नमस्कार

नमस्कार

Pages

Friday, 12 June 2015

भोग...

त्या थेंबाची गेल्या वर्षी जन्माला आलेली भावंडं नशीबवान होती म्हणायची.
ती मुक्त, मोठ्या ओढीने झेपावत. लाल मातीत मिसळून जात.
माती शहारे. थेंब आणि माती एकजीव, एकरूप होऊन जात.
त्यांचे ते मूक मिलन मला आनंद देऊन जाई.

परंतु…
आज ती माती राहिली नाही.
ओरबाडून टाकली गेली. होत्याची नव्हती झाली. 
सिमेंटची करडी, टणक जमीन आली.

वेडे थेंब मात्र त्याच ओढीने झेपावले.
जमिनीवर आदळले.
कपाळमोक्ष झाला.

कर्म कोणाचे…
भोग कोणाला…

आंधळे थेंब !


4 comments:

इंद्रधनू said...

:(

सौरभ said...

:)

Abhishek said...

मातीत मुरण आणि फरशी वर पडून चिकटून ओघळून जाणं... काळ 'पुढे' चालला आहे...
आपलेही 'भोग'च

BinaryBandya™ said...


छान :)