नमस्कार

नमस्कार

Pages

Monday, 13 June 2011

मुकी भाषा

दुपारचे साडेतीन वाजले होते. उन्हाळा रणरणता होता. महीची शाळा सुटायची वेळ झाली होती. मही आठ वर्षांची. शिडशिडीत सावळी. एका जागी स्थिर उभे राहिलो तर सगळीकडे फारच शांतता पसरेल असा तिचा काहीसा समज. आणि आजूबाजूला उडणारी फुलपाखरे का कधी स्थिर असतात ? इथे तिथे चुळबुळणारा ससा का कधी शांत असतो ? मग महीने का बरं बसावं शांत ? मही तर एक हरीण !

मोजून पंधरा मिनिटे लागतात स्कूल बसला, तिच्या घराजवळील ठरलेल्या जागी पोचायला. बाजूलाच उभे एक मध्यम उंचीचे झाड. त्याच्या कृपासावलीत, मांडीवर पुस्तक घेऊन वाचत बसली होती मावशी. हरणाची वाट बघत. चांगली आधीच येऊन बसते मावशी. उगाच हरीण आधी नको पोचायला ! झाड छोटं म्हणून त्याची सावली छोटी. खाली आडोशाला मावशी जरी बसलेली असली तरीही थोडे पाऊल सावलीच्या बाहेरच डोकावत होते. आणि जेव्हढे पाऊल सावलीबाहेर...तेव्हढेच ते नेमके लालबुंद होऊन जाते. कंड सुटू लागते. मावशीने पुस्तकातून डोके वर काढले व दूर नजर टाकली. काळ्याकुळकुळीत तप्त रस्त्यावर पिवळ्याधमक स्कूलबस दिसू लागल्या होत्या. महीची बस ४२३ क्रमांकाची. तीही दिसू लागली म्हणून मग मावशी उभी राहिली. थोडी पुढे सरकली. बस थांबली व टुणकन उडी मारून हरीण बाहेर पडले. नेहेमीसारखेच मावशीने हात पसरले. रोजच्या मिठ्या व रोजचे पापे. काही गोष्टी रोज केल्या म्हणून त्यातील गोडी थोडीच संपते ? पण कुठले काय ! आज बाहेरील उष्म्याने हैराण झालेले हरीण उडी मारून त्या झाडाच्या आडोश्यालाच उभे राहिले. पाठीला शाळेची फुगीर धोपटी, हातात खाऊचा डबा.
काय झालं ? मावशीने विचारलं.
कित्ती गरम होतंय मावशी ! इथे येऊन बघ ! किती थंड आहे !
तिथेच तर बसले होते मी इतका वेळ पुस्तक वाचत ! मावशीने म्हटलं.
पण मग आता मला सावलीतून बाहेरच नाही ना येववत !
अगं, असं कर त्या सावलीलाच घेऊन चल तुझ्याबरोबर. नाही का ?
हा ! चालेल !
महीने पाठीवरील धोपटी व कपाळावर झेपावलेल्या बटा मागे ढकलल्या आणि सावली खेचायला सुरुवात केली. पण सावली कुठली ऐकायला ! ती ना तसूभर हलली.
मावशी ! नाही ग येत ती !
मही ! अगं, त्या झाडाला तू विचारलंस तरी का त्याची सावली घेण्याआधी ? न विचारताच खेचू लागलीस ! मग बरं देईल ते झाड ?
ओss ! हा गं ! पातळश्या जिवणीचा चंबू झाला.
झाडा झाडा...मी आजचा दिवस तुझी सावली घेऊ का ? किती ऊन आहे, तूच बघ ना ! झाडाशी हरणाचा संवाद. आपण इतक्या गोड आवाजात विचारलंय म्हणजे झाड आपल्याला त्याची सावली देईलच म्हणून महीने पुन्हा सावली खेचायला सुरुवात केली ! पण छे !
मावशी ! बघ ना ! नाही येत सावली ! महीला आता आपण झाडाशी करत असलेल्या संवादात गंमत वाटू लागली होती.
अगं, तू आधी न विचारताच खेचायला सुरुवात केलीस ना म्हणून थोडं नाराज झालं वाटतं झाड आपल्यावर !
ह्म्म्म. मग आता ? महीने मान वर केली व आपले मिष्किल डोळे झाडाकडे लावले.
काही नाही ! माफी मागून टाक !
मही सावलीबाहेर पडली. घराकडे चालू लागली.
मावशी अजून तिथेच उभी.
सॉरी झाडा ! महीने मान वेळावून मागे झाडाकडे बघितले. मनमोकळी माफी मागून टाकली.
मग कुठे मावशी पुढे सरकली आणि खाऊचा डबा महीकडून आपल्या हातात घेऊन दोघी दोघी बागडत त्यांच्या घराच्या दिशेने चालू लागल्या.
आज शाळेत कायकाय घडले हे ऐकण्यात मग ते कडक ऊन देखील नरम झाले.

