नमस्कार

नमस्कार

Pages

Monday 8 August 2011

सखा

तो दिवस तसाच होता. सूर्य डुबून गेला होता त्याच्या अदाकारीचा रास्त मान राखित चंद्र अजूनही विंगेत थांबून होता. पृथ्वी पोरकी. ना सूर्य ना चंद्र. असे काहीसे. मी जशी एखाद्या भव्य नाट्यगृहात एकटीच. समोरील रंगमंचावरून त्याने नि:शब्द निघून जावे आणि असे थरारक नाट्य मागे ठेवावे. हे असे अजून दुसरा कोण करणार. एकमेव रंगकर्मी.

मरीन ड्राईव्हचा कट्टा. समोर करडा समुद्र. खळाळता. मी एकटीच बसले होते. तसेच मी ठरवले होते. ना कोणाला फोन केला. ना फेसबुकवर स्टेटस टाकलं. पुढचे काही क्षण फक्त माझेच मला हवे होते. कारण काहीही नाही. कधी असे केले नव्हते आणि हेच कारण मला पुरेसे होते. केशरी निळं आकाश करडं क्षितीज. क्षितीज किती खोटं. किती ती दिशाभूल. कोणी समजा उतरले पाण्यात...पोहून जाऊ त्या क्षितिजाला हात लावून लगेच परत येऊ...तर....मृगजळ...फसवणूक...

"काल जे बोलत होतीस...मला नाही पटलं." मी दचकून मान वळवली. करड्या निळ्या रंगांचा पट्यापट्यांचा पायजमा, उधळलेले बेभान कुरळे केस, सैलसा कुर्ता करड्या रंगाचा. सावळ्या रंगाचा, चाळीशीच्या आसपासचा तो. माझ्या अगदी जवळ एक पाय वर घेऊन बसला होता. कोण हा ? कुठून आला ? मला कसा दिसला नाही ? मी थोडी दूर झाले. चेहेरा ओळखीचा नव्हता. "कोण तू ?" माझ्या स्वरातील भय मला जाणवले. अजून अंधार नव्हता पडला. तोच एक धीर होता.
"ते नाही महत्त्वाचं." कपाळावर झेपावणाऱ्या बटा मागे सारत तो म्हणाला. नजर भेदक. आरपार.
"पण मी नाही ओळखत तुला. प्लीज जा पाहू इथून !" मी म्हटलं.
"माझं ऐकून घे. मग ठरव हाकलवून द्यायचं की ह्यापुढे आपण एकत्र राहायचं..."
चष्मा काढून मी हातात धरला. त्यावर सूक्ष्म बाष्प जमा होत होते...समोरचे धूसर होत चालले होते. तेव्हढाच एक क्षण मिळाला मला विचार करायला. "डोकं फिरलंय का तुझं ?"
समुद्रावर नजर स्थिर करीत तो बोलू लागला. जसा काही माझा प्रश्र्न कानीच नाही पडला.
"तू म्हणालीस मी कमी आहे. काल तुझ्या मैत्रिणीशी बोलत होतीस." आता गोंधळ आणि चीड दोन्ही एकाचवेळी डोक्यात पिंगा घालू लागले होते. परंतु, पुढे नाही ऐकले तर फक्त गोंधळ वाढेल हे मात्र जाणवले.
"कोणालाही कमी लेखणे वाईट. दुसऱ्याच्या मोठेपणाची जाणीव ठेवणे चांगले. परंतु, त्यासाठी मला कमी लेखायची गरज नव्हती." वारा त्याच्या चेहेऱ्यावर आपटत होता. त्याचे कुरळे केस मागे फेकले गेले होते. भव्य कपाळ, बुद्धिमत्ता दर्शवते. मी एकही शब्द उच्चारला नाही. तो कोण आहे हे अजूनही कळले नव्हते. मग मी काय बोलावे ?
"जर मी कमी पडत आहे तर मग मी काय करावे अशी तुझी अपेक्षा आहे ? काय मी अजून स्वत:ला बलशाली करावे ? मग तू खुष होशील ? पण तुझा काय भरवसा ? जेव्हाजेव्हा मी माझी सर्व शक्ती पणाला लावली, त्या त्या वेळी तू असह्य होऊन आक्रोश केलास...तेव्हा हे नाही लक्षात घेतलेस, तो मीच होतो ज्याच्यामुळे तुझी शक्ती वाढत होती..."
त्याचा गूढ गंभीर आवाज...त्याला खोल समुद्राच्या गाजेची साथ...वाढत चाललेला अंधार. काय समजावे ?
वाऱ्यावर उडणारी माझी ओढणी मी घट्ट लपेटून घेतली. तेव्हढाच आधार. अकस्मात ओठांवर खारट चव लागली. मी गालावर हात फिरवला...नव्हते कळले का कधी डोळे भरून आले. काय समुद्राने खारे थेंब उडवले माझ्या डोळ्यांनी ते टिपले ?
काही क्षण तो थांबला. लाटा किनाऱ्यावर आपटत होत्या...कोणी जसे माझा दरवाजा ठोठावत होते.
"हे तुला सांगावेसे वाटले...म्हणून आलो. मी जसा आहे तसेच तू मला स्वीकारावेस. असे मला मनापासून वाटते..." तो उठू लागला. मी त्याचा हात धरला. हात कणखर, खंबीर.
"मला कळतंय. माझं चुकलं. काल ती कोणाचं दु: सांगत होती...अतीव दु:...कोणी कसे सहन करावे...ते अलोट दु: ऐकून वाटले...ह्यापुढे माझे दु: किती तोकडे ?"
...माझा हात अजूनही त्याच्या हातात होता. त्याने सोडवून घेतला एकटक समुद्रावर लावलेली नजर वळवून त्याने प्रथमच माझ्याकडे बघितले.
"हे एव्हढेच तुला सांगण्यास आलो होतो. दुसऱ्याचे दु: ना तुझ्या दु:खाहून कमी तसेच ना ते तुझ्या दु:खाहून मोठे. त्यात तुलना का करावी...जसे आहे तसेच आपले मानावे...त्याचा मान राखावा....त्यातून आपण घडत जातो ह्याची जाण ठेवावी...इतकेच..."
आता मीच पुढे झाले...त्याच्या जवळ सरकले. त्याच्या खांद्यावर डोके ठेवले हलकेच डोळे मिटून घेतले. किती मला हलके वाटले.
माझ्या त्या प्रेमळ दु:खाने माझे कपाळ हलकेच थोपटले.
कोण जाणे किती वेळ गेला. डोळे पुन्हा उघडले तेव्हा पूर्ण अंधारून आलं होतं. माझ्या बाजूला कोणी नव्हतं...
राणीचा हार चमकत होता. मुंबई वेगात हलत होती. ती रात्री अधिक वेगात धावते असे मला बरेचदा वाटते.
मी तिथून निघाले.
माझे दु: माझ्या मनात गुडूप झाले.
माझं दुखावलेलं दु:ख.
माझ्या सुखाच्या जोडीला.

