नमस्कार

नमस्कार

Pages

Monday 14 January 2013

खारीचा वाटा

सतत काही ना काही घडत असतं. आणि त्यावर काहीही न करणे, त्यावर काही भाष्य न करणे, म्हणजे माझी विचार करण्याची शक्ती, मी स्वत:ला अमानवी औषधांचा नित्य डोस देऊन विचेतनावस्थेमध्ये ढकलली असा होतो.

मला रोजचे मरण मान्य नाही. मी एकदाच काय ते मरेन.

परवा एक छोटी मैत्रीण मला म्हणाली,"तुम्ही किती विचार करता !" ह्यावर देखील मी बसून विचार करते. पण मग मला कळेनासं होतं...आजूबाजूच्या परिस्थितीवर मी विचार करावयाचा नाही, त्यावर स्वत:ला जितके शक्य असेल तितके देखील करावयाचे नाही...मग नक्की मी काय करायचे तरी काय ? आणि 'इतका' विचार म्हणजे काय ? विचारशक्तीचे मापन कसे करावयाचे ? विचार करण्यावर बंधन घालणे म्हणजेच अर्धजीवित अवस्थेत स्वत:ला नेऊन सोडणे असे नव्हे काय ?

एकेक दिवस सरतो...समाजातील वेगवेगळ्या स्तरामधील माणसे भेटत जातात...त्यांच्याशी संवाद होतो...काही जण आपल्याला विचार करावयास भाग पाडतात...तर काही जण आपल्याला स्तिमित करतात.

