नमस्कार

नमस्कार

Pages

Saturday, 26 May 2012

पिंपळपान

हात हळूहळू रिकामे होत चालले आहेत...
जाणवते...
कळते...
दोन हातात...दोन हात धरले होते...निदान तसा भास तरी झाला होता. पारा पकडल्याचा.
त्या प्रवासात हलकेच हातात दोन चिमुकले हात आले...
दोनाचे सहा हात झाले होते.
आज मात्र बघितले तर हात रिकामेच.
सगळेच भास.
हातात हात होते त्यावेळी दिसत नव्हत्या...जाणवल्या नव्हत्या...
रिकाम्या हातावरच्या रेघा आजच्या घडीला मात्र खोल खोल दिसू लागल्या.
रेघांचे जंजाळ.
जसे सुकलेले पिंपळाचे पान.
त्यावर रंग भरावे, चित्र काढावे...
इतके देखील त्राण नाही उरले.
माझे रिकामे हात.
जसे शुष्क पिंपळ पान.
त्यावर कधीतरी पावसाचे थेंब पडावे...
ओल्या ओझ्याखाली क्षीण पानाने दबून जावे.
मातीत झिरपून जावे.

14 comments:

Raindrop said...

:( ka ga?

Harshal Bhave said...

सुंदर लिखाण !
अलगद आणि हळुवार, तरी अंताची चाहूल देऊन जाणार

श्रद्धा said...

अनघा ताई,
लेक कुठे दुसऱ्या गावी जातेय का? की तिला तिचं विश्व सापडलंय?
बाकी कवितेचा मूड मस्तच.
काळजी घ्या.

aativas said...

हाही एक प्रवास असतो पिंपळपानाचा. त्याचा आनंद घ्या :-)

Pankaj - भटकंती Unlimited said...

पण पिंपळपानही आपण पुस्तकाच्या पानांमध्ये जपून ठेवतो किनई... ? मग हसायचं आता.

श्रीराज said...

ह्या ओळी वाचून माझ्या अवती-भवतीचे वातावरण एकदम कुंद झाल्यासारखे वाटते आहे :(

अनघा said...

वंदू, :)

अनघा said...

हर्षल, आभार.

अनघा said...

श्रद्धा, ते तर होणारच आहे....हो ना ? आणि व्हायलाच हवं...नाही का ? :)

अनघा said...

सविता, :)

अनघा said...

पंकज ! :) :) :)

अनघा said...

श्रीराज, माफी ! :( :)

सौरभ said...

:)

अनघा said...

:)