नमस्कार

नमस्कार

Pages

Wednesday 21 September 2011

म्याऊ म्याऊ !

कधी कधी वाटतं घरात मी आणि एक मनीमाऊ रहातो ! म्याऊ म्याऊ !

ममाssss....ममाssss....
बेडरूममधून हाक आली तेव्हा मी स्वयंपाकघरात ह्या माझ्या मनी माऊची न्याहारी तयार करत होते. उपाशी घराबाहेर पडायचं नाही असा मी एक अलिखित नियम तिच्यासाठी केला आहे. आणि त्यासाठी कितीही वाजता उठून पडेल ते कष्ट करायची माझी तयारी असते ! तिने तिचं वेळापत्रक फ्रिझला चिकटवूनच टाकलेलं आहे ! त्याप्रमाणे उठायचं आणि कामाला लागायचं...आणि आता अनुभवावरून हेही कळलंय की सगळ्याच आया काही लवकर उठत नाहीत. आणि मग मनीमाऊला डबा कमी पडतो....कारण बाकीच्या मनीमाऊंना देखील भूक लागते...आणि मग डबा दोन मिनिटांत फस्त होतो. तेव्हा माझी मनीमाऊ उपाशी रहाण्यापेक्षा रोज माऊ कुठे सहलीलाच निघाल्यासारखी मी वेगवेगळ्या पदार्थांचे वेगवेगळे डबे भरते. आणि विनातक्रार ही ते सगळं घेऊन कॉलेजला जाते.
ममाssss....ममाssss....
अगं, पुढे बोल ना...ऐकतेय मी !
पण पुढे काही नाहीचेय ना...मला तुला अशीच हाक मारायचीय ! आवडतं मला तुला अशी तुझ्या नावाने हाक मारायला !
मी हसत बेडरुमच्या दाराशी येऊन उभी राहिले.
म्हणजे तसं तुझं हे नाव नाहीये...तुझं designation आहे...
हो ग बाई...आवडतं हं मला हे माझं designation ! तू बहाल केलेलं...
मनीमाऊ गोड हसली.
अगं, तसंही ज्या दिवशी मी तुझ्या कानात तुझं नाव सांगितलं त्याआधीच तू माझं हे designation मला बहाल केलं होतस, नाही का ?
पुन्हा गोड गोड...
छान छान.. आणि ह्या designation च्या पुढे promotion पण आहे तेही एक छानच आहे...
प्रश्र्नचिन्ह...
आई...सासू....आजी...वगैरे गं...
हा ! जा आता ! खायला दे लवकर...पुढल्या पंधरा मिनिटात निघायचंय मला !
हसत वळले मी पुन्हा माझ्या कामाकडे...

आई...हे designation !
...सर्वात सुंदर.
...सर्वात कठीण...सांभाळायला.
...मिरवायला.
:)


25 comments:

Yogini said...

lai bharee.. :)
last para jast aawadala.. :)

Gouri said...

म(नी)मा(ऊ)ची ममा :)

Shriraj said...

:) बायकोला देतो हे पोस्ट वाचायला! मनाची तयारी होईल तिच्या... कशी वाटली कल्पना?

श्रद्धा said...

किती गोड?

Unknown said...

फारच सुंदर ----, तुमच प्रत्येक लिखाण. तुम्ही आई च्या 'पदवी' बद्दल जे म्हटल, हेही खरच आहे कि
God could not be all the places all the time and hence----.

विनायक पंडित said...

<> प्रचंड आवडलं!

Anagha said...

योगिनी :) आभार गं. भारी कठीण असतं हे आईपण ! जितकं आनंद देणारं तितकंच सहनशक्ती शिकवणारं ! :)

Anagha said...

गौरी :) :) :)

Anagha said...

श्रीराज बुवा, मानसिक तयारी सुरु केलीत वाटतं राणीसरकारांची ? छान छान. :)

Anagha said...

श्रद्धा धन्यवाद. :)

Anagha said...

All in the day's work, (म्हणजे 'राम' का ?? :) ) धन्यवाद !
आणि...अगदी अगदी ! :)

Anagha said...

विनायक ! आभार ! :)

हेरंब said...

>> म्हणजे तसं तुझं हे नाव नाहीये...तुझं designation आहे...

मनीमाऊशी प्रचंड, कैच्याकै सहमत.. प्रत्येकच आईचं 'आई' हे डेझीग्नेशन आहे !!!

Anonymous said...

