नमस्कार

नमस्कार

Pages

Wednesday 16 November 2011

बाई-माणूस

चार चाकांच्या गाडीला चार चाके असतात.
ह्म्म्म...म्हणजे ? म्हणजे काय म्हणायचं तरी काय ? कर्णाच्या रथाला किती चाकं होती ? मागे दोन चाकं आणि पुढे घोडे. मागचे एखादे चाक निखळून पडले तरी देखील पुढचे घोडे, फरफटत का होईना पण रथ चालवू शकत असावेत. आधुनिक जगाच्या गाड्या आणि गाडीची चार चाके. पुढे दोन आणि मागे दोन. समोरील रस्ता पुढील चाकांच्या दृष्टीस अगोदर पडतो. म्हणजे पुढे जे काही संकट येईल त्याला ही दोन चाके आधी तोंड देतात काय ? अर्थात संकटे चोहोबाजूने येऊ शकतात ! प्रश्र्न असा आहे की ह्या पुढील चाकांचा मागील चाकांशी काही संवाद असतो की नाहीच ? म्हणजे ते चौघेही चालवतात एकच गाडी परंतु, एकमेकांशी काडीचाही संवाद न साधता ?
आणि जर तसे आहे असे मानले तर त्यात एक गैरसमज होण्याची संभावना अधिक दिसून येते. केवळ सुसंवाद नसल्याकारणाने. पुढील चाकांना वाटू शकते की माझ्यामुळे ही गाडी चालते व मागील चाकांना वाटू लागते की माझ्यामुळेच ही गाडी पळते.

ही झाली एक गोष्ट.

दुसरी ?
दुसरे असे की त्यातील एका जोडीला असे वाटू शकते की मला सगळेच येते. मला त्या दुसऱ्या दोन चाकांची गरजच काय ?
तर दुसऱ्या जोडगोळीला वाटू शकते की माझी गरजच काय ? कोणाचेच काहीही अडत नाही.

ह्यातील कोणतेही विचार त्या गाडीला घातक.
एकाला 'ग' ची बाधा तर दुसऱ्याला न्यूनगंड.

कसा चालायचा संसार ?

मल्टी टास्किंग.

सुग्रास जेवण ?
करता येते.
धुणी भांडी ?
करता येतात.
केर लादी ?
येते.
पोरांची शी शू ?
काढता येते.
वृद्धांची सेवा ?
करता येते.
मिटिंगा फिटिंगा ?
येतात.
बँकेची कामे ?
येतात.
पैसे कमावता ?
येतात.

कठीण.
कुठेही म्हणजे काहीही अडत नाही.
जोडीदाराशिवाय.

आज सगळं गणित चुकीचं वाटत आहे.
अंगावर पडत गेलं...मी शिकत गेले...
हे मला येत नाही किंवा हे माझं काम नाही त्यामुळे मी ते करणार नाही असं फक्त म्हटलं नाही.
दूरदृष्टीचा अभाव !
त्यामुळे आपण सगळीच कामं आपल्या गळ्यात पाडून घेतली आहेत हे कळलं नाही.
जोडीदाराच्या अंगावर जबाबदारी पडत नाही आहे हे लक्षात आलं नाही....म्हणजे कसं....कायम ब्रम्हचारी...बॅचलर वगैरे.

चुकलंच म्हणायचं.
आज हे वाटून काडीचाही उपयोग नाही हे तर सर्व जगाला माहित आहेच.

त्यापेक्षा...
मी ? मी जाऊ बँकेत ? मला नाही रे कळत तिथे काही.
काय ? मी पैसे कमवू ? ते कसं करायचं बाई ? जळलं मेलं ! मला मेलीला काय कळतंय त्यातलं ?
किती दिवस झाले बघ ना ! वरती माळ्यावर ना त्या तिथे कोपऱ्यात एक स्टीलचा डबा आहे. त्यात ना मी ती एक पळी ठेवलीय. आठवते का तुला ती ? ती रे, शेजारच्या काकूंनी दिलेली ! संक्रातीला ! हा ती ! कित्ती दिवस झाले म्हणतेय ती वापरायला काढावी ! जरा देतोस का काढून ?
अरे ! रात्रीचा एक वाजलाय ! बघ ना ! आपल्या लेकीला केव्हढा ताप भरलाय ! जा पाहू ! त्या रानडे रोडवर जो केमिस्ट आहे ना तो म्हणे रात्रभर उघडा असतो ! म्हणजे त्याचं दुकान रात्रभर उघडं असतं ! आण पाहू क्रोसिन !

