नमस्कार

नमस्कार

Pages

Monday, 9 May 2011

Shoot her !

परवा एक शूट केलं. एक बाई आणि एक बुवा. बाई तिशीची आणि बुवा २८-२९ चे. दोघांचाही गेटअप पंजाबी. तरुण पंजाबी शेतकरी. व तरुण पंजाबी गृहिणी. मिशी, केस, मेकप वगैरे पंजाबी पद्धतीकडे जाईल असा. तिचे कपडे, केस, दागिने अस्सल पंजाबी धाटणीचे. ते काही फॅशन शूट नक्की नव्हतं. तर काही भाव प्रदर्शित करावयाचे होते. दोन्ही क्लोज अप शॉटस्...अभिनय करता येणे गरजेचे होते.

ज्यावेळी मॉडेल निवड चालू होती, त्यावेळी अनेक फोटो माझ्यासमोर दिले गेले होते. आणि त्यातून ह्या दोघांची निवड केली होती. ते सर्व फोटो फॅशनशी संबधित होते. आम्हांला हवा होता शेतकरी. व गृहिणी. आणि नवीन चेहेरा. क्लायन्टच्या प्रॉडक्टचं लॉन्च पंजाब हरियाणात. प्रथम मी ह्यांची निवड केली होती. व नंतर क्लायन्टकडून अप्रुव्हल घेतले होते. तो लूक बरोबर मिळवणे मेकअपवर बरेच अवलंबून होते. माझ्या हातात, त्यांच्याकडून नक्की काय प्रकारचे भाव हवे आहेत हे दाखवणारे रेफरन्स प्रिंट आउट्स होते.

तरुणाचा शॉट प्रथम. कॅमेरा लावला गेला. चर्चा करून, एकदोन शॉट्स घेऊन लाइट्स ठरवले गेले. तरुणाला त्याच्या उभं रहाण्याच्या जागेचे मार्किंग दिले गेले. कॅमेरासमोर तो आला. आणि काही क्षणात मुंबईचा मूर्तिमंत फॅशनेबल वाटणारा तो तरुण, साक्षात पंजाबी शेतकरी झाला ! फटाफट भाव बदलत गेला...फोटोग्राफर क्लिक करत गेला...एकेक शॉट्स लॅटॉपवर येऊन विसावत गेले...भरपूर...एका मागोमाग एक. "Should I do it like this...." त्याचे अधूनमधून विचारणे. स्वत: त्या फोटोत गुंतणे. आपले भाव अगदी मनासारखे उतरले जावे ह्यासाठीचे त्याचे कष्ट...
"Done ! You were fantastic !"
"Can I mail you my portfolio...?
"Ya ...do that..."

खुषीखुशी तो गेला...आनंदात आम्ही पुन्हा कॅमेराकडे वळलो.

आता...तरुणी. ती मुळातच पंजाबी असल्याने अस्सल पंजाबी दिसायला फारसे कष्ट नव्हते. तरी...टिकली कुठली लावावी...कानातले कुठले घालावे...गळ्यात काय घालावे...चर्चा झाली....पक्की पंजाबी दिसण्यासाठी जे जे गरजेचे होते ते ते अंगावर चढले.
मग....तिच्याकडून जे अपेक्षित आहे ते तिला समजावले गेले. प्रश्र्न सुंदर दिसण्याचा नव्हताच. तर काही भाव अपेक्षित होते. मुळातच ते फॅशन शूट नव्हतेच.