>>>>>> म्हणजे तसं तुझं हे नाव नाहीये...तुझं designation आहे...

मनीमाऊशी प्रचंड, कैच्याकै सहमत.. प्रत्येकच आईचं 'आई' हे डेझीग्नेशन आहे !!!

अक्षरश: अगदी अगदी!!!

अनघा पोस्ट आवडली मनापासून :)

आनंद पत्रे said...

भारी.. साध्या प्रसंगातही किती सुंदर विचार.. आवडेश...

Anagha said...

:) आणि कस्सलं जबाबदारीचं आहे हे designation हेरंबा ! आणि seniority ला धरून हाताखाली कोणी मदतीला पण मिळत नाही ! ;) :)

Anagha said...

तन्वे, आभार गं. :)

Anagha said...

आनंद, माझी लेक हे असे काय काय विचार फेकत असते अधूनमधून माझ्या अंगावर ! :)
धन्यवाद रे ! :)

अपर्णा said...

अनघा खरच designation आहे बाई...एकदम पटल...आज तर मी घरात आहे I am in command aahe म्हणुन सांगितलंय (इतका गोंधळ सुरु होता )
तुझी लेक तुझ्यसारखीच ग....हटके विचार करणारी....मस्त पोस्ट

तृप्ती said...

tujhyaa sagaLyaa posts vaachate aahe he saangaNyaasaaThee post prapanch :-) pratyek veLee pratisaad deNa hot naahee kaaraN tech, lunch hour madhe vaachate aaNi ofc madhye access naahee.

Anagha said...

अपर्णा, तुझे आणि दोघे दोघे नं ?! म्हणजे अजूनच कठीण ! :)
धन्यवाद गं. :)

Anagha said...

:) मला वाटतं मी जरा धीरानेच घेते जरा आता...म्हणजे चार दिवसांना एक पोस्ट ! म्हणजे एकदम वाचता वाचता दमछाक नको ! :D
...आणि मला माहितेय हा तृप्ती...की साता समुद्रापलीकडे असूनही...तू माझ्यासमोर बसून नियमित वाचत असतेस ! :) खूप खूप आभार त्याबद्दल ! :)

sanket said...

पोस्ट वाचतांना मन चटकन भूतकाळात गेले..
मला माझीच आठवण झाली हा लेख वाचतांना ! :P मी पण असाच आहे हो ! "आई ,आई" करत असतो नुसता ! मग आई विचारते, " काय झाले ?" मग मी म्हणतो, "काही नाही, हाक मारावीशी वाटली.. " :)घरी गेलो की वेगवेगळ्या सुरात आणि पद्धतीने "आई ,आई" करत राहायचे, कधी "आई" कधी "मा" कधी "माँ" कधी, "मैया" कधी "माय", कधी "ममा" कधी "मॉम",तर कधी "मदर इंडिया " !! :P आणि फ़ोनवर बोलताना पहिल्या वाक्यात "आई" किंवा "माँ" आलेच पाहिजे. आई स्वतःच म्हणते की, ऐकले की खूप बरे वाटते. :)
सार्‍या आया सारख्याच !उपाशी घराबाहेर पडायचे नाही हा नियम आमच्या घरीसुद्धा आहे त्यामुळे बाहेर खायची सवय ती लागलीच नाही.(आता नाईलाज आहे.) माझा डबा वर्गात शेअर व्हायचा म्हणून आई नेहमी जादा डबा द्यायची. :)

आणि हो, आई हे खरेच डेजि़ग्नेशन असते.. प्रचंड सहमत..
जाता जाता फ़. मु. शिंद्यांच्या दोन ओळी आठवल्या त्या देउनच जातो,
" आई असते जन्माची शिदोरी,
सरतही नाही, उरतही नाही"

Anagha said...

:) संकेत, हे घरी अगदी चालतं बरं का...आई, आईडा...ममा...ममाडा...काय पण हाक मारतात बाईसाहेब ! :)
तुझी आई म्हणते ते किती खरं आहे रे...खरंच खूप छान वाटत...नाहीतर घर सुनं सुनं.
आता आईला अगदी काळजी वाटत असेल ना तुझी...लेक नीट न खाताच बाहेर पडतो म्हणून ?
" आई असते जन्माची शिदोरी,
सरतही नाही, उरतही नाही"... :)

आभार रे. :)

सौरभ said...

lol... वाह वाह वाह!!! लौली... एकदम बढिया पोस्ट.. एकदम Banana smile हा... :D