म्हणजे कसं समोरच्याच्या हे मनात बिंबायलाच हवं...आपल्याशिवाय हे घर चालत नाही !

आता गेला बाजार उदाहरणादाखल एक प्रसंग.

कमोडवरील सीट कव्हर तुटलं होतं. तीन चार वर्ष.
"अगं, किती दिवस मी बघतोय ! घेऊन ये ना ते कव्हर !"
"म्हणजे ? तुला नाही येत का आणता ? की तू घराबाहेर पडतच नाहीस ? की मी माझ्या हौसेखातर लग्न केलंय ? आणि हा संसार एकटीच्या डोक्यावर घेतलाय ?"
"किती बोलतेस ?!"

हम्म्म्म.
एकदा का कळलं की आपल्यावाचून काहीही अडत नाही की माझ्या बाबतीत तर माणूस मरायला मोकळा !
म्हणजे अगदी ढगाबिगात !

त्यापेक्षा...गाडीच्या त्या प्रत्येक चाकांनी लक्षात घ्यावं...आपण जर नाही हातपाय हलवले तर ही संसाराची गाडी मुळात रस्ताच सोडेल ! किंवा चाकांनी एकमेकांना नेहेमी जाणीव करून द्यावी...तुझ्यावाचून काही खरं नाही हा माझं ! वगैरे वगैरे...

म्हणजे कसं...
मी नाही जा ! तू जा ना रे बाजारात ! तुझ्यासारखं ना मला नाहीच कळत काही त्या मेल्या माश्यांमधलं !
लाडेलाडे.

बहुतेकवेळा तरी बायकांना बहुतेक कामे येतात. अंगावर पडली की जमून जातात. परंतु, हे आपण आपलं मनात ठेवावं. समोरच्याला ते कळता कामा नये ! उगा पुढेपुढे करू नये...'तू झोप रे...मी आत्ता येते बघ बँकेत जाऊन'...असलं काहीतरी वेड्यासारखं बाईमाणसाने बोलू नये !
घरातली कामं कशी ठप्प झाली पाहिजेत.
जोडीदार देखील खुष.
थोडा पुरषी अहंकार सुखावलेला.
थोडं प्रेम उफाळलेलं...
आपल्या वेड्याखुळ्या बायकोबद्दल.
आपलाच त्यात फायदा !
नाही का...?

हम्म्म्म...
माझं मल्टी टास्किंग.
एक व्यक्ती म्हणून भरपूर शिकवून जाणारं ...
स्वत:च्या पायावर खंबीरतेने उभं करणारं...

गाडीने रस्ता सोडला नाही.
वेग कमी केला नाही.
आणि तरीही...
प्रवासात अर्ध्या रस्त्यावर निखळून गेलेल्या एका चाकाची सतत आठवण करून देणारं...
माझं मल्टी टास्किंग.

23 comments:

Gouri said...

अनघा, एकदम पटलं बघ. दहा वर्षांच्या अनुभवानंतर मला लग्नापूर्वी येणारी कित्येक कामं येईनाशी झालीयेत :)

Anagha said...

:) ही कल्पनेची आयडीया सही आहे हा गौरी ! :D

Anonymous said...

अनघा मलाही नेहेमी वाटतं आपल्यालाच कसं जमतं सगळं...आणि का जमतं ते!!! शेजारच्या जरा कमी शिकलेल्या बायका कशा मग जास्तवेळा आनंदी दिसतात.... त्यामागचं कारणही बरेचदा उमजलेले हेच की ,"मला नाही बाई हे जमायचं’ हा ऑप्शन आपण स्वत:च बंद करून ठेवतो नाही का!!!!’बाईमाणूस’ आहोत हे विसरण्याचे अनेक तोटे आहेत नाही....

पोस्ट पटली गं!!

हेरंब said...

जाहिरातबाजी म्हणून नाही पण हे इथे चपखल बसतंय.

http://www.harkatnay.com/2011/05/blog-post.html

;)

अपर्णा said...

अनघा, पहिल्या परिच्छेदानंतर मला उगीच आपल फोर व्हील ड्राइव्ह आठवली....(आवरा)
बाकी पोस्ट विचार करायला लावणारी आहे...निदान माझ्यासारखीला तरी कारण मला ते तू म्हटलं तस काम देतानाच मार्केटिंग जमत नाही...:)
असो..शेवट मात्र चटका लावून गेला...अनघा काळजी घे ग...तुझ्या खूप विचार करत बसणाऱ्या मनाची....(हे चांगल्या अर्थाने म्हटली ग..उगीच त्यातून काही दुसरा अर्थ निघायला नको म्हणून कंस...)

