नमस्कार

नमस्कार

Pages

Sunday, 24 April 2011

Why do I need...?

Okk ...That's funny !

वांद्रयातील एका गच्चीवर होतो आम्ही. सुखद हवा. रात्र पळती. परदेशी वास्तव्य असणाऱ्या मित्राच्या चार वर्षाच्या मुलाचा वाढदिवस होता. त्याचवेळी नेमका भारतात असल्याकारणाने त्याने जुन्या जवळच्या मित्रमंडळीना आमंत्रित केलं होतं. आपापल्या कुटुंबाबरोबर. मी आणि माझी लेक. छानपैकी कपडे घालून पोचलो होतो. काही मित्र...त्यांच्या बायका, त्यांची मुलं....एक जुना झकाससा बॉस आणि त्याची चिरतरुण बायको.

लवकर लग्न उरकून टाकलं आणि भारताच्या जनसंख्येत जी काय भर टाकायची आहे ती लवकर टाकून दिली की तसं आपलं भलंच होतं. कारण आपण व आपली मुलं ह्यात वयाची खूप खोल दरी नाही होत. जरी पिढी खूप पुढची असली, तरी....अगदी मोठी झालेली मुलं आपली मित्र वा मैत्रिणीच होतात. वा होऊ शकतात ! माझी लेक माझी मैत्रिणच असल्याचा भास आभास मला बऱ्याचदा होतो.

सगळ्यांचे ग्लास भरलेले. माझा आपला...पेप्सीचा ग्लास. मऊ लुसलुशीत चविष्ट चिकन टिक्के इथेतिथे फिरत होते. त्यामुळे पोट आणि जुने मित्र खूपखूप वर्षानंतर भेटल्याने मन...आनंदित.
मिठ्या झाल्या...हाय हॅलो झालं...
एका मित्राची बायको उजव्या हाताला. तिच्या हातात ग्लास. मित्र व माझी लेक समोर...गप्पा चढत्या.
"Hey ! Get a boyfriend for your beautiful mother !" माझ्या मित्राने लेकीच्या खांद्यावर जबाबदारी टाकली. अगदी बाळ असल्यापासून ही मित्रमंडळी तिला ओळखतात त्याचा फायदा वा गैरफायदा...
लेक हसू लागली.
"Ya ya...am going hunting now !" म्हणजे...नदीकाठी लेक...गळ टाकून...काय करतेयस...तर आईसाठी बॉयफ्रेंड पकडतेय....व्वा व्वा...काय सिच्युअशन आहे !
त्याच्या बायकोने माझ्या गळ्यात हात टाकले.
नवऱ्याला पाठिंबा देत, "Seriously yaar ! Why not ?!"
"Arey ! Have a daughter yaar ! Have her responsibility !" ढाल क्रमांक एक.
"Now this is a typical Indian woman attitude ! Make your kids feel guilty !"
"What ?" आता ह्यात मी लेकीला काय guilty feel दिलं...मला नाही कळलं. लेक समोर बसून हसतेय...
"नही तो क्या ! Poor thing yaar ! She must be thinking that because of her you are alone !" लेक उगाच मान डोलावतेय. "Ya ya ! Tell her !"
"Tell her what ?! चूप गं !" लेकीला थोडं दमात.
"See ! She is okay with it !"
"Okay काय Okay ! तिच्या बापाचं काय जातंय ?" माझं मराठी झिंदाबाद ! लेक हसतेय.
"You Ghati !"
"Gitu, why do you want me to have complications in my life ?! Am I not looking happily single ?!" ढाल क्रमांक दोन.
"Arey ! Men are good yaar ! It 's good to have a man around !" आता मला हसायला आलं...म्हणजे एक मोठ्ठं राक्षसी फुलपाखरूच दिसलं मला....अवतीभवती उडताना....आणि मला भीती वाटते. अश्या अगडबंब फुलपाखरांची !
"नही यार ! A man is just like a bundle of complications...." तारे माझे ! तोडले...
"Yaa ...that तो they are ...but still....why live single ?!" ....बॉसची रूपगर्विता आता चर्चेत सामील. जणू, माझी जबाबदारी आता सर्वस्वी त्यांच्यावर. जणू, आज रात्र संपता संपता एक बॉयफ्रेंड माझ्या गळ्यात बांधला की हुश्श !
"hmmmm...see...anyways, am not like 'single and ready to mingle type...right ?"
"Precisely ! That's what ! You should get a steady boyfriend !" कॉलेजमध्ये जेंव्हा नवरा 'मित्र' होता...त्यावेळी पण हे बॉयफ्रेंड प्रकरण नव्हतं डोक्यात. हा माझा होणारा नवरा हेच कायम डोक्यात ! तो काही माझा 'टेस्टिंग पिरिएड' चालू नव्हता !
"Shanta ! What do you think ? रूपगर्वितेने नवऱ्याला हाक मारली.
"About what ?"
"We all think that Anagha should have a boyfriend !"
"हम्म्म्म" शांता डोळे बारीक करून माझ्याकडे. "You stopped wearing lenses ?"
"Got bored with them, Shanta ! Too much of efforts every morning ! And I think these fat specs make me look intellectual !"
शांताने मन डोलावली. "Ya Ya. You look nice ! So...why you don't want a boyfriend ?"
"Because I have not found an answer to....'why do I need a boyfriend ? "
"And you will find the answer when you will grow old !"
"hmmmmm " मी फक्त हसले.
ताडमाड शांताने खांद्यावर हात ठेवून जवळ घेतलं...त्यावेळी त्या वडील आणि मित्र सदृश्य स्पर्शातून कळून गेलं...का हा माझा सर्वात लाडका बॉस आहे..."Life was tough on you...I know. Leave her alone Arati..." शांताने अर्धांगिनीला फर्मावलं. आरतीने भरलेल्या ग्लासमधून एक घोट घेतला. व माझ्याकडे एक प्रेमळ कटाक्ष टाकला.

