नमस्कार

नमस्कार

Pages

Sunday 18 December 2011

म्हाडा आणि मी...भाग १०

भाग १
भाग २
भाग ३
भाग ४
भाग ५
भाग ६
भाग ७
भाग ८
भाग ९

३० नोव्हेंबर
आम्हीं कोर्टात पोचलो तेव्हा दुपारचे अडीच वाजले होते. का कोण जाणे पण कोर्टाचे दालन आज गच्च भरले होते. आम्हीं थोडा वेळ आमचे वकील नारायण ह्यांसाठी बाहेर थांबलो. आज नारायण नाही येऊ शकले. त्यांची मदतनीस मनीषा हजर होती. तेवीस चोवीस वर्षाची मनीषा. चुणचुणीत. बाहेर बिल्डरचे वकील, वर्मा, घोटाळत होते. मी विसरलेले नाही. मी काहीही विसरलेले नाही. कोर्ट रूम आजही तीच होती. तशीच भरलेली होती. 'भाडेकरू आणि म्हाडा किंवा बिल्डरच्या केसेसमध्ये कायम भाडेकरू हरतो...व नुकसानभरपाई म्हणून भाडेकरूला उलटे पैसे भरायला लागतात...people are misleading you...lawyers do that...just to earn money...' वर्मा मला त्या दिवशी सांगत होते...ह्याच आदरणीय कोर्टाच्या दालनात बसून हेच वर्मा मला मित्र म्हणून आपुलकीचा सल्ला देऊ करत होते...आज काय परिस्थिती होती...? जेष्ठ नागरिकाच्या सोयीची जागा देणे कायद्याने बिल्डरला भाग पाडले होते...नुकासानभरपाई मला भरायला लावली नव्हती...आणि कोर्टाने म्हाडाच्या अधिकाऱ्यांना कोर्टात येणे भाग पाडले होते...कोण जिंकले होते....? बेजुमान शक्ती की सामान्य भारतीय नागरिक ? वर्मा समोर येताच एका क्षणात माझ्या मनात हे सर्व झळकून गेले. माझी मान ताठ होती...वर्मांनी नजर चुकवली...मान खाली घातली...व दालनात शिरले...त्यांनी माझ्या नजरेला नजर नाही दिली....आणि मला त्यांचे त्या क्षणाचे विचार स्पष्ट वाचता आले....वर्मा हरले होते...आज अरेरावी हरली होती.
मनीषाबाई येताच तिघेही आत शिरलो. मी तेव्हढ्या वेळात दाराबाहेरून आत बघितले होते. पुढील खुर्च्यांवर राठोड व तिवारी बसलेले दिसत होते. राठोड काही कागदपत्र चाळत होते. (मला खरं विचाराल तर हे आदरार्थी संबोधन मला कठीण जातंय....म्हणजे खोटेपणा वाटतो...जे खरे तर माझे क्षेत्र नव्हे...पण इलाज नाही.) त्यांच्या हातात कागदांची थप्पीच होती. त्यांना काही सापडले ते त्यांनी शेजारीच बसलेल्या तिवारींना दाखवले. मी विचारात पडते...आता काय बरं ह्यांनी अभ्यासाला घेतलंय ? फलटणकर व मनीषाबाई सरळ आत शिरतात व खुर्च्यांवर स्थानापन्न होतात. मी तिथेच तिसऱ्या खुर्चीवर बसते.
"आलेत आज...ते...तिवारी आणि राठोड...तिथे पुढे बसलेत...." मी फलटणकरांना हळूच म्हणते.
फलटणकर फक्त मान डोलावतात. आता काय होणार...मी मलाच मनातल्या मनात विचारते. पर्समध्ये बाबांचा फोटो असतो...तो आपोआप माझ्या हातात येऊन बसतो. न्यायाधीश आमच्याकडे नजर टाकतात. मनीषाबाई पुढे होतात. न्यायाधीश म्हाडाच्या वकिलीण बाईंना विचारतात. "सगळे पक्षकार हजर आहेत का ?"
"आलेत...हे काय...म्हाडाचे अधिकारी आलेत...आणि बिल्डरचे वकील देखील आहेत..." वकिलीणबाई हात पुढे करत म्हणतात. राठोड व तिवारी पुढे येतात. वकिलीण बाई मागे वळून बघतात...आजूबाजूला बघतात...मी देखील दालनात नजर फिरवते...वर्मा दालनाच्या कुठल्याही कोपऱ्यात दिसून येत नाहीत. बिल्डरचे उद्दाम वकील वर्मा आज गायब आहेत. आत्ता तर होते...पण आत्ता गायब आहेत.

