नमस्कार

नमस्कार

Pages

Thursday, 22 March 2012

खांदेरी-उंदेरी

आपण सगळे गेल्या रविवारी खांदेरी-उंदेरी जलदुर्ग बघायला गेलो.
आपापल्या ब्लॉगवर सगळ्यांनी फोटो टाकले.  
सुंदर लेख लिहिले.
मग आता मी काय वेगळं लिहू ?

तुम्हां सगळ्यांमुळे असं काही नवंनवं मला बघायला मिळतं.
नाहीतर मी 'तिकोना'ला जाणे कठीण... 
कासच्या पठारावरील इंद्रधनुषी फुलांपर्यंत मी पोचणं महाकठीण... 
आणि खांदेरी-उंदेरी जलदुर्ग केवळ अशक्य !

माणसं आपापल्या वाटची सापशिडी खेळत असतात.
निसर्ग आपल्या जागी ऊनपावसाळे झेलत असतो.
जसा निसर्ग धडे देतो...तशीच माणसे देखील शिकवत असतात.
आयुष्याचे धडे, प्रत्यक्ष जगून पाठ झाले तरीही, संपत नाहीत हे मात्र खरे.
आणि पुढचं पाठ मागचं सपाट...ह्या नियमानुसार आयुष्य नित्य नव्या दमाने पुढे सरकतच रहातं.
तो समुद्र, ते काळे पाषाण.
तिथे फिरताना, जाणवणारी त्यावेळच्या आयुष्याची कठीणता.
पायात चांगले शूज घालून देखील धडपडणारे आम्हीं...मग त्यावेळी हातात भाले तलवारी घेऊन वेगाने त्या दगडावर चढणारे सैनिक, ही करामत कसे करीत असत हे त्यांचे त्यांनाच माहित.
ते त्यांचे त्या काळातील खडतर आयुष्य. आज सीमेवर आमच्या सुरक्षिततेसाठी खडतर आयुष्य जगणारे आमचे सैनिक.
आणि आम्हीं....साधा रोजच्या आयुष्यातील एक कुठला नियम पाळताना आमची मारामार.
एखाद्या ऐतिहासिक वा नयनरम्य ठिकाणी देखील दारुच्या बाटल्या, प्लास्टिकच्या प्लेट्स, सिगारेटची थोटकं, कागदाचे बोळे....टाकताना आम्हांला ना लाजा वाटत...ना आमचे हात कचरत !
कसले आम्हीं स्वाभिमानी, आणि कसली आमची देशभक्ती ?! आमच्या रक्तारक्तात अस्वच्छता मुरली आहे. अस्वच्छतेतेच आम्हीं पुजारी आहोत...आम्हीं गलिच्छ आहोत...आणि आम्हीं कुठल्याही देवाला कचऱ्याने माखायला कचरत नाही. मग तो सिद्धिविनायक असो...वा महालक्ष्मी असो वा असो एखादा वेताळदेव.
हेच सत्य आहे !

आमचा देव सर्वत्र वसतो.
आम्हीं सर्वत्र कचरा करतो.
आमचा देव कचऱ्यात वसतो.
अ = ब.
ब = क.
अ = क....ह्या धर्तीवर.
देव अदृश्य. कचरा सदृश्य.
फक्त म्हणून तो कचऱ्यात बुडून गेलेला, आपल्या आंधळ्या डोळ्यांना दिसत नाही इतकंच !

असो...
...खास सगळे मिळून काही ठरवलं...की आयुष्यातील एखादा दिवस हसतखेळत, सहजगत्या सरून जातो.
मग मंडळी आता पुन्हां कधी ?
:)
ग्रुप फोटो आकाशच्या सौजन्याने ! :)

18 comments:

सौरभ said...

wahh... bharich maja kelit ki tumhi... kon kon gela hotat??? :P

Pankaj - भटकंती Unlimited said...

पुन्हा लवकरच.

Raindrop said...

so nice to see all of you venturing out together...it is always so much fun when like minded people get together.

