेला उपाय मस्त एकदम :)

बाकि तुझे स्माईल आहे खरे छान, स्वच्छ स्वच्छ एकदम :)
हसत रहा राणी :)

अनघा said...

सौरभा...तुझे व्यसन चालूच राहील असे मी काही रोज देऊ शकले तर मला आनंद होईल. :)

अनघा said...

अगं अपर्णा...आधीही आलंय ना गं तुझं नाव...विसरलीस ? कि की की ??? :D :D

अनघा said...

तृप्ती, उद्या भेटतील ना मला जोशीबुवा...बघू मला कितपत यश आलंय ! :)

अनघा said...

तन्वे, सही आहे ना उपाय !? बघू, ह्या उपायाने जोशी कितपत वाचलेत ! :)
आणि खूप खूप आभार गं ! :) :D

Sakhi said...

मस्त मस्त !!!

कधीतरी साधे बोलणे, छोटीशी कृती फार काम करून जाते नाही का... अन ती व्हावी ही सदिच्छा :)

Raindrop said...

yes ur smile is contagious :)

Gouri said...

अनघा,
सौरभ ++
आणि तुझं स्माईल एकदम संसर्गजन्य आहे.

बाकी, शहाणे करून सोडावे ... :)

श्रीराज said...

सौरभ आम्हा अनुयायांच्या एकदम मनातलं बोलला हं, अनघा

अनघा said...

:) खरंय श्रद्धा. छोट्या छोट्या गोष्टी आणि खूप खूप आनंद.

अनघा said...

वंदू, :) :)
म्हणून अगदी दोन दोन दिल्या स्माईल्या ! :D

अनघा said...

:) गौरी, अजून तरी शहाणे झालेत बरं का जोशी बुवा !
आणि आभार आभार ! :D

अनघा said...

श्रीराज, ब्लॉग म्हणजे माझं एक टॉनिक आहे...आणि हे माहितेय तुला... :)

हेरंब said...

>> yes ur smile is contagious :)

+12345

आनंद पत्रे said...

सहीच!! स्माईल जास्त संसर्गजन्य आहे म्हणून ऍण्टीडोस म्हणून ब्लॉग लिहितेस काय ? :P

उषांकुर said...

anagha : mast
Saurabh : nice one :)

अनघा said...

हेरंबा ! :)

अनघा said...

हीहीही ! आनंद ! :D

अनघा said...

उषांकुर, ब्लॉगवर स्वागत. :)
आणि प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ! :)