"या...पुढे या....उभे रहा तिथे चौकटीत." न्यायाधीश आज्ञा देतात. आज्ञेचे पालन होते.
"काय नावं काय तुमची ?" न्यायाधीश विचारतात.
राठोड पुढे होतात..."मी राठोड."
"तिवारी..." तिवारी चौकटीत शिरतात.
न्यायाधीश उजवा हात पुढे करतात व राठोडांना विचारतात..."काय तोंडात काय आहे तुमच्या ? काय भरलंय तोंडात ? हे असलं भरलेलं तोंड घेऊन कोर्टात काय खाताय तुम्हीं ? जा....रिकामं करा ते तोंड आधी !" न्यायाधीशांचा सूर रागीट वाटला.
"काय नाही साहेब ! काही नाही तोंडात !" भ्यायलेले राठोड आ वासतात व रिकामा जबडा कोर्टाला दाखवतात.
पुढील खुर्च्यांवर नेहेमीच काळे कोट घालून बरेच वकील बसलेले असतात. आज तशी गर्दीच होती...माझे लक्ष होते...यातील एका वकिलाच्या तोंडावर हसू फुटले होते.
राठोड ततपप...
"मग ? माफी मागा कोर्टाची...जे काही केलंत त्या दिवशी त्याबद्दल आज कोर्टात माफी मागा..."
"पण साहेब...आम्हीं आधीच लेखी दिलेलं आहे...आम्हीं कोर्टाचा अवमान केलेला नाही..." तिवारी.
"तुम्हांला कोर्टाची माफी मागायची आहे काय ? तुमच्या हातून जे काही घडले त्याबद्दल ...? नसेल तर मी निकाल सांगायला सुरवात करतो !!" न्यायाधीश.
"तसे नाही साहेब...मी..आम्हीं...म्हणजे....आम्हांला मान्य आहे !! " तिवारी बोलतात. राठोड मान डोलावतात. एक क्षण शांतता.
"तोंडाने बोला....माफी तोंडाने मागा...बोला..." न्यायाधीश आज्ञा देतात. आत्तापर्यंत फलटणकर व मनीषाबाई जागेवरून उठून पार पुढे गेलेले आहेत. मी त्यांच्या थोडी मागे उभी आहे.
"आम्हीं माफी मागतो साहेब....आमच्याकडून चूक झाली असेल तर..."
"असेल तर म्हणजे...कोर्टाची observations आहेत...ती लक्षात घ्या...."
"हो हो साहेब...आम्हीं माफी मागतो."
आता न्यायाधीश मनीषाबाईं व फलटणकरांकडे बघतात...
"साहेब, हे अधिकारी, पुन्हां बाहेर जाऊन सामान्य नागरिकांना असाच त्रास देणार असतील तर काय उपयोग ?" मनीषाबाई म्हणतात...
"हे असले वागणे पुन्हां होता कामा नये...ही ताकीद आहे तुम्हांला..." न्यायाधीश म्हणतात... मनीषाबाईंना विचारतात..."तुम्हांला ही माफी मान्य असेल तर मग तुम्हीं 'कोर्टाचा अवमान' हा जो अर्ज दाखल केला आहे तो मागे घेऊ शकाल." मनीषाबाई फलटणकरांकडे बघतात. मीही त्यांच्याकडे बघते. फलटणकर विचारांत गढलेले दिसतात. "काय करायचं ?...माफी मान्य करायची का ?" मनीषाबाई.
"ठीक...कर मान्य...मान्य आहे साहेब आम्हांला...." फलटणकर न्यायाधीशांना सांगतात.
"ठीक..." न्यायाधीश बाजूलाच बसलेल्या टंकलेखिकेला निकाल सांगू लागतात...एकाग्रचित्ताने फलटणकर ऐकू लागतात. मीही कान टवकारते...मला देखील थोडेफार कळते.

