नमस्कार

नमस्कार

Pages

Saturday 19 October 2013

निवड

रामाने रावणाचा वध केला.
सीतेची सुटका झाली.
रावणाची दहा डोकी धरतीवर पडून राहिली.
किडे पडले. 
मांस संपून गेले.
त्यानंतर झाले काय… 
ते किडे गाभण राहिले.
त्यातून असंख्य किडे जन्माला आले.
वळवळत जगू लागले.
रावणाचे अंश असे पृथ्वीवर अस्ताव्यस्त पसरले.

सूडाला मृत्यू नाही.
सूड अमर आहे.
तो पुनर्जन्म घेतो.
असंख्य रावण मोकाट सुटले.
रामावरचा सूड घेत नाचू लागले.
राम पुण्यवान होता.
त्याला सद्गती मिळाली.
त्याचा आत्मा मुक्त झाला.
मग आता पुन्हा राम जन्माला येणार कुठून ?
असंख्य रावणाचे वध करणार कोण ?

सीता…
अशोकवन…
भकास अश्रू.
लक्ष्मीबाई…
पाठंगुळीस नारायण…
उसळती आग.
सीतेचा धावा,
लक्ष्मीचा लढा.
कोमल सीता,
सौदामिनी लक्ष्मी.
निवड माझी
मी सीता ?
की
मी लक्ष्मी ?

3 comments:

sanket said...

खूप दिवसानंतर ब्लॉगला भेट दिलीये आणि हा लेख नज़रेस पडला. केवळ अप्रतिम लिहीले आहे ! (y)*1000

श्रद्धा said...

Tai,

...........

सौरभ said...

तुम्ही तुम्हीच रहा... आणि भिडुन जा... बस्स... मॅटर क्लोज... :)