नमस्कार

नमस्कार

Pages

Friday 21 June 2013

चिंधी...

"परवा स्कूटरवर मागे बसलेल्या एक बाई पडल्या आणि गेल्या."
"कशा पडल्या ?"
"रस्त्यात स्पीड ब्रेकर होता…त्याच्यावर रंग नव्हता मारला…त्यामुळे तो त्या बाईंच्या मुलाला, जो स्कूटर चालवत होता, त्याला कळला नाही…त्याने स्पीड कमी नाही केला…बाईंनी हेल्मेट नव्हतं घातलं…योगायोग जुळून आला…त्या उडाल्या…आणि खाली पडून गेल्या."
"काय यार…कसं पण येऊ शकतं ना मरण ? चिंधी एकदम !"

हल्ली काही सांगता येत नाही…
मरण 'चिंधी' येऊ शकेल…
मग आपण आपलं जगणं...
'भरजरी' विणलं तर ?

2 comments:

श्रिया (मोनिका रेगे) said...

अचानक येणारे मरण कोणी पहिले आहे हे खरे!… किती निर्धास्त जगणे चालू असते. समोर मृत्यू आला नाकारता तर येणारच नाही न. ती एकच अशी गोष्ट आहे जिच्यावर कोणाचाच डाव चालत नाही.' एक सत्य ',पण कोणाला त्याबद्दल रोजच्या धावपळीत अगदी सिरिअस्लि बोलायला आवडत नाही. आणि जोपर्यंत तो समोर येत नाही त्याचा विषय नको असतो.

अनघा तुझा हा लहानसा लेख आणि तुझे शेवटचे ह्या लेखातले वाक्य एकदम पटले ….आपण प्रत्येक क्षण किती मोलाचा आहे हे ठरवून जगू शकलो तर. आणि आजचा दिवस सोन्याचा बनवू शकलो तर! खरच क्षणभंगुर आयुष्याला एक एक दिवस सेलिब्रेट करून जगूया !

Anagha said...

मोनिका, मरण्यावर आपला कुठलाही ताबा नाही…पण जगण्यावर तर आहे ना ? मग मला प्रयत्न नक्कीच करायला हवा…आयुष्याचे दिवस कोणाच्या आयुष्यात आनंदाचे क्षण आणण्याचा.…त्यातून शेवटी मलाच आनंद मिळणार आहे…माझेच आयुष्य भरजरी होणार आहे.