"श्री.तिवारी व श्री.राठोड यांनी झालेल्या घटनांबद्दल बिनशर्त माफी मागितली. ती तक्रारदाराच्या वकिलांनी स्वीकारली असल्याने, संबधित 'नोटीस ऑफ मोशन' तक्रारदाराने मागे घेतली आहे. तसेच आता मूळ दाव्यातील वाद विषय संपुष्टात आला असल्याने हा दावा काढून घेण्याबाबत योग्य तो अर्ज तक्रारदाराने पुढील तारखेस दाखल करावा."

थोड्याच वेळात आम्हीं बाहेर पडतो.
"नक्की काय झालं ?" मी विचारते. मला उगाच विक्रम वेताळाच्या गोष्टींची आठवण येते...कोर्टाबाहेर पडल्यापडल्या प्रश्र्न सुरू.
"आज आपण म्हाडाच्या माफीनाम्याला मान्यता दिली...व त्यामुळे 'कोर्टाची त्यांनी अवज्ञा केली'...असा गुन्हा त्यांच्या नावे दाखल झाला नाही."
"म्हणजे कायद्याचा मान राखून, आपण म्हाडाच्या अधिकाऱ्यांवर दया दाखवली...असाच ह्याचा अर्थ होतो ना ? आज म्हाडाच्या अधिकाऱ्यांना, कोर्ट त्यांची पायरी दाखवत होतं...न्यायाधीशांचे बोलणे...त्यांच्या आवाजाचा टोन...सगळं तसंच होतं...घाबरून कसं सताड तोंड उघडलं त्या राठोडने..." मला हसायला येतं.
"असं तू म्हणू शकतेस..."
फलटणकर काही माझ्याबरोबर हसत नाहीत....ते कुठल्यातरी विचारात गढल्यासारखे मला वाटतात...माझ्या मनात बरेच प्रश्र्न उभे राहिलेले असतात...
"पण आपण माफी का मान्य केली ते सांगा ना ? असं काय म्हणून आपण त्यांना फक्त माफीवर सोडायचं ?"
"एक लक्षात घे, या सगळ्या प्रकारात कोर्टाच्या हे लक्षात आलेले जाणवत होते की या अधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिकाराचा जास्त वापर, जास्त घाईने केला. कायद्याचे काही प्रमाणात उल्लंघनही केले होते व थोडेफार दुर्लक्ष पण केले. परंतु, तांत्रिकदृष्ट्या कोर्टाने म्हाडाला दिलेल्या आदेशाचे...काय होता कोर्टाने म्हाडाला दिलेला आदेश ?...योग्य कायदेशीर प्रक्रियेशिवाय तक्रारदारास जागेतून काढून टाकू नये...बरोबर ? म्हाडाचे अधिकारी जे वागले त्यात स्पष्ट उल्लंघन नसल्याने, त्यात कोर्टाचा हेतुतः अवमान केला गेला असण्याची शक्यता क्षीण आहे. व त्यामुळे `कंटेम्ट नोटीस ऑफ मोशन' डिसमिस होऊ शकत होती. परंतु, तक्रारदारावर बळजबरी तर झालेली आहे. म्हाडा अधिकाऱ्यांना त्याची स्पष्ट जाणीव करून देण्याच्या उद्देशानेच कोर्टाने त्यांना प्रत्यक्ष हजर राहण्यास फर्मावले व त्यांना त्यांच्या लेखी जबाबाप्रमाणे, भर कोर्टात स्वत:च्या तोंडाने प्रत्यक्ष माफी मागण्यास सांगितले. आणि कोर्टाने सर्वांसमक्ष त्या अधिकाऱ्यांना हे करावयास भाग पाडल्याने, आपण मा. कोर्टाचा कल लक्षात घेणे, त्या अधिकाऱ्यांनी मागितलेली माफी मान्य करणे हे आपल्या सुसंस्कृतपणाचे व आपल्याच कायद्यावर सर्वसामान्य नागरिकांच्या असलेल्या नितांत विश्वासाचे व भरवश्याचे द्योतक आहे....पटतंय का तुला हे....?"
"हो...म्हणजे त्या दोघांची जी काही तोंड झाली होती ना आज ती आठवून हे मला नक्की पटतंय...कारण त्या दिवशी तुम्हीं फक्त ऐकली त्यांची अरेरावी...त्यांची भाषा...मी प्रत्यक्ष अनुभवलीय...त्यामुळे त्या विरोधात आज जे त्यांचे हसे झाले...ते बघून मला फार आनंद झाला ! म्हणजे म्हाडाच्या अधिकाऱ्यांपेक्षा आमचा कायदा हा श्रेष्ठ आहे...आणि कायदा हा आमचा व आमच्यासाठी आहे हे पटले....! ते वर्मा तर गायबच झाले ! आले होते ते खरं तर...बघितलं होतं का तुम्हीं ?....पण ज्या वेळी हे अधिकारी तिथे त्या साक्षीदाराच्या चौकटीत ततपप करत उभे होते ना...त्यावेळी वर्मा गायब होते ! म्हणजे बाबांच्या पद्धतीत, अगदी कायद्याच्या मदतीने आपण हे सगळं केलं ! हे त्यांच्या वर्क रेकॉर्डवर येईल का ? आलं तर अधिकच छान होईल ! "
"आज जे झालं त्याची मिनिट्स ऑफ दि मिटींग्स सारखी एक कॉपी आपल्याला मिळेल...."
"कधी ?"
"मिळेल....चार पाच दिवसांत..."
"त्याचं काय ?"
"त्याचं काही नाही....सांगतोय की आजच्या निकालाची एक कॉपी मिळेल आपल्याला."
"त्यात काय असेल...? आज जे झालं ते आपल्यासाठी चांगलंच झालं ना ? म्हणजे आपण जिंकलोय ना ?" मला हेही विचारावंच लागतं....खात्री करून घेण्यासाठी...काहीही गृहीत धरण्याची आता माझी ताकदच उरलेली नसते.
मी वेताळच आहे...माझे प्रश्र्न नेहेमी तयारच असतात....
आणि विक्रमाची उत्तरे देखील तयार असावीत...नेहेमी सारखीच...
"अगं, हो...जिंकलोय आपण...बाकी वैयक्तिक नफा-नुकसानीचा हिशोब...योग्य वेळ येताच मांडून वसूल करूच आपण !!"
आर्य चाणक्य बोलले ! आणि मला हसू आलं !
....................................................................................................................................................................