....itki bhatkat astes sagli kade ekda dilli la ye atta...just for a weekend pan ye....

अपर्णा said...

पुढच्या वेळी आपण सर्व तिथे खास तिथला कचरा गोळा करायला जाऊया....(सिरीयसली पुर्वी एका ग्रुपबरोबर हे उद्योग आपल्या बोरीवलीच्या नॅशनल पार्कात केलेत ते आठवलं म्हणून लिहिलं झाल......) आणि अगं व्यक्ती तितक्या प्रकृती सगळ्यांनाच कचरा कुठे टाकायचा हे कळायला काळ लोटणार आहे..तुमची ट्रीप चांगली झाली ना??

आनंद पत्रे said...

भटकंतीचा वेगळा रिपोर्ट आवडला...

सुहास said...

बघ तर सौरभ सांगत पण नाही ही, एकटीच भटकंती करतेय. अनघा, पुढल्यावेळी नक्की सांग हं? ;-)

बाकी पोस्टबद्दल म्हणशील तर लोकं तितक्या प्रवृत्ती. दीपक, मी आणि आकाश ने एका पोरीला हटकलं होतं खांदेरीवर. रंगीबेरंगी खडू घेऊन येतात साले. घराच्या भिंतींवर लिहा की असं, घरात फेका की कचरा...अपर्णा म्हणतेय तसं एकदा खास कचरा गोळा करायला जायला हवं इथे.

अनघा said...

सौरभा, एक नावांची यादी टाकणार होते हो ! पण ती आपल्या सेनापतींकडे होती ! माझ्याकडे नव्हती ! ;) :)

अनघा said...

पंकज, पुढल्यावेळी काही कारण सांगितलंस तर बघ ! :)

अनघा said...

:p हो ग वंदू ! दिल्ली उगाच राहून जातेय ! :( :(

अनघा said...

अपर्णा, आम्हीं पण एकदा आमच्या घरामागल्या समुद्रावर केला होता हा कार्यक्रम. कधी अकला येणार आपल्या लोकांना कोण जाणे ! मी कुठेतरी एक रिसर्च वाचला होता...सर्वात वाईट पर्यटक भारतीय आहेत ! :(

हो गं...आमची सहल मात्र खूप छान झाली ! आता तू कधी येतेस बोल ! लगेच ठरवून टाकू कधी आणि कुठे ते जायचं ते ! :) :)

अनघा said...

धन्यवाद रे आनंद. :)

अनघा said...

मी ना सुहास, सकाळी आकाशला फोन लावत होते...तो आपला ग्रुप फोटू टाकू का इथे म्हणून...पण लागलाच नाही फोन ! :(

ह्या प्रवृत्ती हाताबाहेर गेलेल्या आहेत ! आणि असं काहीही नाही की अशिक्षित लोक कचरा करतात ! एकजात सगळे एका माळेचे मणी आहेत ! त्या तिथे गावात...देखील कुठे स्वच्छता होती ? म्हणजे शहरातले आले की घाण करतातच आणि हे देखील आपलं गाव स्वच्छ ठेवायला काडीची मेहेनत घेत नाहीत !

हेरंब said...

Misseed it one more time :(

BinaryBandya™ said...

mastch...

अनघा said...

हो ना हेरंबा ! आम्ही पण तुम्हां सगळ्यांना मिस करत असतो नेहेमी ! :(

अनघा said...

धन्यवाद बंड्या. :)

रोहन चौधरी ... said...

मस्त.... मी अजून फोटो टाकणे बाकी आहे.. :(

आता पुढची मोहीम तुम्ही बनवा ... सेनापती फक्त सामील होतील.. ;)

अनघा said...

सेनापती, फोटोंची किती वाट पहायला लावणार आहात ???

आणि आम्ही असे आमचे सेनापती बदलत नाही ! तेंव्हा मोहीम तुम्हींच ठरवायची आणि आम्ही फक्त दाखल व्हायचं ! :) :)