नमस्कार

नमस्कार

Pages

Friday 8 April 2011

सुरापान

देव सुरा पीत असत. ते प्रमाणात पीत असत की अधेमध्ये प्रमाण विसरत असत कोण जाणे. ते पीत असत असे म्हटले तर देवांनी आता सोडली किंवा देव आता अस्तित्वातच नाहीत असा काहीसा त्यातून अर्थ निघतो.

"काय मोरे भाऊ, तुम्हीं कुठे बघणार फायनल?"
"अरे, आम्हीं मस्त अंधेरीला एक हॉल बुक केलाय!"
"अरे व्वा! भारी!"
"असा मोठ्ठा हॉल आहे. आणि त्याच्या डाव्या हाताला आम्हीं देवघर सारखं केलंय."
"देवघर?"
"हो यार! आमच्या बायकांना लागतात ते असे देव. मॅच मध्ये काही गडबड झाली की त्या जाऊन बसतात तिथे! आणि आम्हांला पण जरा बरं वाटतं यार!"
"हम्म्म्म"
"आणि उजव्या हाताला असा मस्त मोठा बार टाकलाय! अशे मस्त टकाटक पिणार..आणि मस्त मॅच बघणार! धमाल येणारेय यार!"
"अरे व्वा! डाव्या हाताला देव आणि त्यांच्या समोर मद्यपान! सहीयेय भाऊ!"
"अरे! भारी आहोत बॉस आपण!"
"ऑफकोर्स ऑफकोर्स!"

गणपती विसर्जनाच्या दिवशी, एके वर्षी लालबागच्या राजाचे रस्त्यात दर्शन झाले होते. अलोट जनसमुदाय. अंगावर येणारा. घामट अनोळखी स्पर्श. आसमंतात दारूचा हलकासा दरवळ.

बघितलंय. हेही याची डोळा बघितलंय. घरात गणपती. रात्र रात्र जागरण. जुगार जोरात. पैश्याची देवाणघेवाण. पहाटे घरातील पुरुष मंडळी घरी परतलेली बघितली. आरतीला दारू पिऊन झोकांड्या खात झांजा वाजवलेल्या देखील ऐकल्या. समोर गणपती हलकेसं हसत विराजमान झालेला बघितला. मनाने टाहो फोडला. आक्रोश केला. गणपतीने खुणगाठ फक्त मारली. ऐकलेल्या आक्रोशाची.

देव सुरा पितात. मग त्यांचे 'लिव्हर' देखील 'डॅमेज' होते काय? म्हणे, लिव्हर हा शरीरातील एकच अवयव असा आहे, की जर त्यावरील अत्याचार थांबवले गेले तर ते पुन्हा आपली हकनाक गेलेली शक्ती मिळवू शकते. मग देवांना, त्यांच्या बायका इस्पितळात भरती करतात काय? त्यांना नियमितपणे औषधे देतात काय? आणि तरीदेखील देव पितात काय? व्यसन त्यांच्या हाताबाहेर जाते काय? इथून तिथून, रस्त्यावरून ह्या देवांना त्यांच्या बायका उचलून घरी आणतात काय? त्यांच्या बायका कधी टाहो फोडतात काय? आणि फोडलाच तर पिऊन तर्र झालेल्या देवांच्या कानी तो पडतो काय?

की देव सुरा पितात...
आणि म्हणूनच, आणि म्हणूनच...
पिऊन तर्र बेभान होणाऱ्या आपल्या भक्तजनांकडे देव दुर्लक्ष करतात काय?
(तूनळीची जी लिंक टाकली आहे ती माझी मैत्रीण वंदना, हिने त्यावेळी शूट केलेली आहे. )

27 comments:

सौरभ said...

आमच्याकडे महाभारताचे जे ११ खंड आहेत, त्यातला पहिलाच वाचताना लक्षात येतं हे देव लोकंपण लय डांबिस आहेत... खास करुन इंद्रदेव. कसलं भारी ना.. तोच इंद्रदेव सर्व देवांचा राजा...

Kanchan Karai (Mogaraafulalaa) said...

रचॅक आहे पोस्ट! माणूस तरी काय गं, देवाकडूनच शिकतो. आपल्या पौराणिक कथा वाचल्या की प्रसंगांतून "सोयिस्कर" अर्थ कसे काढायचे ते आपसूक कळतं आणि देवांचं उदाहरण दिलं की आपण उच्छाद मांडायला मोकळे ना! आता देवीला सुद्धा कोंबड्या-बकर्‍याचा बळी देतात ना! गौरी गणपतीच्या वेळेला ब्राह्मण गणपतीच्या बाजूला बसलेल्या गौरीला पडदा लावून "तिखट" नैवेद्य दिला तर चालतो. आता हे चालतं तर बाकी सगळं चालायला पाहिजेच नाही का? आणि जागरण करायचं तर काही तरी टाईमपास पाहिजे की नको? कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही - नवनाथ कथासार हे खरं तर बोधकथामृत असायला हवं पण ते वाचून मला लहान वयात पडले्ल्या भाबड्या प्रश्नांची उत्तर अजून काही मिळालेली नाहीत.

थोडंसं ऑफटॉपिक - इंद्र म्हणजे देवांचा राजा हे जरी खरं असलं तरी ते एक पद आहे, नाव नाही. जसं पंतप्रधान हे पद आहे तसंच. आपल्याकडे हा मुद्दाही विशेष स्पष्ट करून सांगितला जात नाही.

BinaryBandya™ said...

दारू फार वाईट ..
देवाला पण राक्षस करते माणसाची तिच्यापुढे काय मजल ..

सखाराम बाईंडर मधला सखाराम आठवला - तो पण गणपतीची आरती करत असतो .