आज आमच्या हातात कोर्टाचा रोजनामा आला...त्यातील मजकूर असा...श्री. अनिल राठोड व श्री. राकेश तिवारी हे म्हाडाचे अधिकारी कोर्टात हजर आहेत. त्यांनी कोर्टासमोर बिनशर्त माफी मागितली. यावर तक्रारदाराच्या वकिलांनी 'कंटेम्ट नोटीस ऑफ मोशन' आता पुढे चालू ठेवण्याचे नाही असे सांगितले, ते कोर्टाने मान्य केले आहे.  तक्रारदाराच्या वकिलांच्या सांगण्यावरून व संमतीवरून, 'कंटेम्ट नोटीस ऑफ मोशन' निकाली काढण्यात येत आहे.
....................................................................................................................................................................

अॅडव्होकेट फलटणकरांनी मदत केली आणि म्हणूनच आम्हीं हा लढा जिंकू शकलो. हे सर्व शब्दांत उतरवून इथे टाकणे देखील त्यांच्या मदतीशिवाय शक्य नव्हते. शेवटी कायद्याच्या गोष्टी आहेत त्या मला नीटच उतरवायच्या होता. कुठेही चुकीची माहिती द्यावयाची नव्हती...त्यामुळे त्यांचे पुन्हा एकदा आभार...डोंगराएव्हढ्या कामात वेळ काढून माझे हे लिखाण तपासून दिल्याबद्दल...
:) 
....................................................................................................................................................................

38 comments:

Aakash said...

राजीव काका तुस्सी ग्रेट हो!

ताई, तुमच्या patienceचा तर काही जवाब नाही.
एक-एक पोस्ट येईल तसं तिवारी आणि राठोड वरचा राग अधिक अधिक वाढत होता. पण मनात विजय सत्याचा होणार हे माहिती असून पण एक tension असायचं.
आजचा पोस्ट वाचून एकदाचा जीव गार भांड्यात पडला. ह्या यशासाठी तुम्हा दोघांचं अभिनंदन!

Prof. Sumedha said...

खरेतर.... अनघा चा विजय असो ...बाबांचा विजय असो ...सामान्य माणसाच्या यशाचा विजय असो ...सामान्य माणसाच्या लढ्याचा विजय असो ...अशा जोरजोरात घोषणा द्याव्याश्या वाटताहेत!!!
अभिनंदन !!