"Ya ya ....I got it ...let's start..."
क्लिक क्लिक....लॅटॉप वाहू लागला....चिन अप...एक्स्प्रेशन्स...स्माईल...क्लिक क्लिक. क्लिक क्लिक....
स्टुडियोत नेहेमी जोरदार संगीत चालू असतंच...मॅडम रंगात आल्या...त्यावर नाचू लागल्या...उड्या मारू लागल्या. पण मग आम्हांला हवं असलेलं एक्स्प्रेशन ? भाडमें ! आमचे चेहेरे ? चिंतीत....तिचा चेहेरा ? मजेत ! इथून तिथून...मिथुन ! आम्ही ? हताश. पुन्हा पुन्हा समज. अर्धा तास....एक तास...भुवया वर...ओठ असे....चेहेरा असा...मान अशी....नाही म्हणजे नाही ! आमच्या मॉडेलच्या काही गळी उतरेना ! बाई असाव्यात ३७/३८ च्या. परंतु, त्यांचं नाचरं तारुण्य त्यांना अभिनय करू देईना !
"तुषार, ह्याहून अधिक बाईंकडून काही नाही मिळणार..." फोटोग्राफर, माझा जुना मित्र. त्याच्या कानात कुजबुजले.
"हो...मलाही असंच वाटतंय..."
"ठीक आहे....मी करेन काही तरी...मिळेल एखादं..."
"...you got it ?" पंजाबीण.
"Not really ..but will manage...!" नेहेमी खरं बोलावे...खोटं बोलू नये !
पॅक अप...

दुसऱ्या दिवशी तुषार हार्ड डिस्क घेऊन घरी आला. त्या तरुणाचे फोटो...अगणित. कुठला घेऊ आणि कुठला नको..अशी परिस्थिती.
आणि पंजाबीण ? कठीण परिस्थिती. निवडा...परत परत बघा...ह्यात ती हसलीय बरी...ह्यात तिचे डोळे बरे...ह्यात तिचा हात नको होता. नशिबाने एक मिळाला....ज्यात हात आडवा आला...मग दुसऱ्या इमेजची मान आणि पहिल्या इमेजचा चेहेरा...

काम चांगलंच करण्याची मनापासूनची इच्छा, तरुणाच्या चेहेऱ्यावरील प्रत्येक स्नायूतून बोलत होती. व तरुणीचे नसते नखरेच तिच्या चेहेऱ्यावर उतू जात होते.

दुपारी इमेज आर्टिस्ट डोंबिवलीहून आला. निवडलेल्या इमेजेस घेऊन गेला. फोटोशॉप करायला.
रविवारी सकाळी फर्स्ट कट इमेजेस मला मिळाल्या...

बाईंची वेळ तुकड्या तुकड्यांनी मारून नेली होती !

एकदोन दिवसांत क्लायन्टला दाखवणे आहे. मुंबईचे 'मॉड' तरुण तरुणी. झाले पंजाबी शेतकरी आणि पंजाबी गृहिणी !

इतुकीच आशा...शेतकरी बघून क्लायन्ट खुष व्हावा.
आम्ही तोंड दिलेला नखरा त्याला न दिसावा...बाईंच्या चेहेऱ्यावर !

27 comments:

rajiv said...

खरेच तिला `शूट' करायला हवेय !! आपल्या कामाप्रती जर बांधिलकी नसेल,तिची `फिल्लम' उतरवायलाच हवी होती ..!! आवश्यक त्या भाव-भावना/अभिनय दाखवता येत नसेल तर स्वतःची पायरी ओळखून निदान त्या न केलेल्या कामाचे मोल नाकारण्याचा प्रांजळपणा अभावानेच आढळत असेल न :(

THE PROPHET said...

मॉडेल आहे, पंजाबी आहे म्हटल्यावर आमचा सॉफ्ट कॉर्नर... :P
चालायचंच गं.. सोडून दे.. शेतकरीण प्रोफेशनल नव्हती म्हणायचं ;)

Vinayak Pandit said...

कला आणि ’कला’यंट यांचा सम संबंध आहे की व्यस्त त्यावर पुढचं अवलंबून असेल!(:p मी आपलं उगाचंच अनाहुत मत देतोय, सॉरी!)

alhadmahabal said...

:)
mad ad world!

Pankaj - भटकंती Unlimited said...

होतं असं बरेचदा. पण डरने का नै... लाईफमें चलते रैने का...
(उगाच आपली अक्कल पाजळून गेलेला पंक्या)

अनघा said...

राजीव ! :D

अनघा said...

हं हं ?! का बरं ?? पंजाबीणीसाठी का बरं सॉफ्ट कॉर्नर ?? कळू तरी दे आम्हांला विद्याधर ! :) :)

अनघा said...

:D हेहे ! विनायक, क्लायंट नवीन आहे ! आणि स्वत:ला चित्रकार म्हणवतो....त्यामुळे 'क्रिएटीव्ह लायसन्स' खाली गळी उतरवेन मी त्याच्या बरोबर ! :p

अनघा said...

