नमस्कार

नमस्कार

Pages

Wednesday 31 August 2011

आभूषण प्रेमाचे...

सख्यांनो,
कानाच्या पाळीहून मोठी सुवर्ण कर्णफुले...नाजूक मानेला घट्ट गळाभेट करून बसलेला ठसठशीत हार....लांबसडक बोटांना उठाव देणाऱ्या सुवर्णाच्या अंगठ्या...

...इतके सर्व दागिने बँकेच्या लॉकरमधून यातायात करून काढून आणावे...तासभर मेहेनत करून अंगावर चढवावे...दर्पणाने पहिली दाद द्यावी...सख्यांच्या नजरेत उगाच एक मत्सराची झाक उमटावी...

...आणि हे सर्व उपद्वयाप करून शेवटी ज्यावेळी निद्रादेवीपुढे नतमस्तक व्हावे त्यावेळी हे सर्व उतरवून ठेवणे भागच...हे सर्व अंगावर लेऊन निद्रादेवीची आराधना केली तर ती प्रसन्न होते काय ? कशी होणार ? थोडी मान वळवली तर टोकेरी कर्णफुले गालाला टोचणार...हार वेडावाकडा मानेला बोचकारणार...एखाद्या अंगठीने झोपेत डोळ्याला जखम न केली म्हणजे मिळवली...

...उग्र सोन्यापेक्षा त्या निरागस निसर्गाची मदत घेऊन आपण ही आभूषणे बनवली तर ? महागड्या सोन्याच्या दागिन्यांचा हट्ट जिवलगापुढे केलात तर कदाचित वक्रदृष्टीच पदरी पडेल...परंतु त्याच्यापुढे अंगणात विराजमान झालेला, शुभ्र नाजूक पिवळी छटा असलेला टपोरा चाफा आणून ठेवा...आणि मग करा मागणी शुभ्र हिऱ्यांच्या मधोमध, चपखल बसलेल्या पुष्कराजाच्या अंगठीची...

घ्या हातात तो चाफा...


उमटवा एकेक नाजूक नखक्षत पाकळ्यांवर...


वळवा एकेक पाकळी देठाकडे...




आता हळुवार त्या नखक्षतांतून येऊ द्या तो देठ बाहेर. अगदी नाजूकतेने...बरं का...हे जिवलगाला सांगायला मात्र विसरू नका...नाहीतर मग येईल तुटकीमुटकी अंगठी हातात...


फूल नाजूक मग त्याची हाताळणी हवी नाजूक...हो ना ?

झाली आपली मुद्रिका तयार...काही क्षणांत...नाजुकशी...हलक्या पीत छटेची...




...सीता...शुभ्र दागिन्यांनी सजलेली...
काय श्रीरामाने ओवल्या असतील त्या माळा...तो गजरा...ती कर्णफुले ?
तिच्या चेहेऱ्यावर पसरलेल्या मंद स्मितहास्यात, कुठे आहे वनवासाची खंत ?
श्रीरामाची साथ...श्रीरामाचे प्रेम...
त्याची तुलना काय सुवर्णाशी...?

(श्रीराम सीता व लक्ष्मणाचे मनोहारी चित्र, जालावरून साभार...)

29 comments:

लिना said...

लहानपणी फार आवडायचं हे करायला ..
परत एकदा आठवण झाली
धन्स..
असाच परवा 'टाकळा' पाहिल्यावर त्याचा हार आठवला होता..

rajiv said...

काय मस्त फोटोज टाकलेत ...आहा :!! रम्य ते बालपण....आम्ही पण खूप खूप खूप वर्षांपूर्वी कानात हे फूल घालून उनाडत असायचो !!

हेरंब said...

आधीची कमेंट गेली की नाही ते कळलं नाही. म्हणून पुन्हा टाकतोय.. आधीची आली असेल तर ही उडवून टाक.

आता फुलांच्या आणि दागिन्यांच्या पोस्टवर आम्ही कसली कमेंट देणार?? हजेरी लावून जातो इतकंच ;)

Anagha said...

लिना, मज्जा ना ? :)

हा टाकळ्याचा हार कसा बरं करायचा ??
प्रतिक्रियेबद्दल आभार हं. :)

Anagha said...

धन्यवाद राजीव ! :)

Anagha said...

हेरंबा, असा काय ? अरे, जर तू नाही बघितलंस...वाचलंस...तर तुमच्या राणीसरकारांना कोण बनवून देणार हे दागिने ?! ;) :)

भानस said...

आजोळी देवचाफ्याचे, गुंजांचे, हिरव्या चाफ्याचे आणि या आपल्या सदाबहार चाफ्याचे झाड होते. हार काय, कानातली, अंगठ्या... खूप आठवण आली गं. आजीलाही सगळे हट्टाने घालायला लावायचे मी. :):)

इथे येताना हळूच एक फांदी लपवून आणावीच म्हणतेय... :)

Anagha said...

