नमस्कार

नमस्कार

Pages

Saturday 3 December 2011

बोलघेवडे...

खिडकी बोलते.
दार बोलतं.
कधी इतिहास सांगतं.
कधी बंद दारातून दु:ख झिरपतं.
हृदयात घर करून वसलेल्या माणसांविषयी भरभरून सांगतं.
फक्त त्यांची भाषा समजून घ्यावी...त्यांकडे डोळे भरून बघावं.
मग ते खुलून जातं...आपल्याशी बोलू लागतं.
ते कोणाचंही का असेना....त्याच्या माणसांची भाषा कुठलीही का असेना...काय फरक पडतो ?
आपण फक्त काही क्षण काढावे...चालत्या पायांना थोडं थोपवावं...आणि ते बोलघेवडे खिडक्या, दारे, घरे भरभरून बोलू लागतात.
मनचं गूज. लपलेला इतिहास.
स्पेनच्या गल्लीबोळांतून फिरताना कधी वाटलं...
अचानक काळाचा पडदा वर उचलला जाईल. एखादी बंद निळी खिडकी उघडेल. गोरीपान, टपोऱ्या काळ्याभोर डोळ्यांची तरुणी बाहेर डोकावेल. तिच्या नजरेला माझी नजर मिळेल. ती हसेल. मी हसेन...माझ्या एकट्या रस्त्यावर एक क्षण सोबत मिळेल. मग तिची निळीशार उघडी खिडकी, हलकेच दोन्हीं हात हलवेल...माझा निरोप घेईल. मी कधीच वळून न बघण्यासाठी पुढल्या रस्त्याला लागेन...
 









१०
११
१२
१३
१४
१६
१७
१८
१९
२०











 २१
२३
२४
२५
२६
२७
२८
२९
३०
३१
३२
३३
३४
३५
३६
३७
३८
३९
४०
४१

12 comments:

rajiv said...

अप्रतिम.....खरेच त्या खिडक्या, त्यांचे ते रंग ... खूप खूप काही सांगतायत असे जाणवते.....
हि सगळी एकदम जिवंत चित्रेच भासलीयत....

अनघा खूप जिवंत अनुभव दिलायस तू.... !!

Aakash said...

खिडक्या, दरवाजे आणि त्यांना उघडणाऱ्या latches - आकर्षक रंग दिल्या मुळे सुंदर दिसतात. त्यातून दिसणारी दुनिया पण जास्त रंगीत दिसत असावी.

हेरंब said...

अप्रतिम अप्रतिम फोटो..

>> स्पेनच्या गल्लीबोळांतून फिरताना कधी वाटलं...
अचानक काळाचा पडदा वर उचलला जाईल. एखादी बंद निळी खिडकी उघडेल. गोरीपान, टपोऱ्या काळ्याभोर डोळ्यांची तरुणी बाहेर डोकावेल. तिच्या नजरेला माझी नजर मिळेल. ती हसेल. मी हसेन...माझ्या एकट्या रस्त्यावर एक क्षण सोबत मिळेल.

रच्याक, स्पेनबद्दल (किंवा इतर कुठल्याही देशाबद्दल) माझी अशीच काहीशी स्वप्नं आहेत ;) :P

Anonymous said...

विलक्षण सुंदर गं. प्रत्येक खिडकी तिची फ्रेम कड्या वगैरे स्वत:च स्वतंत्र अस्तित्व राखलेल्या तरिही शेजारच्यांशी सुसंगती साधणाऱ्या....

Bright Colours खरं तर आपल्याकडे सहसा इतके वापरले जात नाहीत आणि कुठे दिसले तर ते खुपसे शोभताहेत असेही वाटत नाहीत आणि इथे नेमके तेच भुरळ घालताहेत!!!

बाकि हेरंबच्या वतीने तू आज डोंबिवलीला फोन लाव तर अनघा जरा :) ;)

Prof. Narendra Vichare said...

अनघा, मी जेंव्हा रायगडावर आणि पुण्याला शनिवार वाड्यावर गेलो होतो तेंव्हा अगदी अस्सेच मनात आले होते. तू मात्र ते खूप छान शब्दात ते मांडले आहेस... फक्त गोरीपान, टप्पोऱ्या काळ्याभोर डोळ्यांच्या तरुणी ऐवजी एखादा शूर सरदार बाहेर डोकावेल आणि सगळा स्फूर्तीदायक इतिहास सांगेल असे मला वाटून गेले होते.... तुझ्या लिखाणा सारखीच तुझी फोटोग्राफी ची कला देखील ग्रेट... अप्रतिम इमेजेस आहेत.. छान.. छान. :-)

Anagha said...

राजीव, छोट्या छोट्या गोष्टी देखील इतक्या सुंदर करून ठेवल्यात ना की बघत बसावे. फक्त तेथील निदान बारसिलोनातील आधुनिक बांधकामाबद्दल मात्र नाही काही चांगले बोलण्यासारखे. त्या इमारती बघून मला वाटले की आता ह्यांची सौंदर्यदृष्टी कुठे गायब झाली ?! :)

आभार प्रतिक्रियेबद्दल. :)

Anagha said...

ह्म्म्म...असावी असावी आकाश. :)

Anagha said...

हेरंबा, आम्हीं खास अमेरिकेवरून एक सुंदरशी खिडकी मागून ठेवलीय तुझ्यासाठी ! आणि ती खिडकी अगदी समोरच्या रस्त्याकडे डोळे लावून बसलेय....ये तर खरा तू इथे...मग बघ कशा चांगल्या थपडा मारेल ती खिडकी तुला....मी तिचे कान भरून ठेवणारेय ! ;) :D :D

Anagha said...

तन्वी, भूमध्यसमुद्राकाठी नेहेमीच हा सुंदरसा निळा रंग मोठ्या प्रमाणात वापरलेला दिसतो. आणि त्यांच्या आर्किटेक्चरला तो रंग इतका शोभून दिसतो म्हणून सांगू ! निळी खिडकी, निळा दरवाजा, त्याबाहेर फुललेली रंगीबेरंगी फुलं... मस्त मस्त....
:)

Anagha said...

हेहे! सर ! :D :D नशीब हा आमचं, तुम्हांला शूर सरदारच दिसतो ! :)

आता मला एखादा चांगला कॅमेरा घ्यायचाय सर...बघू कधी जमतं ते. :)

Shriraj said...

सुंदर फोटो आहेत अनघा. त्या सहाव्या चित्रातल्या सिगरेट ओढणाऱ्या बाईला बघून मला थोडं हसायला आलं. तिला बिच्चारीला कल्पना ही नसेल की आपला आज असा फोटो निघेल

सौरभ said...

Asian Paints >> क्योकी हर घर कुछ कहता है!