35 comments:

rajiv said...

.".........त्यातून आपण घडत जातो ह्याची जाण ठेवावी..
माझ्या त्या प्रेमळ दु:खाने माझे कपाळ हलकेच थोपटले ".
.
.
माझे दु:ख माझ्या मनात गुडूप झाले.
माझ्या सुखाच्या जोडीला.

अप्रतिम !!
लेखणी आहे का बावन्नखणी ....?

Gouri said...

सु रे ख!
एकदम ‘वपु’ मोडमध्ये आणि मूडमध्ये लिहिलेलं वाटातंय :)

लिना said...

अप्रतिम

विनायक पंडित said...

अनघा! अ फ ला तू न! काय बोलू? (ज्याम आवडलं तुमचं दु:ख! असं म्हणायचा मोह होतोय!)शब्द न शब्द, वाक्य न वाक्य अर्थपूर्ण! एक समग्र अनुभव दिलात! (नेहेमीपेक्षा तरल):D

हेरंब said...

>> सु रे ख!
एकदम ‘वपु’ मोडमध्ये आणि मूडमध्ये लिहिलेलं वाटातंय :)

अगदी अगदी !!

Raindrop said...

am a little confused but I assume you have given your dukh a human form and are talking about it...mala thoda zad gela he likhan but am it is quite a sensitive portrayal (guessing from other comments)

Anagha said...

:) आभार राजीव !