पेणला दारी आहे गं चाफा...आता तू आलीस की जाऊ आपण मस्त !!! अंगठ्या करायला ! :) :)
हेहे ! मला दिसलीसच तू...एअर पोर्टवर....फांदी घेऊन !!! :D

Suhas Diwakar Zele said...

जबरी...मस्त दिसतेय !!
तुम्हा क्रियेटीव्ह लोकांच काही नेम नाय बौ, लगे रहो :) :)

Gouri said...

मस्तच ग ... एकदम चाफ्याच्या अंगठ्या, जुई आणि एक्झोराची फुलं कानात घालायचो ते आठवलं!
फोटो सुंदर! आणि पोस्ट एकदम पटली, कारण दागिने प्रकाराचा मला जाम कंटाळा आहे - एवढे महागाईचे घ्यायचे आणि संभाळत बसायचे ... नस्ती कटकट!

Anagha said...

अगदी अगदी गं गौरी !
एक्झोरा म्हणजे ती मस्त रंगीत जंगली फुलं ना ?? हो हो ! आम्ही पण ती कानात अडकवून हुंदडायचो ! :D

Anagha said...

सुहास ! लगे राहो अनाबाय ! :p :D

Raindrop said...

ye chafe wale haath se kisi ko laafa maar ke dekh....sugandhit slap khayla kaay majja :) very sweet post :)

Anagha said...

हेहे ! वंदू, तो इतका छान हात अजिबात माझा नाहीये ! :)

सौरभ said...

वाह वाह वाह अरे.... कस्लं भारी!!! सॉल्लिड बरं का... असं काही करुन मुकुट बनवता येतो का???

BinaryBandya™ said...

लहान होतो तेंव्हा ही अंगठी करायचो की :)

Gouri said...

अनघा, एक्झोरा जंगली नसतो ग ... http://en.wikipedia.org/wiki/Ixora इथे बघ. ही फुलं अगदी कानात घालायलाच बनवलेली असतात ... लांब, बारीक आणि फर्म देठ आणि चार पाकळ्यांचं कुडीएवढं फुल!

Anagha said...

माझ्या डोक्यावर ठेवायला ना सौरभा ?! देते हा बनवून मी तुला मुकुट ! :D

Anagha said...

अरे व्वा ! बंड्या...मला वाटलं की आमचे मुलींचेच उद्योग आहेत ! :D

Anagha said...

कळलं गं गौरी ! अगं आमच्या ऑफिसच्या पायवाटेवर ना हे झाड आहे ! अगदी भरगच्च फुलांचे घोस लगडलेत आणि झाड नुस्तं लवंडलय...मस्त डोकं खाली करून चालत पुढे यायला लागतं ! :D

(तू मला फुलझाडांची माहिती देऊनच सोडणार बहुतेक ! :D )

अपर्णा said...

मस्तच ग...

On a side note,

गौरी आणि तू मिळून आम्हा लोकांना सर्वज्ञानी करून सोडाच आता...:)

Anagha said...

:) अपर्णा, हा ! म्हणजे मी काहीतरी बावळटासारखे प्रश्र्न विचारेन आणि ह्या आपल्या गौरी मॅडम त्यावर सोप्प्या शब्दांत उत्तर देऊन आपले अज्ञान दूर करतील ! :D

BinaryBandya™ said...

म्हणजे ...
अगदीच लहान असताना :D

sanket said...

आयला, हे नवीनच आहे मला ! मस्त माहिती, भविष्यात कामी येईल. :P
"नखक्षत " शब्द आवडला ! तू पाडलायस का तो शब्द ? की जुनाच ?

Anonymous said...

अ-प्र-ति-म :)

(आज अमितला ही पोस्ट वाचण्यास/ पहाण्यास देण्यात येइल, आणि बरोबर तुझ्या मेल आयडीही देते.... तूलाच डायरेक्ट ओरडू दे तो की आधिच ही बाई (मी) खूळचट आणि त्यात तू नवनव्या आयडिया दे ;) )

Anagha said...

हेहे ! नाही रे संकेत ! इतकी कुठली माझी 'औकात'? :)
म्हणजे फुलांचे दागिनेच खपवायचा प्रयत्न दिसतोय ! ह्म्म्म. :)

Anagha said...

तन्वे, :D

Shriraj said...

सुट्टी नंतरचा पहिला दिवस या पोस्टने व्हावा... काय सुंदर योग आहे... आभार अनघा!!!

Anagha said...

श्रीराज, आज खूपशी चाफ्याची फुलं घेऊन जा घरी ! लाडक्या राणीसरकारांसाठी ? :):)
(आणि ह्याचा अर्थ असा नाही होत की पुढची पोस्ट वाचशील ती अशीच आनंदी असेल ! :( )