ह्म्म्म आल्हाद, mad ad world...वेड्यांचे वेड्यांसाठीचे वर्ल्ड... :)
आभार, प्रतिक्रियेबद्दल...

अनघा said...

पंकज, कधी तलवार, कधी अक्कल ! भारी बुवा !! :D :D

हेरंब said...

मला वाटलं वैतागून वैतागून खरंच 'शूट' केलंत की काय तिला.. शीर्षक आवड्या :)

अनघा said...

हेरंबा, तसंच काहीसं वाटलेलं मला तिचे नखरे बघून ! :)

Pankaj - भटकंती Unlimited said...

पंजाबीणीसाठी का बरं सॉफ्ट कॉर्नर ??
याचं उत्तर मीच देतो.
एक तर सरदार. त्यात बाई. आता तुम्हीच समजून घ्या नं.

अनघा said...

फुस्स ! इतकचं होय !? मला वाटलं इटलीत कुठे पंजाबीण भेटली की काय ! ;)

THE PROPHET said...

हेहे... पंकज सांगतो ते नाहीये काही खरं कारण! :P
पण इटलीत कुणी भेटलीही नाही.. उगाचच आपलं.. पंजाबी मुली छान दिसतात म्हणून म्हटलं झालं! :D

Raindrop said...

tujhya life madhe ashe khote shetkari khoop aahet na...ek te aple oonch handsome amitabh pan ahet na he he he (atta tu mala marayala uthleechas aahes tar yetanna ek glass pani pan aan ;)

अनघा said...

हो ते तर खरंच विद्याधर ! पंजाबी मुली छान दिसतातच ! मला आपलं वाटलं होतं...कधी पंजाबी लग्न बघितलेलं नाही...आता तो योग आहे की काय ! ;)

अनघा said...

ओये ! वंदू, आपन के अमिताभ को कुछ बोलनेका नही क्या ! :D

भानस said...

वड्डी वड्डी बाते वड्डे वड्डे नखरें... :P

आडात नसले तरी पोहर्‍यात आणता येते पण तितकी कुवत आणि मेहनतही हवीच ना. पंजाबीण खुशाळली गं... :D:D

अनघा said...

:D अगदी अगदी गं !! :D

श्रीराज said...

@" Raindrop said...
tujhya life madhe ashe khote shetkari khoop aahet na...ek te aple oonch handsome amitabh pan ahet na he he he (atta tu mala marayala uthleechas aahes tar yetanna ek glass pani pan aan ;)"

...A+++++ :D :D

अनघा said...

श्रीराज बुवा ! :D

सौरभ said...

हाहाहा... माझ्यामते पंजाबी बाई ला तुम्ही सांगायला हवं होतं की हा शेतकरी हे शेतकरी पंजाबकी करोडो एकर जमिन पे हरे हरे खेत में काम करनेवाला, सरसो की रोटी और मक्के का साग, राजमा और लस्सी पिनेवाला तगडा नय है... (तिला माझा फोटो दाखवून सांगायला पाहिजे होतं की हा तुझा होणारा नवरा आहे... अलका कुबलपेक्षा करुण भाव दिले असते. आपल्या थोबाडाबद्दल आपली ग्यारंटी आहे.)

अनघा said...

आईsssss ग !!! :D :D

भरपूर अनुभव गोळा करताय सौरभबुवा तुम्ही सध्या ?! घरी पोचल्यापोचल्या आई पप्पांनी दोनाचे चार करायचे एकदम मनावर घेतलेलं दिसतंय ?? काय रे ?? :) :)

नीरजा पटवर्धन said...

मॊडेल्स, नट्या त्यांचे नखरे.. त्यांचा मंदपणा... लिहावे तेवढे थोडे.. :)

तरी तू ड्रेसिंगरूममधे नसतेस.. :)

अनघा said...

:D कल्पना आहे मला नीरजा त्याची ! कठीण ना ?! :)

नीरजा पटवर्धन said...

कठिणपेक्षा विनोदीच वाटायला लागतं थोड्यावेळाने.. :D