Suhas Diwakar Zele said...

ब्राव्हो... सिंपली ब्राव्हो !!!


शब्द नाहीत प्रतिक्रिया द्यायला, पण राजीवकाका आणि अनघा तुस्सी ग्रेट हो... अभिनंदन :) :)


चला आता मी एक पार्टी मागायला मोकळा ;-)

इनिगोय said...

नमस्कार, आनंद झाला.
कोर्टाच्या त्या रोजनाम्याची प्रत एका फ्रेममध्ये घालून त्या उद्दाम अधिकाऱ्यांच्या कार्यालयात सर्वांना येता जाता दिसेल अशी लावायला हवी.
या माणसांच्या सर्विस रेकॉर्डवर हे आणता येईल असा काही मार्ग नाही का?

Soumitra said...

Anagha, Its a lesson for the next generation to fight for the right this reality should be published in newspaper so lot of people will get inspiration to fight for their own lawful rights. Zanshi cha Ranicha vijay aso keeep fighting for the rights

Gouri said...

सुहास +१.
आणि पुढच्या पोस्टीत तुमच्या दोघांच्या पावलांचे फोटो टाक. :)

तुझी मागची दुबईच्या दूतावासाविषयीची पोस्ट मी माझ्या सरकारी अधिकारी मित्राला पाठवली होती ... ही मालिकाही पाठवते आहे. सगळे नागरिक इतके सजग झाले तर त्याचं काम फार सोपं होईल. :)

अपर्णा said...

हुश्श....ज्याचा शेवट गोड ते सारं गोड म्हणवत नाही म्हणून फ़क्त हुश्श.....
बाकी तू आणि राजीवकाका..तुस्सी ग्रेट हो......

Shriraj said...

अनघा, खरं तर तुझे आभार मानायला हवेत तुझी ही गोष्ट आमच्यासोबत शेअर केल्याबद्दल आणि त्याहून जास्त राजीवजींचे जे ह्या प्रसंगात तुझ्यासोबत खंबीरपणे उभे होते.
तेव्हा आभार अनघा आम्हाला मनमोकळेपणाने सर्व सांगितल्याबद्दल आणि आभार राजीव आमच्या ताईला जिंकविल्याबद्दल :)

इंद्रधनु said...

अभिनंदन अनघाताई :)

Dhaval Ramtirthkar said...

अभिनंदन अनघा!!! ऐकून किती बरं वाटला की सरकारी अन्यायाविरुद्ध सामान्य माणूस ही जिंकू शकतो. तुझा लढा खरच उल्लेखनीय आहे.

पण एक जरूर वाटतं... जी चूक आपल्या महाराष्ट्रच्या रक्षणकर्त्या पूर्वजांनी केली - शत्रूवर विजय मिळवून ही त्यांना दिलदार पणे माफ करून सोडून दिले आणि ज्याने महाराष्ट्रला भारी किंमत मोजावी लागली तीच चूक या म्हाडा च्या भ्रष्ट अधिकार्‍यांना सोडून केली गेली आहे का?

सार्वजनिक अपमान वगळता (अशा डुक्कर माणसांना मानच नसतो तर त्यांचा अपमान किती काळ त्यांच्या मनात टिकणार) त्यांना आयुष्यभर लक्षात राहील अशी कठोर शिक्षा करण्याची तरतूद न्यायात नाही आहे का?

Anagha said...

आकाश, मलाही इतका धीर नाहीये खरंतर...खूप त्रास होतोच...पण शेवटी, भारतीय कायद्यावर माझा विश्वास आहे हे मात्र तितकेच खरे...

Anagha said...

सुमेधा, :D :D
आभार आभार ! :)

Anagha said...

हेहे ! गौरी ! थांब मस्तपैकी पेडीक्युअर करते...छान नेलपॉलीश लावते आणि मग काढते फोटो...पायांचे ! :)
आणि खरंच तुझे आभार...मालिका अजून पुढे पाठवल्याबद्दल... :)

Anagha said...

:D it's party time Suhas ! :D

Anagha said...

अपर्णा, धन्यवाद गं. :)

rajiv said...

...तीच चूक या म्हाडाच्या भ्रष्ट अधिकार्‍यांना सोडून केली गेली आहे का?

