नमस्कार

नमस्कार

Pages

Thursday, 12 September 2013

जुईची फुलं...

"लगेच परवा कुठून आणणार मी हिच्यासाठी कपडे ?"
ती म्हणाली तेव्हा आम्ही दोघी एका शूटसाठी एकत्र आलो होतो. ती तिच्या मोबाईलवर आलेला एक एसेमेस वाचत चिडक्या स्वरात हे बोलत होती. मी काही न कळून तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. आणि तिने तिच्या त्राग्यामागचे कारण सांगायला सुरवात केली.
"I am a working woman…ज्या बायका घरीच असतात त्यांचं ठीक आहे… त्यांना शक्य आहे हे असं एका दिवसात मुलांसाठी कपडे तयार करणं…दही हंडी आहे आणि माझ्या लेकीच्या शाळेत ती साजरी होणार आहे. आणि त्यासाठी तिला कृष्णाचे कपडे घालून यायला सांगितलंय ! आता एका दिवसात कुठून आणू मी कपडे ?!"
"तसेही कृष्णाचे कपडे फार काही कठीण नाहीत ! कमीच कपडे असायचे त्याच्या अंगावर !" मी.
"तरीही…ते मोराचं पीस कुठून आणणार मी ?"
"मी खरं सांगू ? मला वाटतं हे असं आपल्या मुलांना तयार करण्यात ना फार मजा असते !"

आपण जे बोलतो त्याला बहुतेक वेळा आपले अनुभव, आठवणी जोडलेल्या असतात. 
जुईच्या कोमल फुलाचा जणू नाजूक देठ.

लेक कधी मायकल जॅक्सन तर कधी ओनिडाचा डेव्हिल तर कधी टपोरे काळे ठिपके अंगावर मिरवणारा डाल्मेशन. अडीच फूट उंचीचा, कुरळ्या केसांचा मायकल जॅक्सन, रंगमंचावर चांगला दीड मिनिटांचा मून डान्स करून बक्षीस घेऊन आला होता. ओनिडाच्या डेव्हिलची डोक्यावरची छोटीशी शिंग, तिच्या लाडक्या बाबाने रंगवून दिलेला चेहरा…दिवस अगदी संस्मरणीय. आणि ज्युनियर केजीमध्ये वर्गातल्या नाटकातलं ते डाल्मेशनचं पिल्लू…शेपटी हलवणारं. घरून निघतानाच आम्ही भूभू बनून निघालो होतो. वर्गशिक्षिकेने बघताच क्षणी नाकाच्या टोकावर एक काळाभोर टिळा लावला आणि क्षणात माझं पिल्लू, डाल्मेशनचं पिल्लू झालं !

हे सर्व क्षण माझे. तेच माझ्या लेकीचे. काही आम्हां तिघांचे. फक्त आमचे. असे क्षण वेचावे…त्यासाठी आयुष्य वेचावे. पुढले आयुष्य झेपावे…जगता यावे…त्याकरता हीच जुईची नाजूक फुले टिपावी.
आयुष्याची नौका मग कितीही उलटीपालटी झाली…विश्वास बसणार नाही कदाचित; पण ह्याच कोमल कळ्या तारून नेतात…जगवतात.

"I don't know…I had left my job…just wanted to be with my daughter…didn't want to miss out anything…मला आपलं वाटतं…करियर…आज नाही तर उद्या, पुन्हा त्या प्रवाहात शिरू शकतो. मागे नक्कीच पडतो…पण शर्यतीत भाग घेताना मध्येच आपल्या पायांना विळखा घालून एक गोड पिल्लू आलं तर मग कसली ती शर्यत आणि कसलं काय ? ते पिल्लू इतकं भराभर मोठं होत जातं की आजचा दिवस आणि कालचा दिवस ह्यात पण काही साम्य नसावं ! करियरच्या शर्यतीत हे सगळे क्षण बाजूला सारले तर ते मात्र पुन्हा कधीच मिळत नाहीत…करियर लागते पुन्हा हाताशी…असं आपलं मला वाटतं…!"

मला नोकरी सोडणं शक्य होतं ही महत्त्वाची बाब आहेच. ते नसतं तर मात्र फार कठीण होतं. जाहिरात विश्वाला घड्याळ नसतं. चोवीस तास सात दिवस. तेव्हा रहात होतो डोंबिवलीला. दोघांनी जाहिरातविश्वात काम करायचं मग तर बाळं, संसार विसरूनच जावं. रहाट गाडग्याला बांधून घ्यावं.

त्यापेक्षा हे बरं.
थोडी मागे का होईना; पायावर उभी आहे…
हातात जुईची फुलं आहेत.…
पायात त्यांचं बळ आहे.

वहावले.

7 comments:

Kavs said...

Khup sundar- agadi majhya manatla... Majha chhota baal baghta baghta 8 mahinyanche hoil...I can't believe this little piggie has already grown up so much. Tichya sobat, amhala jamtil tevdhi jaeechi phule vechaychi ahet...:)

Can you tell I have typed out this comment sobbing like a mess!?

हेरंब said...

सुंदर.. फारच सुरेख!!!

Gouri said...

अगदी हेच ... हीच पोस्ट माझ्या ब्लॉगवर छापावीशी वाटातीये - तशीही तिकडे फार शांतता आहे सद्ध्या. ;)
इतक्या नेमक्या शब्दात मांडलं आहेस - शोभतेस जाहिरात क्षेत्रातली! :)

shriraj moré said...

kharay...ekhadya goshtichya mage dhavtana apan kay gamavtoy hyakade hi laksha asla pahije

अनघा said...सुंदर ग..... लेकीला दिवसागणिक फुलताना पहावे म्हणून मी ही अशीच घरी होते, ते क्षण दुसरी
कोणतीही किंमत देऊन मिळवता नाही येणार.
माझ्याच मनातले तू किती सुंदर शब्दात रेखलेस!

mau said...

खुप खुप सुंदर!!!

सौरभ said...

:)