Anagha said...

गौरी...एक विचार आला मनात..आणि लिहायला बसले तर त्या विचाराची अशी गोष्ट झाली ! :)

Anagha said...

लिना, धन्यवाद गं. :)

Anagha said...

विनायक, माझं दु:ख एकदम 'हॅन्डसम' आहे ! :p
आभार हं. :)

Anagha said...

हेरंबा... :)

Anagha said...

Vandu, I had thought of that...I knew this one might be a bit difficult for you to understand... :)

And you have got it right !
My friend...माझं दु:ख...makes me stronger day by day...
:)

Trupti said...

दुखा कडे पाहण्याचा असाही angle असू शकतो...खरेच heart touching.....too good angha di

Prof. Narendra Vichare said...

अनघा, तुझ ह्यांड्सम दु:ख मनात गुडूप होऊ न देता समोरच्या समुद्रात बुडवायला काय घेशील .... फक्त बोलायची खोटी...

Anagha said...

तृप्ती, तू मारलेली ही हाक मला खूप आवडून गेली...अगदी डोळ्यात पाणी येण्याइतकी. :)

Anagha said...

:) सर, इतकी वर्ष ज्याने कधीही तक्रार न करता साथ दिली त्या माझ्या हॅन्डसम दु:खालाच समुद्रात बुडवून टाकू ? उपकाराची जाण न ठेवणे होईल ना मग ते ? काय तुम्हीं हे जाणत नाही ?
:)

Shriraj said...

गूढ, पण रम्य... तुझ्यासारखं तूच लिहू शकतेस...

Prof. Narendra Vichare said...

अनघा, काही लोकांना हिंस्र प्राणी सुद्धा पाळायला आवडतात असे कुठे तरी वाचले होते. हे प्राणी लहान असे पर्यंत गोड वाटतात, नंतर...मात्र त्यांना किती कुरवाळायचे हे सुद्धा पाहायला हवे.... फेसबुक वर माझ्या लिंक वरील सिंहांची दोन परस्पर विरोधी क्लिपिंग्ज पाहिलीस का ? तुझा सिंह दोन पैकी कोणत्या क्लिपिंग मधला...?

भानस said...

गौरी +१.

दोन वेळा वाचली पोस्ट मी आधीही. वाचता वाचता सुखं आणि दु:खाची रेषा धुसर होऊ लागलेली. मग निमुटच राहीले. आज पुन्हा आले गं.

काय म्हणू... अप्रतिम की बयो सांभाळ स्वत:ला... जे त्या त्या वेळी योग्य वाटेल ते तूच समजून घे.

Trupti said...

तू लिहिलेले इतके जवळ चे वाटते कि मला च कळले नाही मी अनघा जी वरून अनघा दि वर कशी आले...thanks...:)

सारिका said...

>> सु रे ख!
एकदम ‘वपु’ मोडमध्ये आणि मूडमध्ये लिहिलेलं वाटातंय :)

अगदी अगदी !!

realy....nice

Anagha said...

ह्म्म्म. गूढ पण रम्य. धन्यवाद श्रीराज. :)

Anagha said...

सर....माझा सिंह त्या त्या वेळेच्या गरजेनुसार. :)

Anagha said...

:) भाग्यश्री, श्रीराज म्हणतो ना तसं...गूढ आणि रम्य. :)

Anagha said...

सारिका बाई, बऱ्याच दिवसांनी आलात... :)
धन्यवाद गं. :)

सौरभ said...

वाह वाह वाह... लौली एकदम... खास आहे..

अपर्णा said...

वेगळंच आहे ग हे पोस्ट...नि:शब्द

Anagha said...

सौरभ... :)

Anagha said...

अपर्णा.... :)

BinaryBandya™ said...

अप्रतिम ..

Anagha said...

बंड्या, आभार. :)

Suhas Diwakar Zele said...

वाह ज ह ब ह र ह द ह स्त ह...

कसं सुचतं गं तुला हे, मस्तच !!

Anagha said...

धन्यवाद सुहास ! :)

इंद्रधनु said...

खूप आवडलं. असं काही, इतकं वेगळं अन मनाला भिडणारं फक्त तुम्हीच लिहू शकता.

Anagha said...

:) आभार इंद्रधनू. :)