धवल, ज्या 'कंटेम्ट नोटीस ऑफ मोशन' अर्जाद्वारे, घडलेल्या घटनांकडे मा. न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले होते, त्यातील काही क्लिष्ट तांत्रिक मुद्द्यांवर कदाचित 'कंटेम्ट नोटीस ऑफ मोशन' गैरलागू ठरण्याची शक्यता जाणवल्याने, अधिकाऱ्यांना कोर्टात बोलावून त्यांना माफी मागायला भाग पाडणे ही एक यशस्वी चाल असू शकते. व तेच न्यायाधीशांनी केले आहे. ते समजून न घेता, संतापाच्या आहारी जाऊन हेकट भूमिकी घेणे हे बरोबर नव्हे. ही बाब लेखामध्ये पण मांडली आहेच. अधिक खुलाशाची सुज्ञास आवश्यकता नाही !!

आणि धवल, भारतीय कायद्यात सर्व तरतुदी असतात..व आहेत. मात्र त्याचा वापर मा. न्यायाधीशांना कायद्याचे भान व तारतम्य ठेवूनच करावा लागतो हे लक्षात घे !!

Anagha said...

बघू मीरा...कायकाय आणि कसकसं जमतं ते....आपल्याला धीर धरावा लागतो हे मात्र खरे. हो ना ? :)

Anagha said...

इंद्रधनू, आभार गं. :)

Anagha said...

सौमित्र ! आशा आहे, की आपण सगळे मिळून, प्रयत्नांनी हा सगळा भ्रष्ट कारभार आता थांबवू...हो ना ?
आभार रे प्रतिक्रियेबद्दल. :) :)

सौरभ said...

१० भाग - माझ्या दृष्टीने पाहिलं तर एक मोठ्ठं पर्व. वाचताना म्हटलं "सौरभ, तु किती सुखी माणुस आहेस!" एक प्रश्न पडला. असं आपल्याबाबतित झालं असतं तर झेपलं असतं का? उत्तर नकारघंटा बडवत आलं. विचार आला हे सगळं होत होतं तेव्हा मी काय करत होतो? नेहमीचा थिल्लरपणा. राजीव काकांशी वा तुमच्याशी बोलताना कधी जाणवलं नाही एवढा मोठा मॅटर चालू असेल. ते तुम्ही कधी जाणवूपण दिलं नाही. आणि तेवढं समजण्याची मॅच्युरिटी अजुन तरी आली नाही.
प्रत्येक भाग वाचून झाल्यावर एक मोठ्ठा निश्वास निघायचा तेव्हा जाणवायचं पुर्ण भाग वाचेपर्यंत आपला श्वास रोखुन धरला गेला होता.
नेहमीच्या कामाच्या रगाड्यातुन आपल्याला उसंत मिळत नाही आणि त्यात तुम्ही त्यांच्याशी नडलाच नाहीत तर त्यांना पुरुन उरलात!! तुम्ही शेर तर काका सव्वाशेर. राजीवकाका तुम्ही तर सुपरकुल सुपर हिरो आहात!! मला तुमच्याबरोबर चेस खेळायचय. आता कोर्टात तर तुमच्या समोर उभंपण नाही राहता येणार. म्हणुन बौद्धीक व्यायामासाठी आपण चेस खेळू. आकाश आणि अनघामॅमपण असतिल माझ्या साईडने. ३ vs. १ असा सामना. :P तुम्ही दोघे ग्रेट आहात! You've won! I'm happy, I'm smiling, and it is hard to express how I'm feeling. I don't want to say anything. I just want to celebrate. :) :) :)
राजीवकाका आणि अनघामॅम, अभिनंदन अभिनंदन अभिनंदन... आणि विनम्र अभिवादन. (तुमच्या दोघांशी माझी ओळख आहे, ह्यामुळे मला किती भाव खावावासा वाटतोय! :D :D) शुभेच्छा... अनेकानेक शुभेच्छा...

हेरंब said...

जबरदस्त !!! सचिनचे दोनशे झाल्यावर किंवा आपण वर्ल्ड कप जिंकल्यावर जसं आनंदाने बेफाम व्हायला झालं होतं तसं वाटतंय अगदी हे वाचल्यावर. एक मोठी लढाई जिंकल्यासारखं !!