समजा चार दिवस मी सकाळ संध्याकाळ शहरात टॅक्सीने प्रवास केला, तर मी एकूण आठ टॅक्सीचालकांना भेटले. मागे म्हटले तसे प्रत्येकवेळी मी चालकाला चार सुचना दिल्या. १...आपण उगाच भोंगा वाजवायचा नाही. २...आपण एकही सिग्नल तोडायचा नाही. ३...आपण झेब्रा पट्ट्यांवर गाडी उभी करावयाची नाही. ४...आपण खिडकीबाहेर थुंकावयाचे नाही. माझ्यासाठी हा मी करावयास घेतलेला प्रयोग होता. पहिल्या दिवशी मी जेव्हा टॅक्सीमध्ये बसले तेव्हा माझ्याकडून नकळत ह्या सुचना चालकाला दिल्या गेल्या होत्या. आणि जो काही परिणाम साधला गेला त्यातून मला माझ्या 'संवादा'तील शक्तीची जाणीव झाली. आणि मग हा प्रयोग मी चालू ठेवला आता मला माझी गाडी तंदुरुस्त होऊन परत मिळाली आहे. त्यामुळे एखाद्या नव्या चालकाशी संवाद साधण्याची माझी संधी हुकणार आहे. परंतु, ह्या गेल्या चार दिवसांत मला असा एकही चालक मिळाला नाही, १) ज्याने माझ्या सूचनांचे पालन केले नाही...२) वा त्याबद्दल तक्रार केली...३) वा माझे विचार पटत नाहीत म्हणून मला त्याच्या टॅक्सीमधून खाली उतरवले.
त्याउलट मला ऐकावयास मिळाले ते हे असे...
"मध्ये एकदा एक बाई माझ्या टॅक्सीमध्ये बसल्या. त्यांनी मला बसल्याबसल्या सांगितले....गाडी फास्ट चलाओ. मी म्हटले,"मॅडम सिग्नल जैसे होते हैं वैसे हम चलेंगे." पण त्या बाई मला म्हणाल्या, सिग्नलबिग्नल छोडो...जल्दी चलो. मग मी तीन/चार सिग्नल तोडले. आणि पुढे गेल्यावर मला पोलिसाने पकडले. मी पोलिसाला सांगितले, की माझ्या गिऱ्हाइकाने मला तसे सांगितले होते. तर पोलिसाने त्या बाईंना त्याबद्दल विचारले. आणि मग बाईंनी दंड भरला."
ह्यावर मी म्हटले," पर भाई मेरे, लायसन्स तो तेरा गया ना ? उस औरत का क्या बिगडा ?"
चालक म्हणाला," वो तो बात सही है...पर मैं आपको बता रहा हू के ऐसा होता हैं."
दुसऱ्या एका चालकाशी झालेला संवाद...
"ये बात तो एकदम सही कही आपने. ऐसा हि होगा....पर मैं एक बात सोचता हुं...इस शहर में मैं इतने सालों से टॅक्सी चला रहा हू...पर ऐसा मुझे कुछ बातानेवाली आप पहलेही हो. ऐसा क्यों ? कोई आज तक मुझे मेरी टॅक्सी नियम के अनुसार चलाने को बोला ही नही. जो भी आता हैं येही बोलता हैं ...भय्या, जल्दी चलो...लेट हुए हैं..."
"ऐसा हैं के जो विचार हम को बराबर लागते हैं वही विचार पकडके हमें चलना हैं...कोई गलत रास्ते पे जा रहा हैं या जाने के लिये हमें मजबूर कर रहा हैं तो चाॅइस आप के हाथ में है."
"हां...वो तो हैं...मैं तो टॅक्सी खडी करके बोल दे सकता हू...के भय्या ये हमसे नही होगा. नियम तो हम तोडेंगे नही....आप चाहिये तो दुसरी टॅक्सी पकड लिजिये."
"बिलकुल."
"आजकल क्या हो रहा हैं पता नही...पहले समझो मेरे बाजू में रहनेवाले का लडका किसी लडकी कि छेडछाड करते हुए मुझे दिखाई देता, तो मैं उसे एक चाटा मारता...क्योकि...जैसे मेरा बेटा है वैसे वो भी मेरा हि बेटा है....कुछ गलत काम कर रहा है तो मैं उसे रुका सकता था..पर अब ऐसा रहा नही...मैं ऐसा कुछ करने जाऊं तो खूनखराबा होगा...मेरे बाजूवाला मुझे पकडके मारपीट चालू कर देगा...वो सोचेगा नही...के ये जो बोल रहा है...मेरे बेटे को सिखा रहा है...वो सही है !...उस दिन क्या हुआ...मेरे बाजू में एक लड़का बाईक पे आके खडा रहा...मेरे पास सौ का छूटा माँग रहा था...जैसे ही मैंने छूटा निकाला उसने अपनी सौ की नोट मुह में पकड़ी थी...और मेरे हाथ से छूटा लेके एकदम बाईक से चल पडा...अब मैं क्या करता...बस...देखते रह गया...!"
"ये बाईकवाले तो मुझे मालूम हैं...नियम बिल्कुल नही मानते...कैसे भी बाईक चलाते हैं..." माझ्या ह्या विधानामागे मुंबईतील रस्त्यावर चालताना, व गाडी चालवताना आलेले अनुभव होते. मी स्वत: दुचाकी ह्याच रस्त्यांवर चालवली आहे...नियमांचा मान राखून.
"पर आज आपने बहोत सही बात कही...आज तक किसी नही कि थी...किसी को यहां टाईम नही....सोचने के लिये...और नियम तोडके ऐसे थाट करके चालते है जैसे हम नियम संभालनेवाले हि मूर्ख हो !"
"ऐसा हैं ना भय्या...समझो इनका गलत काम देखके हम भी गलत काम चालू करे...तो इसका मतलब तो ये हुआ ना...कि उनकी जीत हुई ?...और सही रास्ते पे चलनेवालों कि हार ?..मैं अब चार दिन से टॅक्सी कर रही हूँ..और हर एक ड्रायव्हर को मैंने वोही बोला जो आज आप को बोला...तो एक भी ड्रायव्हर ने तक्रार नही कि...उल्टा सब को मैं जो बोल रही थी...वो अच्छा और बराबर लगा ! तो क्या इसका मतलब ये हैं कि किसी को गलत काम करने में मजा नही आता...पर किसी को बदलाव लाना नही है...किसी को विश्वास नही है...के बदलाव उसे खुद से और खुद में लाना है...और वो खुद भी बदलाव ला सकता हैं...क्या आत्मविश्वास कि कमी है ?"
"बात तो सही है"
माझं घर आलं आणि माझा चार दिवसांचा टॅक्सी प्रवास संपला.

