नमस्कार

नमस्कार

Pages

Thursday, 14 July 2011

बात सिंपलसी...

मी नंदुरबारचा शिरीष आहे.
मी झाशीची राणी आहे.
मी शिवाजी आहे.
मी टिळक आहे.
मी सावरकर आहे.
महत्त्वाचे म्हणजे, मी अजून जिवंत आहे.
त्याला कारण आहे.
मी तू आहे.
मी तो आहे.
मी ती आहे.
स्वर्ग मी आहे.
पाताळ मी आहे.
आणि महत्त्वाचे म्हणजे, मी अजून जिवंत आहे.
कारण सर्वनाशाला मीच जबाबदार आहे.
...तो बात सिंपलसी है.
पुछना बस इतनाही है...
मेरा नंबर कब आएगा...?
पुछना बस इतनाही है !

31 comments:

सुहास झेले said...

:( :(

rajiv said...

आणि महत्त्वाचे म्हणजे, मी अजून जिवंत आहे.
कारण सर्वनाशाला मीच जबाबदार आहे.
.
.
पुछना बस इतनाही है...
मेरा नंबर कब आएगा...?


काळजाला हात घालणारा आशय ....
बस्स्स , एव्हडेच !!

राजे - राज जैन said...

:( :(

alhadmahabal said...

सट्टाक...

Aakash said...

"साहब, आदमी मरता हैं, तो उसका क्या होता हैं?" < ची परत एकदा आठवण झाली.

Raindrop said...

aham...karan ekach...aham!

हेरंब said...

:(((

Prof. Narendra Vichare said...

मेरा नंबर कब आएगा...? ऐसा पूछना भी मना है...अजून जिवंत आहोत हे काय कमी आह?

श्रीराज said...

अनघा, आपण 'युज टू' झालोय का गं या सगळ्याला? कळत नाही काय प्रतिक्रिया द्यावी...

श्रीराज said...

पण लिहिलयस ते अगदी आमच्या मनातलं...

yogik said...

हे सगळे घडत होते तेव्हा दुसरीकडे मी एका काकांना खांदा देत होतो....मागे लोक राम नाम सत्य चा गजर करत होते....तिथेच 'बातमी' कळाली............
...अचानक राम नाम सत्य च्या ऐवजी मनाने राम- राम- रक्त- रक्त चा rhythm पकडला....

BinaryBandya™ said...

माणूस कशालाही "used to " होतो नाही ..
श्या ...

Vinayak Pandit said...

:( अगदी पटलं!

भानस said...

जिंदगी इसीका नाम हैं...
जैसे तैसे उसे ढोना
बस ये अपना काम है
हे मन, तू न पूछ सवाल
अब जो भी है बस यही हैं...

:(:(:(

सौरभ said...

वाह वाह!!! यह इतना नही आसान, इतना तो समझ लिजिये... एक बम का धमाका है और बिखर के जाना है...

अनघा said...

काय करायचं तरी काय सुहास आता ?! हताश !

अनघा said...

राजीव...आपण नाही सांभाळू शकलो आपला देश...

अनघा said...

राज...आपल्याच कर्माची फळं आहेत ही...भोगवृत्ती अफाट वाढलेली आहे...त्याग ही कल्पनाच मुळी नाहीशी झालेली आहे...

अनघा said...

मी कपाळावर हात मारून घेतला...ही बातमी ऐकून....आल्हाद...कसली वाट लावलीय आपण आपल्या देशाची !

अनघा said...

आकाश...आज एक मित्र म्हणाला...अरे आपण विमान अपघातात मेलो तरी ठीक आहे रे...हे असं...कोणीतरी, एका क्षणात आपले तुकडे तुकडे करून कुत्र्याला घालण्यापेक्षा !

अनघा said...

काय बोलणार वंदू ?!

अनघा said...

फक्त अश्रू ढाळू शकतो ना हेरंबा आपण ?

अनघा said...

सर..नक्की काय उजेड पाडतोय जिवंत राहून...? म्हणजे...'मी' काय उजेड पाडतेय जिवंत राहून...?

अनघा said...

श्रीराज...हे पुढारी आपले सगळे...
पण मग आपण का नाही कधी राजकारणात भाग घेऊन काही निखळ काम करू शकलो ?

अनघा said...

योगिक !!!!!!! भयानक...काय बोलणार ?

अनघा said...

बंड्या...'रंग दे बसंती', 'वेनसडे', जुना 'शहीद'...सात हिंदुस्तानी..हे सगळे चित्रपट आठवतात...आपण सगळे मुडदे कधी झालो ?आणि मग हे अतिरेकी मुडद्यांना का मारतायत ? की त्यांना माहितेय...
आपण मेलो तरी कुठेही काहीही बिघडत नाही...
उलट 'ते' अधिकाधिक जिवंत होतात...
आणि आपले मरण ते त्यांना अधिकाधिक बळ देतं...मानसिक...
म्हणजे हे असं मारून देखील आपला काहीही उपयोग नाही आपल्या देशाला..उलट आपले मरण हे अतिरेकींच्याच फायद्याचं !

अनघा said...

विनायक...आपला देश हा 'नेत्यासाठी भिकारी' झालेला आहे...

अनघा said...

भाग्यश्री, पुन्हा कधीतरी निवडणुका येतील...दारी ह्या पुढाऱ्यांची माणसं मताची भिक मागायला उभी रहातील...कोणाला द्यायचं मत ?
आपण उघडे पडलेलो आहोत...जगापुढे...

अनघा said...

सौरभ...हे असे मरण..म्हणजे 'देहदानाचे पुण्य' देखील नशिबी नाही....

Raindrop said...

I know one thing that is going wrong....we are criticizing politics/police/government so much that none of the good guys want to go there....nobody (except few of the lower middle class) is inspiring their kids to join police/armed forces or prepare for IAS or enter politics. Everybody wants to be in Private sector jobs.

Obviously someone has to take up the job of running this country. If not the good guys then the bad guys!

अनघा said...

अगदी बरोबर वंदू. मी हेच श्रीराजला म्हटलंय...