पार्टी पुढे सरकली. आम्ही पोटभर जेवलो. गच्चीवरील हवा थंड होती....पिणाऱ्यांची विमाने हळू तरंगत होती...सगळेच आनंदात होते. रात्र फारच चढली होती. आम्ही दोघी निघालो.
गीतूने पुन्हा मिठी मारली. आपला मुद्दा सोडला नाही..."Remember what I told you !" मी हसले.

गाडी चालू केली आणि लेकीला म्हटलं...मला 'मेरील स्ट्रीप' चा 'ममा मिया' आठवतोय..! आधीच ही 'मुंबई' आणि त्यात हे आमचं glamorous advertising ! त्यात आपण ना असे मध्येच तरंगतोय...त्रिशंकू सारखे...तू काही मनावर घेऊ नकोस हा त्यांचं ! "
"आता हा त्रिशंकू कोण ? ज्याच्यासारखे आपण लटकतोय ?" लेकीने विचारले.
'त्रिशंकू' समजावता समजावता घर आलं...
आमचे पाय जमिनीला लागले...
आणि पंधरा मिनिटात पाठ बिछान्याला.

22 comments:

rajiv said...

खरेच, हा प्रश्न आपण स्वतःला प्रत्येक बाबीसाठी विचारू शकतो....
आणि त्याचे उत्तर ज्याचे त्यानेच मिळवायचे असते नाही ...?
कारण ते समाजापेक्षाही, प्रत्येकावर झालेले संस्कार, भोवतालची परिस्थिती, जबाबदाऱ्या व
स्वतःची वैचारीक बैठक यावर अवलंबून असते!!

याचा शोध आपण मनापासून घेतला तर आयुष्य सुखकर होऊ शकते .. .....त्रिशंकू न होता !!

Gouri said...