मी आठ चालकांशी संवाद साधला. प्रत्येकाला माझे विचार पटले. मी खाली उतरल्यावर देखील त्यांनी नियमांचा मान राखला तरच माझ्या बोलण्याला काही अर्थ आहे असे मी मानत नाही. कारण...गाडी शिकत असतानाच आपण हे नियम शिकतो. त्यामुळे खरं तर ते पाळायचे की नाही असा पर्याय असूच शकत नाही. किंवा, कोणाच्या सांगण्यावरून मी नियम तोडतो/तोडते असं कसं काय असू शकतं हेही माझ्या मनात येतंच. परंतु, जर कोणाच्या सांगण्यावरून गैर कृत्य होत असेल, तर कोणाच्या सांगण्यावरून चांगले काम का होऊ नये ?

आणि त्याहीपुढे जाऊन असं वाटतं, की आपण आपला प्रयत्न करत रहावे...कारण जर 'आपले कोणी ऐकत नाही...किंवा...त्यातून काहीही निष्पन्न होत नाही'...असा विचार करून आपण प्रयत्न करावयाचे थांबवले तर गैर व्यवहार वाढत आहेत म्हणून तक्रार करण्याचा आपला अधिकार आपण गमावून बसतो...
कारण हक्काची दुसरी बाजू ही शेवटी कर्तव्याची असते.

...आणि शेवटी, 'बदल घडवून आणण्यासाठी आपल्याला शक्य असलेले प्रयत्न देखील आपण केले नाहीत' ही भावना घेऊन मरावे लागू नये...नाही का?

10 comments:

vishal said...

खर आहे ....गांधीजीच्या उक्तीप्रमाणे "you should be the change , you want to see in the world" , thanks.

Sakhi said...

Indeed... :)

Yogesh said...

अनघा ताई...पुर्णतः सहमत...असा जर प्रत्येकाने विचार केला तर परिस्थिती बदलायला वेळ नाही लागणार.

Shriraj said...

Tu aamchyasathi prerna srot ahes, Anagha

A Spectator said...

व्यावसायिक समाधान म्हणजे काय? मला असं वाटतं की व्यावसायिक नफ्याच्या किंवा पगाराच्या वरच्या श्रेणी ना हा समाधानाचा मुद्दा लागू होतो. फेरीवाले मुळात फारसा नफा कमावू शकत नाहीत. हफ्ते, स्पर्धा हे सर्व सांभाळून ते गुजारा करतात. त्यात जे जुने फेरीवाले आहेत त्यांचा मुद्दा वेगळा ठरतो कारण त्यांनी मोक्याच्या जागी पाहिले यायचा फायदा पटकावला आहे. पण वस्तूंच्या किमती घटवाय चा आणि कमी उत्पन्न गटातील लोकांना ह्या वस्तू उपलब्ध करून द्यायचे काम फेरीवाले करतात. आपल्या प्रशासन यंत्रणेत अधिकृत दुकानाची परवानगी हे वेळखाऊ काम आहे. जागांची भाडी जास्त आहेत आणि फेरीवाल्यांना कर्जेही मिळणार नाहीत. मग त्यांनी काय करावं? एखाद्या रस्त्यावर फेरीवाले बसून त्या रस्त्याची कुचंबणा होते हा मुद्दा जितका खरं तितका त्या आधीचा मुद्दा आहा आहे की ते अशा रस्त्यांवर बसतात जिथे मुळात लोक खूप ये-जा करतात आणि तिथे ते खरेदी करू शकतील. मग एवढे लोक का आले मुंबईत? पैसा कमवयालाच ना, का जगण्याच्या समाधानासाठी वगैरे? अधिकृत-अनधिकृत या फार ढोबळ रेषा आहेत. मुंबईत फार माणसे आहेत आणि त्यांच्या जगण्याच्या आशा-आकांक्षा एकमेकांना चिरडत चालल्या आहेत असं वाटतं मला.

