नमस्कार

नमस्कार

Pages

Tuesday, 11 February 2014

मी खार...

जितकं जमेल तितकं…
आणि ज्या प्रकारे जमेल तसं…

मला मदत करायला आवडेल पण माझ्याकडे श्वास घ्यायला देखील फुरसत नाही…
हे असं मी किती काळ म्हणणार ? काय ही माझी एक पळवाट आहे ?
श्वास घ्यायला जर वेळच नाही तर तो श्वास आपल्या हृदयातून बाहेर पडणे कधी थांबवेल ह्याचा तसा पत्ता देखील लागत नाही. आज आहे, उद्या नाही.
बेभरवश्याचे जिणे इत्यादी.

मुंबईतीलमहानगरपालिकेच्या शाळांचा दर्जा सुधारण्याचे काम माझी काही मित्रमंडळी करत आहेत. Citizens Association For Children. त्यांच्या ह्या गेल्या आठ दहा वर्षांच्या मेहनतीच्या एकेक सुरस कथा ऐकल्यावर ह्यांचा धीर कसा काय नाही सुटला ह्याचे मला आश्चर्य वाटते. एकजुटीने आणि सहनशीलता पणाला लावून मंडळी हे काम करीत आहेत.

माझा आपला खारीचा वाटा.

उदाहरणार्थ त्यांचा लोगो तयार करून देणे, त्यांना वाटप करण्यासाठी लागणारी हॅन्डबिल्स डिझाईन करून देणे वगैरे वगैरे. विनामोबदला. मुंबईच्या नागरिकांकडून मदतीचा हात जर मिळाला नाही तर कोणाच्या आणि कोणत्या जोरावर हे काम मार्गी लागणार ?

खाली आम्ही तयार केलेले एक हॅन्डबिल ठेवले आहे. बघून घ्या. आणि मुंबईत असलात, काही करू इच्छित असलात तर सहभाग घेऊ शकता. तिथे मोबाईल क्रमांक दिलेले आहेत. त्यावत आपण संपर्क साधू शकता.

आणि तसेही आपल्या नकळत आपला श्वास घेतला जातोच…
हे काम मात्र आपण जागरूक नागरिक म्हणून करावयाचे आहे…
:)


2 comments:

सौरभ said...

:) :) :)

Gouri said...

मस्तच ग! तुला कधी सवड असेल, तर ही साईट बघ:
https://www.onlinevolunteering.org/en/vol/
इथे ऑनलाईन व्हॉलेंटियरिंगच्या अनेक संधी आहेत. त्यात लोगो डिझाईन इ. कल्लाकार लोकांसाठी पण आहेत. मला नव्यानेच सापडलंय हे.