सगळं काही असूनही कधी एकाकीपणा असतो, कधी एकटं असूनही सोबतीची गरज नसते. आपल्यालाच ठरवायचं असतं ना शेवटी - whether you need something / someone or not ...

हेरंब said...

मलापण अगदी 'ममा मिया' ची च आठवण आली :)

अनघा said...

आयुष्य सुखकर.... ? ह्म्म्म.
धन्यवाद राजीव. :)

अनघा said...

अगदी खरं गं गौरी.. :)

अनघा said...

हेरंब, मस्त आहे ना 'ममा मिया' ?! कसली आहे त्यात मेरील स्ट्रीप ! कितीही वेळा बघू शकते मी हा सिनेमा ! :)

Raindrop said...

zabardasti saglech ghetaat mhanun apan salwar kameez la saadi odhni suddha ghet nahi zar garaz kinvha avad nasel tar....ha tar boyfriend cha prashna aahe...life cha. nasta faas kashala galyala, zar nako aahe tar???

Smiling single is always better then crying double :)

अनघा said...

:) crying double ! वंदू... :)

श्रीराज said...

मी कधीच सांगणार नाही
एकट्या जीवाला दुकटा व्हायला
मी कधीच सांगणार नाही
कोणाला बोहल्यावर चढायला
सुखी जीवाला दुःखात ढकलण्याचे पाप
मी कधीच करणार नाही

इंद्रधनू said...

चांगल्या हेतूने का होईना पण सल्ले देणं फारच सोपं असतं नाही? शेवटी ज्याची त्याची परिस्थिती ज्याला त्यालाच ठावूक.....

भानस said...

घ्या..... आणि मी दिवसभर तुझी वाट पाहत राहिले.:(:( तू बसलीस फेसाळत्या ग्लासातल्या BF च्या उसळत्या चर्चेत.

बाकी एकटेपणा आहे म्हणून सोबत अनिवार्य की सोबत असूनही एकटेपणाची नितांत गरज... अनुत्तरित प्रश्नांची गर्दी वाढतेच आहे.

अनघा said...

श्रीराज, काय झालं ?

अनघा said...

अगदी खरे इंद्रधनू...म्हणून मी कुठल्याही सल्लागार मंडळात सहभागी होत नाही ! :)

अनघा said...

भाग्यश्री, अगं तुला टाकून काय मी त्या पार्टीत फिरत नव्हते गं बाई ! ह्या घटनेला होऊन गेला महिना ! असं कसं गं करीन ?! :)

'एकटेपणा आहे म्हणून सोबत अनिवार्य की सोबत असूनही एकटेपणाची नितांत गरज'... अनुत्तरित प्रश्न... खरंय बयो... :)

श्रीराज said...

अगं एकमेकांची मर्जी सांभाळता सांभाळता नाकी नऊ येतात म्हणून एकटेपण बरे म्हणायचे. शिवाय तुम्हा मुलींना सासरच्या नातेवाईकांचीही मर्जी सांभाळायची असते! आई आई गं!!! :(

सौरभ said...

मलापण त्रिशंकू म्हणजे नक्की काय ही जाणून घ्यायला आवडेल... ;)

मीपण एक सल्ला देतो - आपण चिकन टिक्क्यावरुन लक्ष विचलित होऊ द्यायचं नाही. येथेच्छ तावा मारुन घ्यावा. बाकी कोणी काहीही सल्ले देओत. :)

अनघा said...

अगदी अगदी ! लग्न झाल्याझाल्या जीवनाचं सार कळलंच की श्रीराज बुवा तुम्हांला ! :)

अनघा said...

सल्लागार मंडळ, आभार हो ! :)

रोहन चौधरी ... said...

आपल्याकडे एक गोष्ट हवी तितकी न मागता फुकट मिळते, स्वतःकडे न ठेवता लोक वाटत फिरतात, ........ सल्ले... :)

अनघा said...

अगदी अगदी रोहन ! :)

THE PROPHET said...

....

अनघा said...

:)