नमस्कार

नमस्कार

Pages

Saturday, 25 June 2011

डोस्कं म्हंजे तापेय !

परवा, मी लिहून बसले. ब्लॉगवर टाकून बसले. सगळंच खाडखाड केलं. म्हणजे आलं डोक्यात ते उतरवून टाकलं. कधीकधी अति होतं. डोळे उघडल्यापासून डोळे पुन्हा मिटेस्तोवर जेव्हा सगळीच ठिकाणे रणांगण होऊन जातात तेव्हां हे असं काहीतरी होतं ! एकही फुलबाग नाही. सगळीकडे युद्धं !

पण मला कळलंय...हे असं काहीतरी लिहून बसलं ना की मलाही छान नाही वाटत ! म्हणजे मला घाबल्यासारखंच होतं ! प्रतिक्रिया आली तरी भीती आणि नाही आली म्हणूनही भीतीच ! त्यामुळे हे असं काही लिहिणे हे अजिबात चांगलं नाही ! मनाला आणि शरीरालाही धोकादायकच !

म्हणूनच कालपासून ताप आलाय वाटतं मला !
:)

12 comments:

भानस said...

म्हणूनच मी शांत बसले होते. :) तो ताप तसा खाडखाड केलास म्हणून काही गेला नाही. उलटा चोरपावलांनी पुन्हा घरात घुसलाच.

आता तू मुकाट गप्प पड मी थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवते. :D:D

rajiv said...

साचून राहिलेल्या गोष्टींचा निचरा होणेच आवश्यक व त्यासाठी लिखाण ही...!
नाहीतर साचून साचून त्याचा तणाव वाढला तर ..... कशाचाच ताळमेळ उरणार नाही :(
आणि आपल्याजवळचे वाटून टाकावेच न म्हणजे त्याच भार पण हलका :)
तेंव्हा .... लिखाण .. मनात येईल ते व जेंव्हा येईल ते .. चालू राहू द्या .. !!

सौरभ said...

डोस्क तापलं... छान झालं... अंड फोडुन टाका, ऑम्लेट तयार. डोस्क तापलं... छान झालं... त्यावर पाणी उकळून चहा बनवा. डोस्क तापलं... छान झालं... त्यावर चपात्या भाजून घ्या...
तुम्ही तापलेल्या डोक्याने काहीबाही लिहलं... आम्ही थंड डोक्याने काहीबाही कमेंटलं... हिसाब फिट्टूस्स... येऊदे नविन पोस्ट... तुम्ही पोस्टायच सोडू नका, आम्ही कमेंटायचं नाही सोडत... :)

आनंद पत्रे said...

आज स्मायली... :)

सौरभची कमेंट लय भारी

हेरंब said...

मी चुकून "डोस्कं म्हंजे तपेलं" असं वाचलं आधी ;)

सौरभ :DDDD

अपर्णा said...

हेरंबची कमेन्ट वाचुन मला तपेलं आपलं टपली आठवली...हेरंब तू भेटलास तेव्हा माझ्या वाटची मारलीस का रे...
आता हे काय म्हणून विचारु नकोस...मी सध्या टोटल कोकाकोका मूड मध्ये हाये.....
रच्याक, झालं का थंड??? :ड

अनघा said...

भाग्यश्री, अगं तीन दिवस आडवी होते तापाने. आज जरा बरं वाटलंय म्हणून आलेय हापिसात ! :)
आभार गं ! थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवल्याबद्दल ! :)

अनघा said...

राजीव. :)

अनघा said...

सौरभ !!!!!!!!!!!!!!!! कुठून सुचतं हे सगळं तुला ?!
:D :D :D

अनघा said...

सौरभच्या कमेंटमुळे का होईना तुझी स्माईली बघून मला खूप बरं वाटलंय हा आनंद ! :)

अनघा said...

हेरंबा ! ते पण बरोबरच आहे ! 'डोस्कं म्हंजे तपेलं!' :D :D

अनघा said...

अपर्णा, ताप येऊन गेला आणि आता आज थोडं झालंय थंड !
अगं, आणि सगळ्या तुमच्या प्रतिक्रिया वाचून ते तसंही होतंच म्हणा थंड ! :)
आभार गं.