Anagha said...

विशाल, जिथे जिथे शक्य होईल तिथे प्रत्येकाला प्रयत्न करायला हवेत. धन्यवाद रे.

Anagha said...

भक्ती.... :)

Anagha said...

योगेश, प्रयत्न तर करूयात. नाहीतर शेवटी आपल्याच पोराबाळांसाठी भयानक समाज सोडून जाणार आहोत आपण.

Anagha said...

श्रीराज, मला समोर काही चुकीचं घडत असताना गप्प बसवत नाही ना...त्यामुळे चाललेली धडपड आहे ही. बाबांकडून घेतलाय मी बहुधा हा गुण ! :) :)

Anagha said...

Encounters with Reality...

मला वाटतं ह्यानंतरच्या पोस्टवरची...'ताई, माई, अक्का..' ही तुमची प्रतिक्रिया आहे आणि ती इथे आली आहे. काही हरकत नाही...

फेरीवाले नक्की किती नफा मिळवतात माहित नाही आणि तो कमीच असणार ह्याची मला खात्री आहे. मात्र मला इथे फेरीवाल्यांचे भले करावयाचे नाही. मला कोणाचे भले करायचे झालेच तर मी जे चांगली कामे करतात त्यांच्याबरोबर काम करून तिथे श्रमदान व आर्थिक दान करेन. परंतु, केवळ मला वस्तू स्वस्त मिळते व फार कष्ट करायला लागत नाहीत म्हणून रस्त्यावर कुठेही बसलेल्या फेरीवाल्याकडून मी कधीही खरेदी करणार नाही. कारण त्यातून फक्त क्षणाचे समाधान आहे...व समाजाचे मोठ्या प्रमाणात नुकसान आहे. आपण त्यांना दिलेल्या प्रोत्साहानातूनच इथली त्यांची संख्या प्रत्येक दिवशी शेकड्याने वाढते आहे.
त्यांनी मग काय करावे असे तुम्ही विचारले आहे. आज येथील नागरिकांच्या घातक सवयीमुळे सुरक्षितेला धोका निर्माण झालेला आहे. आता ह्या शहराची कोणालाही सामावून घेण्याची क्षमता संपलेली आहे. जर आपण वर्तमानपत्र वाचले तर आपल्याला दिसून येते की महाराष्ट्राची शैक्षणिक, आर्थिक अशा बाबींमध्ये घसरण झालेली आहे. लोकसंख्या अफाट, आणि प्रगतीची घसरण हे विचित्र समीकरण समोर येते आहे. ह्याचा अर्थ जर बाकीचे जिल्हे प्रगती करीत आहेत तर तेथे उदरभरणासाठीचे बरेच उद्योगधंदे त्यांच्यासाठी उपलब्ध असायलाच हवे. आता ह्यावर पुन्हा आपण आपले बोट आपल्या नादान पुढाऱ्याकडे फिरवू. दुसऱ्याला दोष देण्याची व कामे ही समोरच्यानेच करावीत अशी आपली मानसिक धारणा झालेली आहे. परंतु, आता मुंबईचे रूप फसवे बनले आहे. आपण स्वत: निदान जाणते अजाणतेपणे, शहराच्या व समाजाच्या धोक्याची कोणतीही कृती करू नये एव्हढे मला म्हणायचे आहे.

तुमचे शेवटचे वाक्य बरोबर आहे. परंतु, प्रत्येकाने आपल्या कृतीचा निदान थोडा तरी विचार केला तरी समाजाचे व त्याचबरोबर येथील प्रत्येक नागरिकाचे हित साधले जाईल असे मला वाटते.