Anagha said...

हेहे ! हेरंबा ! वाचलेलं मी हे !!! आणि तेव्हा देखील हसत बसले होते ! डॅम्बिस म्हटलं होतं तुला ! आणि अजूनही माझा मत कायमच आहे !!! :D :D :D

Anagha said...

तन्वे, म्हणून तर समस्त मैत्रिणींना हा माझा अगदी प्रेमाचा, मायेचा सल्ला आहे ! 'नाही' म्हणायलाच शिकायला हवं आपल्याला ! :) कारण आपली प्रगती वगैरे सगळं ठीक आहे गं...पण ह्यांना सगळं आयतंच फावतं ! ;) :)

Anagha said...

:) अपर्णा, इसापनितीची गोष्ट आहे ही माझी...अगदी तात्पर्यबित्पर्य असलेली ! :)

मला कळते तुम्हां सर्वांची काळजी...
आणि घेते अगं मी...काळजी (कलेजी नव्हे !) ;) :)

Anonymous said...

अनघा अगं या पोस्टच्या निमित्ताने ती जाहिरातवाल्याची पोस्ट चटकन पुन्हा वाचून काढली :)... रिफ्रेशमेंट :)

आणि हो महत्त्वाचं, आज नं जरा बाहेर जाणार आहोत, मला नाही जमणार मुलांसाठी डबा करून सोबत घ्यायला, आणि मुलांना घेऊन टॅक्सी शोधा रे वगैरे जमायचं नाही वाटतय तेव्हा तू गाडी पाठव असं अमितला ठणकावून सांगितलय बघ ;)आता दुपारपर्यंत माझ्यातली ’मी’ जागी न होवो म्हणजे मिळवली, नाहितर मरो ती डिपेन्डन्सी म्हणत मी लगेच टॅक्सीने अबूधाबी पालथं घालून यायची :)... एकदम तलवार उपसल्यासारखी भराभर कामं व्हायची उरकून... :)

Shriraj said...

:)
तू आता बायकांसाठी "Think Negative" नावाचे एक पुस्तक लिही. Best seller होण्याचे खूप chances आहेत :P

Anagha said...

आईशप्पथ ! म्हणजे काय श्रीराज ???? गाडी माझी सतत नकारार्थी रुळांवर धावतेय की काय ??????

Anagha said...

तन्वे, लगे रहो ! आणि झकास जाऊ दे तुझा दिवस ! :)

Raindrop said...

all in all never let the man know that you are actually a four-wheel drive with power steering....let them feel u r a thakela model which will stall in the middle of the road, if not taken care of. Tujhi changlich upama aahe chaakanchi, to elaborate on the truth :)

Anagha said...

Ya ! Vandu, that's the core idea ! ;) :)

Shriraj said...

छे गं! नाही नाही... तसं काही नाहीये. मी आपली ह्या पोस्ट पुरती कमेंट दिली आणि ते ही तुझी थोडी चेष्टा करण्यासाठी :)

Sakhi said...

मस्त च..

सुपर वूमन नाहीतर गेलाबाजार आजची एकविसाव्या शतकाची मुलगी म्हणा/ बाई म्हणा .. करता करता आपल्याला सगळे करता येते ही अहं भावना खूप जबाबदाऱ्या वाढवून ठेवते हे खरेच ... मस्त लेख नेहमीप्रमाणे :)

आनंद पत्रे said...

हे असलं सुंदर लिहिणं आपल्याला नाही बाबा जमायचं, तूच लिही बरं कशी चटचट :)

Trupti said...

superb!mala aawdale...mala nahi bai jamayach mahntana kamipana watayacha aadhi...pan aata..jau de it's part of life, ho na..barach divasani wachtey tuze...nehami sarkh ch mala khush kele bhg tu..lihit raha..:)

Trupti said...

me hi post share kartey mazya mitar maitrinin sobat...:)

Anagha said...

भक्ती, जबाबदाऱ्या 'जोडीने' उचललेल्या बऱ्या ना ? नाहीतर आपण आपल्या मल्टी टास्किंगच्या धुंदीत...आणि.... :)

Anagha said...

आनंद ! :D
आभार आभार !:D

Anagha said...

तृप्ती, मलाही कळत नव्हतं...कुठे नाहीशी झालीयस म्हणून. :)
:) पटतंय ना माझं म्हणणं ? आणि तुझ्या मित्र मैत्रिणींना पटलं का ?

इंद्रधनु™ said...

chan!