विनायक पंडित said...

अनघा! अफलातून! अप्रतिम...(अनुप्रास जुळलाय सही!) तुम्ही प्रश्न विचारायला सुरवात केलीत तेव्हा डोळ्यासमोर उभ्या राहिलात! १०१++++++१ पटतंय तुमचं म्हणणं! देवाचं काय काय करून ठेवलंय आपण? उत्सव, उत्सवी मिरवणुका बघताना फारच जाणवतं ते!

इंद्रधनु said...

कसंकसंच झालं वाचून... शेवटी देवालाही निर्माण करणारे आपणच.. (आपण म्हणजे ज्या कोणी ग्रंथांमध्ये इंद्रपदावर बसणारा व्यक्ती असा.. हे लिहिले असेल ते)
ज्यांना मांसाहार चालतो त्यांच्या देवांनाही तो चालतो, ज्यांना नाही चालत त्यांच्या देवांना पुरणपोळी लागते... सगळं ठरवणारे आपणच...

Anagha said...

डांबिस?! :)
सौरभ, जसे आपण तसे आपले देव! :)

Anagha said...

कांचन, आणि वाईट गोष्ट पटकन अंगिसात करता येते. चांगली गोष्ट अंगी बाणायला वेळ व श्रम लागतात. तेव्हा देवाचे अनुकरण कशात करणे सोप्पे आहे हे काय वेगळे बोलणार? जसे आपण तसेच आपले देव...

देवासमोरील वाढत्या रांगांचे कारण, वाढत्या पापकर्मांत दिसून येते!

प्रतिक्रियेबद्दल आभार गं.. :)

Anagha said...

बंड्या, आपल्या पापांचा घडा कधी भरणार आहे कोण जाणे!?

Anagha said...

अनुप्रास! :)

विनायक, सतत हे भक्तीचे विद्रूप व किळसवाणे चित्र दिसत असते...

शंका येते...कुंभकर्ण झालाय काय त्याचा? कितीही नगारे पिटा..जाग काही येत नाही!

आभार हं प्रतिक्रियेबद्दल. :)

Anagha said...

असंच वाटतं इंद्रधनू...आपल्याला देवाने निर्माण केलेले नाही. आपण देवाला निर्माण केले आहे. आपल्या स्वार्थासाठी...म्हणून आता त्याचा हा पदोपदी अपमान चालू आहे!

धन्यवाद गं प्रतिक्रियेसाठी. :)

हेरंब said...

आपण फक्त वापरतोय देवाला !!!!!!

>> सखाराम बाईंडर मधला सखाराम आठवला - तो पण गणपतीची आरती करत असतो .

अगदी अगदी हेच म्हणणार होतो.

Anagha said...

हेरंबा, कसले आहोत ना आपण! स्वार्थासाठी देवाला पण सोडत नाही! :(

अपर्णा said...

अनघा तू मुद्दे असे काढतेस की बोलती बंद होते ग...हे सगळ असं सुरु आहे हे आपल्याला माहित असत पण तू जेव्हा ते तुझ्या शैलीत मांडतेस न त्याचं कौतुक...बाकी म्हटल तस बोलती बंद...

Anagha said...

अपर्णा, अगं, समाजाच्या वेगवेगळ्या स्तरांचे फार जवळून निरीक्षण करायला मिळाले आहे. सर्व अगदी आत घुसून बघितलंय...त्याचेच परिणाम आता लिखाणात दिसतायत! :)
धन्यवाद गं. :)

Yogesh said...

अनघा ताई...शेवटी देवाची निर्मिती करणारे ही आपण अन त्याच्या आवडी-निवडी ठरवणारे ही आपणच...प्रत्येक जण आप आपल्या सोयीने "देव" ह्या निर्मितीचा वापर करुन घेत असतो.

Anagha said...

अगदी बरोबर योगेश. देवाच्या नावाखाली आपण आपले धंदे करायला मोकळे!

आनंद पत्रे said...

मस्त लिहिलंय.. वाईट गोष्टींचं अनुकरण लवकर होतं आणि चांगल्यांच अजिबात होत नाही..

Anagha said...

आपण एक नंबरचे लबाड आणि स्वार्थी आहोत...देव आपण आपल्या स्वार्थासाठी फिरवून घेतलेले आहेत...मन विषण्ण होऊन जातं हे असं सगळं बघून...नाही का आनंद?

धन्यवाद प्रतिक्रियेबद्दल.

Shriraj said...

दारू असता हाती
विषाची काय गरज
स्वतःच खड्डा खणल्यावर
खांद्यांची काय गरज

Raindrop said...

I still remember that morning at Girgaum

http://www.youtube.com/watch?v=aw7RpkZ3Y_o

Anagha said...

श्रीराज बुवा, एकदम स्ट्रोक मारलात ! :)

Anagha said...

वंदू, बरं झालं तुझी लिंक दिलीस ती ! मी टाकली आता पोस्टवर !

रोहन... said...

बाबा.. तुला 'कल्पना' आलेलीच आहे ना... :) सुहासला बघू कोण मिळते आहे... :) मीटचा डेटा तर त्याच्याकडेच आहे ना... ;) Infact He'll have better Idea... :)

रोहन... said...

हे असले प्रकार खूप कमी झाले आहेत असे म्हणावे लागेल... आधी तर भयावह परिस्थिती होती असे माझे काका सांगत...

Anagha said...

नाही रोहन, नाही कमी झालेले हे प्रकार... :(

THEPROPHET said...

आपल्या स्वार्थासाठी देवाला का 'सोडा'? ;)
आपला स्वार्थ तर आपल्यालाच 'सोडा' ;)
On a serious note - हे सगळं माहित असूनही एकदम अंगावर आलं!

Anagha said...

:(