नाहीतरी, न विचारता कोणाकडून काही घेऊ नये हे तर निरागस महीला ज्ञात होतेच. फक्त आज त्या 'कोणा'ही मध्ये निसर्गाची देखील भर पडली.
तोही बोलकाच आहे...नाही का ? फक्त सगळ्यांनाच त्याची बोली कळतेच असे नाही...

...आणि काही भाषा शिकवून थोड्याच येतात ?

28 comments:

Yogini said...

lai bharee.. :-)

alhadmahabal said...

great!
awadesh

सुहास झेले said...

वाह वाह...सुंदर गं!!

मोजक्या आणि हळव्या शब्दात मांडली आहेस ही मुकी भाषा... सिम्प्ली सुपर्ब !!

अपर्णा said...

आई ग्ग...कसलं भन्नाट आहे गं....आमचा ससा आजकाल शाळेत हे सॉरी, थ्यॅंकु शिकुन येतो आणि घरी (योग्य वेळ साधुन) मग आमच्यावर त्याचा प्रयोग करतो न..त्याला ही भाषा पण शिकवायला हवी...मस्त मस्त मस्त....महीची एक पापी घ्यावीशी वाटतेय मला...

श्रीराज said...

तरीच बोललो अनघा गेली कुठे...हे चालू होतं काय!!! हम्म्म्म ... वेळ घेतलास पण मस्त लिहिलं आहेस :) आवडलं

लिना said...

खूप गोडड ड ड ड ड

Raindrop said...

Saki +1000 :) soon u will be the greatest short story writer in marathi :)

अनघा said...

आभार योगिनी. :)

अनघा said...

:) आल्हाद, धन्यवाद !

अनघा said...

सुहास, आनंदाचे छोटे छोटे क्षण...त्यावरच तर उभं रहातं ना आयुष्य... :)

अनघा said...

अपर्णा, थ्यॅंकु थ्यॅंकु !!!! :D
ससा आता भन्नाट काय काय बोलत असेल ना ?

छोट्यांना बघ पटकन कळून जाईल ही भाषा ! हो ना ? :)

मला पण वाटतेय महीची पापी घ्यावीशी ! इथे बसून ! :( :)

अनघा said...

:D हो ना श्रीराज ! ही मस्त ड्युटी चालू होती !
आभार रे ! :)

अनघा said...

आभार लीना ! :)

अनघा said...

वंदू !!! :)

हेरंब said...

सही.. आल्या आल्या एका खणखणीत चौकाराने सुरुवात :) मस्तच..

>> नाहीतरी, न विचारता कोणाकडून काही घेऊ नये हे तर निरागस महीला ज्ञात होतेच. फक्त आज त्या 'कोणा'ही मध्ये निसर्गाची देखील भर पडली.

हे खुपच छान.

अनघा said...

हेरंबा ! :)

सौरभ said...

आईग्ग... कसलं भारी.. कसलं गोड... वाह रे वाह... मला मही नाव ज्याम आवडलं... मही... सही.. दही... वही...

अनघा said...

सौरभ !
:)

BinaryBandya™ said...

अप्रतिम ...

Prof. Narendra Vichare said...

अनघा,
निरागसता, निरागसता म्हणतात ती, हीच काय? फारच छान......
विचारे मास्तर.

अनघा said...

बंड्या, आभार ! :)

अनघा said...

सर !!!! खूप खूप आभार ! पाठ थोपटल्याबद्दल ! :)

स्केच बुक हातात धरून घाबरत घाबरत तुमच्यासमोर उभी राहायचे त्याची आठवण झाली ! :)

आनंद पत्रे said...

अप्रतिम लिहिलंय.. खूप खूप आवडलं

अनघा said...

आभार आनंद. :)

yogik said...

mi kitti vela parat parat wachlay he!! tumhala denyasarkhe nahi kahi majkade!! bus thank you!!

रोहन चौधरी ... said...

अशी मावशी हवी...
तिने महिला समजावले म्हणून सावली आणि झाड दोन्ही वाचले.. महिने सावलीच नेली असती तर बिन सावलीचे झाड ठेवले असते का कोणी उखडायचे? :)

अनघा said...

योगिक खूप खूप आभार ! :)

अनघा said...

हो ना रोहन ! :D
आभार रे. :)