तुम्ही दोघे जाम ग्रेट आहात !!

Mandar Kulkarni said...

Congrats!!! Patience shown by you & Mr. Phaltankar taught me a lot. Satymew Jayate!!

भानस said...

अनघा,राजीव तुस्सी ग्रेट हो...च! तू केस जिंकलीस हे तूच मला सांगितलेलं असल्याने निकाला माहित होताच पण त्यामागचा हा इतका मोठ्ठा इतिहास आणि लढा डिटेल माहित नव्हता...आल्यापासून तुझ्या पोस्ट वाचतेय...:)
तुम्हा दोघांचे अभिनंदन!

Anagha said...

श्रीराज, हे सर्वांना सांगायलाच हवे होते नाही का ? नाहीतर सद्य परिस्थितीत आपण सगळेच इतके निराश झालो आहोत...की मिनिटामिनिटाला संताप होत असतो... हो ना?
मग हे असं काही चांगलं घडलं तर तुम्हांला सर्वांना नाही सांगणार तर कोणाला सांगणार. :)

Anagha said...

सौरभा, बुद्धिबळाची आयडीया छान आहे ! पण येतो का फलटणकरांना खेळता..ते आधी विचार ! मला तर अजिबात येत नाही ! :D

Anagha said...

:D
हेरंबा ! आज मात्र मला आभार मानायलाच हवे...कळत नकळत माझ्या पाठीशी उभं राहिल्याबद्दल! हो ना ? :)

Anagha said...

मंदार, आभार आभार ! :)

Anagha said...

अगं श्री, त्याच दिवशी कोर्टामधून आल्याआल्या बझ्झवर पण टाकलं होतं ! राहवलंच नव्हतं ! :)

धन्यवाद गं !

Prof. Narendra Vichare said...

हम्म.... शेवटी असे झाले तर... "आर्य फलटणकरांनी" योग्य तेच केले. आम्ही किती सभ्य आहोत आणि म्हाडाचे अधिकारी कसे बेमुर्वतखोर आहेत हे "आर्य फलटणकरांनी" कोर्टाच्या लक्षात आणून दिले हे बरे झाले. म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी यापुढे तरी, आपल्या भ्रष्ट वागण्या मुळे आपल्या निष्पाप पत्नी, मुलांना मान खाली घालायला लागणार नाही याची काळजी घ्यायला हवी... नव्हे ते घेतीलच अशी अशा करायला हरकत नाही. अनघा, या सर्व पोस्ट च्या प्रिंटआउट्स आणि कोर्टाच्या निर्णयाच्या झेरॉक्स प्रती काढून म्हाडाच्या कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना पाठवूया का, ते फलटणकर साहेबाना विचारून घे.... निदान म्हाडाच्या चेअरमन, सेक्रेटरी, मंत्री महोदय, मुख्यमंत्री महोदय आणि अण्णा हजारे यांना तरी पाठवूया का ? ते विचार..... अब्रू नुकसान भरपाई मिळू शकेल का ते विचारले असशीलच.... मिडिया चे काय करायचे तेही विचार.... जय हो... जय हो...... जय हो..........
तुम्हा दोघांचे अभिनंदन ....... अभिनंदन.... अभिनंदन.... अभिनंदन.... तसेच तुझ्या बाबांच्या फोटोतील चेहऱ्यावर अभिमानाचे आणि समाधानाचे हास्य उमलले तुला दिसलेच असणार... मला खात्री आहे....

Anonymous said...

_/\_ _/\_

मानलं तुम्हा दोघांनाही...

तुम्हा दोघांनाही मी ओळखते पेक्षा तुम्ही दोघंही मला (पण) ओळखता... कसलं भारी वाटतय!!! :)

ए सुहास आपण देऊ रे त्यांना जंगी पार्टी!!! मी तर नक्की देणार..... (तुझा कान ओढून तूला सोबत घेणार आणि :) )

Pankaj - भटकंती Unlimited said...

आता सचिनचं महाशतक झालं नाही तरी चालेल. आमची अनघा जिंकलीये.

Anagha said...

सर, गोष्ट अजून पुढे चालूच आहे.... :) :)

Anagha said...

तन्वे, पार्टी पार्टी ! नॉनव्हेज हा !! :p :D

Anagha said...

पंकज ! :D :D

Kanchan Karai (Mogaraafulalaa) said...

