नमस्कार

नमस्कार

Pages

Tuesday, 15 May 2012

बाबा...आणि बाबांची पुस्तके

गेल्या वर्षाच्या प्रारंभी बाबांचे एक पुस्तक प्रकाशित झाले होते. पद्मगंधा प्रकाशनातर्फे. त्यावेळी 'प्रहार'मध्ये श्री. राम जगताप ह्यांनी पुस्तकावरील परीक्षण लिहिले होते. आज हेरंबने त्यांचा ब्लॉग नजरेस आणून दिला. तिथे त्यांनी तो लेख प्रसिद्ध केला आहे.

ह्या वर्षी बाबांचे हिंदू धर्मावरील पुस्तक प्रकाशित झाले आहे. अगदी तीन दिवसांपूर्वीच. माझ्या हातात प्रत आली की तुम्हां सर्वांना दाखवेनच.

श्री. जगतापांच्या लेखात माझा उल्लेख आहे. तो अजाणतेपोटी झाला आहे असे म्हणता येईल. खरं तर बाबांची पुस्तके छापून आणण्यामागे माझ्या आईची श्रद्धा आणि प्रेम आहे. मी फक्त 'ह्यांना फोन कर, त्यांच्याशी बोल...' हे काम करते ! आणि हो ! मात्र एकदा लेकीच्या परीक्षेसाठी सुट्टी घेतली होती. त्या कालावधीत बाबांच्या लिखाणाचे विषयावार वर्गीकरण मी केले होते. आणि त्यामुळे प्रकाशकाकडे ते लिखाण सुपूर्त करणे थोडे सोपे झाले असे म्हणता येईल. इतकेच काय ते मी केले.
बाकी दिव्याखाली अंधारच आहे. :)

आणि हो ! हेरंबा, तुझे आभार. :)

8 comments:

हेरंब said...

खूप सुंदर परीक्षण केलंय त्यांनी. खूप छान लिहिलंय पुस्तकाबद्दल.. पहिला परिच्छेदच किती बोलका आहे !

>>मराठीमध्ये दरवर्षी तीन हजार पुस्तकं प्रकाशित होतात. त्यातली जवळपास सत्ताविसशे पुस्तकं वाचायची तर सोडाच पण हातात घ्यायच्याही दर्जाची नसतात. उरलेल्या तीनशेंपैकी काही फक्त चाळण्यासाठी, काही नुसतीच पाहण्यासाठी, काही एकदा वाचून टाकून देण्यासाठी तर अगदीच थोडी पुन्हा पुन्हा वाचण्यासाठी असतात. हे विधान कुणाला थोडंसं अतिशयोक्तीपूर्ण वाटलं तरी दुर्दैवानं ते सत्य आहे! अलीकडेच प्रकाशित झालेलं ‘नवी क्षितिजे’कार विश्वास पाटील यांचं ‘कार्ल मार्क्‍स- व्यक्ती आणि विचार’ हे पुस्तक मात्र पुन्हा पुन्हा वाचावं असं आहे. कार्ल मार्क्‍सचं इतकं गंभीर स्वरूपाचं चरित्र मराठीमध्ये याआधी लिहिलं गेल्याचं ऐकिवात, वाचनात आणि पाहण्यातही नाही.

मला लवकरात लवकर तुझ्या बाबांची पुस्तकं वाचायची आहेत.

>> आणि हो ! हेरंबा, तुझे आभार. :)

हे म्हणजे कोकणातल्या आजीने पाठवलेला खाऊ घेऊन आल्याबद्दल पोस्टमनचे आभार मानण्यासारखं झालं !

श्रद्धा said...

Anagha Tai,
Simply great.

श्रीराज said...

अनघा, पुस्तक पहिल्यांदा वाचले तेव्हा माझ्या मनात आले की हे सर्व समजायला मी अजून खूप लहान आहे... प्रामाणिकपणे सांगायचे तर काही संज्ञा, काही विचार मला कळलेच नाहीत. मी पुन्हा ते वाचणार आहे :)

Raindrop said...

I hope there is an english translation of this book too

अनघा said...

हेरंबा, 'हे म्हणजे कोकणातल्या आजीने पाठवलेला खाऊ घेऊन आल्याबद्दल पोस्टमनचे आभार मानण्यासारखं झालं !' :D :D खरंय. :)

अनघा said...

श्रद्धा, आभार गं. :)

अनघा said...

श्रीराज, :)

अनघा said...

वंदू, माझ्या लेकीसारखंच बोललीस...! :)