पहिला भाग वाचला तेव्हा थोडं थोडं लक्षात आलं की प्रकरण कुठे जाऊन पोहोचणार आहे. मी देखील याचा थोडाफार अनुभव घेते आहे नं, त्यामुळे क्रमश: वाचत सस्पेन्स सहन करण्याची मन:स्थिती नव्हती. थोडं थांबून, माझ्या आईच्या घराच्या रिडेव्हलपमेंटचे मनातले विचार बाजूला ठेवून, एकाग्रचित्ताने एक-एक भाग वाचला. आश्चर्य, चीड, संताप, अश्रू आणि नंतर समाधान पण तरिही थोडी धाकधूक अशा संमिश्र भावना मनात येऊन गेल्या. काही चेहेर्‍यावरही आल्या. एक धर्मयुद्ध जिंकण्यासारखंच आहे हे सर्व. तू ज्या प्रकारे एक-एक पोस्ट सविस्तर, संगतवार लिहिली आहेस, त्यातून लक्षात येतं की हे सगळं तुझ्या मनावर किती खोलवर ठसा उमटवून गेलंय. आणि खरंच आहे गं, आपण सामान्य माणसं. नुसतं "कोर्ट, वकील" म्हटलं तरी अपराध केला नसतानाही आपले हातपाय थरथरतात. इथे इतका मोठा लढा द्यायचा, तोही बिल्डरसारख्या लोकांबरोबर म्हणजे महाकठीण कर्म. तुझ्या आईनेदेखील किती हिमतीने हे सर्व सहन केलं. त्यांना किती मन:स्ताप झाला असेल, भितीदेखील वाटली असेल. काय बोलणार गं? म्हाडा आणि बिल्डरच्या लोकांना हे असं वागताना लाज-लज्जा, काहीच कसं वाटत नाही? आपल्या आई-वडिलांच्या वयाच्या व्यक्तीला हेतुपुरस्सर बेघर करताना कणभरही खंत, शरम वाटू नये इतकी निबर झालेली असतात का यांची मनं? राजीव काकांच्या मुरब्बीपणा आणि मुत्सद्दीपणाचं खूप कौतुक वाटतं. खूप छान साथ दिली त्यांनी तुला. हॅट्स ऑफ टू हिम. वकिल असावा तर असा. जिथे कृष्ण आणि अर्जुन युद्धासाठी एकत्र सामोरे जातात, तिथे विजयश्री त्यांच्याच बाजूने असते हे निश्चित! तुझं त्रिवार, हार्दिक अभिनंदन!

मीदेखील पुनर्विकासाच्या संदर्भात म्हाडाशी काही पत्रव्यवहार करत असते. आश्चर्य म्हणजे एकदा म्हाडाच्या कार्यालतून माझी पत्रं "हरवली" देखील आहेत. शिवाय या वारंवार पत्रव्यवहार करण्यावरून आमच्या सोसायटीच्या "रिडेव्हलपमेंट कमिटी"कडून मला बरीच अरेरावी ऐकून घ्यावी लागली. पण एकच ठरवलं आहे - डगमगायचं नाही.

Kanchan Karai (Mogaraafulalaa) said...

अरे हो, एक सांगायचं राहिलं. तुझ्या ’म्हाडा आणि मी...’च्या सर्व पोस्ट मी फेसबुकवरच्या आमच्या वर्तक नगर ग्रुपमधे शेअर केल्या आहेत.

Anagha said...

कांचन, धन्यवाद गं.

आणि तुला एक सांगू ? मी आजतागायत हे सर्व आईला सांगितलेलंच नाही ! कशाला तिच्या डोक्याला त्रास देऊ ? फक्त आपल्याला हवी तिथे जागा मिळाली आहे हे इतकंच सांगितलं. :)

आणि म्हाडा, बिल्डर ह्यांच्याबरोबर करायचा पत्रव्यवहार हा अतिशय हुशारीने लिहायला हवा...माझे बाबा देखील हुशारीने पत्रव्यवहार करीत असत..आणि त्यांनी पाठवलेल्या प्रत्येक कागदाची आधी एक प्रत काढून आपल्या फायलीला लावून टाकत असत ! :):)

THEPROPHET said...

अत्युच्च! अभिमान वाटला तुझा अन राजीवकाकांचा! :)